beauty lies in the eyes of the beholder सौंदर्य हे पाहणारच्या नजरेत असतं असं म्हणतात.परंतु आता हे विधान बदलून vulgarity lies in the eyes of the beholder असं म्हणायची वेळ आपण भारतीयांवर आली आहे.आणि हे विधान पटवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे आम्हाला खजुराहो वगैरे दाखले द्यावेच लागणार आहेत का? एकतर आपण कोणत्याही प्रकारे समृद्ध नसतो,आपल्या बुद्धीला आपण जास्त वापरलेलं नसतं,आपल्याकडे बालपणापासून एका साच्यात बंदिस्त केलेलं असतं.
त्यामुळे जग कुठे चाललं आहे आणि आपण कुठे मागे मागे चाललो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.आपलं सुगंधी डबकं म्हणजे आपलं विश्व आपलं जग आणि तेच वास्तव अशा मानसिकतेत जगणारे करोडो भारतीय आहेत.आणि आपण 21 व्या शतकात आहोत.हे 2021 वर्षे आहे.आपण एका अशा पोस्टट्रूथ era मध्ये आहोत जिथं सगळं जग आज एका वेगळ्या राजकीय सांस्कृतिक बदलात बदलत चालले आहे.पोस्ट-ट्रुथचा अर्थ सत्या पासून दूर पळणे,असत्य थोपवत राहणे.सत्य-पश्चात्.एका अर्थाने सत्य संपल्यानंतरचे कथन.लोकांच्या गळी उतरवणे.सोशल मिडियात दररोज काहीतरी नविन मुद्दा असतो.लोक त्यावर चर्चा करत असतात.चर्चा करण्यात दोन्ही बाजूचे लोक हिरीरीने आपली बाजू मांडत असतात.सध्या Myntra Logo संदर्भात सध्या सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विरोधाचा मुद्दा –
हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या नाझ पटेल या सामाजिक कार्यकर्त्या आहेत.वृद्ध निराधार लोकांसाठी त्या काम करतात.त्यांचं असं म्हणणं आहे की Myntra चा Logo लोगो स्त्रियांच्या प्रसूतीची पोज देत असून स्त्रीच्या जननेंद्रियाच्या भागात मरूम कलर चे रक्त प्रसूतिच्या वेळेस येते तसे या लोगोत दाखवले आहे.आणि हे योग्य नाही असे मला वाटते त्यामुळे मी माझ्या वकिलांना आणि एका महिला डॉक्टरला हा लोगो दाखवला तेव्हा त्यानाही हे पटलं.आणि त्यांनी सुद्धा माझ्या ‘दृष्टिकोणाला’दुजोरा दिला.त्यामुळे मी लोगो बदलावा म्हणून पाऊल उचलले.
इथपर्यंत ठीक आहे.परंतु हे कारण पटण्यासारखे आहे का? याबद्दल थोडा विचार करू.सर्वात अगोदर मुद्दा आहे नावाचा. Myntra या नावाला काय अर्थ आहे? ते स्त्रियांशी संबंधित नाव आहे का? तर तसं काही दिसत नाही.कॅची नाव असावं म्हणून ते योजलं आहे.Myntra चे निर्माते मालक मुकेश बन्सल असून भारतातील ही सर्वात मोठी फॅशन ई-कॉमर्स साइट आहे.सर्वात मोठी यासाठी कारण 2014 मध्ये तब्बल $375 million रुपये मोजून फ्लिपकार्ट (Flipkart या ई-कॉमर्स साईट ने विकत घेतली) यावरून लक्षात येईल की ही कंपनी बीगशॉट आहे.
कुणीतरी लोगोबद्दल आक्षेप घेतला
त्यामुळे यामागे खरोखर नेमकं काय आहे? हा एक प्रश्न उपस्थित होतो.तर नाझ पटेल यांच्या आक्षेपानंतर कंपनीने लोगो बदलण्यास फारसे आढेवेढे न घेता,आपली बाजू न मांडता तयारी दर्शवली.(पाल इथेच चूकचुकते)आणि तसे जाहीर देखील केले.त्यांनी हे जाहीर केल्याने म्हणजेच याची जाहिरात केल्याने जनतेला समजलं की कुणीतरी लोगोबद्दल आक्षेप घेतला आहे. आणि मग त्यावर दोन दिवस चर्चा सुरू झाली,ती आता बंद होऊन नव्या विषयाकडे वळेलच परंतु यामुळे काही प्रश्न उपस्थित होतातच.
चर्चा सुरू झाल्यावर अनेकांनी तर याबाबत कधी विचारच केला नसल्याचे मत व्यक्त केले. असे मत व्यक्त करणारे जसे तरुण होते तसेच मोठ्याप्रमाणावर तरुणी,स्त्रिया देखील होत्या,अनेकांनी आपण “त्या नजरेने” याकडे कधी पाहिलेच नसल्याचे सांगितले.तसे काही आंबटशौकीन मात्र याकडे सवंग विनोद निर्मितीचे एक माध्यम म्हणून पाहू लागले.आणि नेहमीप्रमाणे जे होते तेच सोशल मिडियात झाले.परंतु बहुसंख्य लोकानी या अनावश्यक मुद्दा असल्याचे मांडले आहे.
यापुढे लोगो डिझाईन कराल तेव्हा अगोदर लोकांचे मत विचारत घेतले पाहिजे.
हा मुद्दा इथेच थांबत नाही.त्यांना जेव्हा असं विचारण्यात आलं की
या विरोधाच्या भूमिकेनंतर तुम्ही समाजात काय संदेश देवू इच्छित आहात? यामुळे समाजात कसा सामाजिक बदल होणार आहे?
त्यावर नाझ पटेल म्हणतात की लोकाना भीती नाही वाटली पाहिजे.
यापुढे लोगो डिझाईन कराल तेव्हा अगोदर लोकांचे मत विचारत घेतले पाहिजे.
जसे तुम्ही लोगो रजिस्टर करण्यासाठी नोंदणी करता,त्याची एक प्रोसीजर असते
तसे तुम्ही समाजात सुद्धा विचारा,जर तुम्ही समाजाचा विचार करत असाल.
जर तुम्ही लोकांना विचारले असते तर लोकानी या लोगोवर आक्षेप घेतला असता.
नाझ पटेल यांना जर लोगो रजिस्टर होतो हे माहीत आहेच तर त्यांना हेही माहीत असेल की रजिस्टर करतानाच सरकारच्या गाईडलाइन पाळून नियमात लोगो बसवावा लागतो.अन्यथा तो रजिस्टर होत नाही.जर सरकारी नियम पाळून एखादा लोगो रजिस्टर झाला आणि त्या ब्रॅंड ने तो वापरला तर त्याबद्दल आक्षेप असणे योग्य कसे ठरेल? नाझ पटेल यांना सरकारी रजिस्ट्रेशन प्रोसेसपेक्षा पब्लिक ओपिनियन जास्त महत्वाचे वाटते का? तसे इथे दिसते आहे.आणि ते अयोग्य आहे असे आमचे मत आहे.
सेन्सॉर संमत झालेला चित्रपट पुन्हा संस्कृती रक्षक लोकांच्या सेन्सॉरशिपच्या कात्रीत अडकवला जातो
ही गोष्ट तशीच आहे की एकदा सेन्सॉर संमत झालेला चित्रपट पुन्हा संस्कृती रक्षक लोकांच्या सेन्सॉरशिपच्या कात्रीत अडकवला जातो.
खरेतर अशा गोष्टिना गांभीर्याने घेणाऱ्या लोकाना देखील यागोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते.
रजिस्टर्ड लोगोवर आक्षेप घेऊन बदलायला लावणे ही सामाजिक पोलिसगिरी राज्यात देशात व्यवसाय करण्यास अडथळे आणेल
त्याहीपेक्षा सामाजिक पातळीवर याचे पडसाद उमटू लागले तर याचा उलटा परिणाम समाजातील काही संवेदनशील गोष्टींवर होऊ शकतो.
नाझ पटेल यांना लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली त्याचे कारणही यात दडले आहे.
लोकानी अश्लील सदृश लोगो शेअर करून प्रश्न विचारायला सुरुवात केली.
तर काही स्त्रियांनी देखील यात काहीही आक्षेपार्ह दिसत नसल्याचे म्हटले आहे.
Myntra Logo
Myntra ने या अगोदरही अनेक प्रकारच्या लोगो Logo चा वापर केला आहे.
एक जनरेशन बदलण्याचे वय काय असावे?
हे लोगो ऑब्जेक्शनेबल वाटणे अजब आहे.ज्यावेळी समाज माध्यमात ओटीटी प्लॅटफॉर्म वरून येणारे चित्रपट
त्यातील कंटेंट जर पाहिला तर आपण फारच मागे जातोय असे वाटते,
मागे म्हणजे जवळपास 90 च्या दशकात.
त्यावेळी त्यावेळच्या स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या महिला असे आक्षेप घेताना दिसत.एक जनरेशन बदलण्याचे वय काय असावे? दहा वर्षे असू शकते?
त्यावेळी (mohra) 1994 मोहरा चित्रपटात “तू चीज बडी है मस्त मस्त” या गाण्याच्या याच शब्दांवर आक्षेप असल्याचे स्मरते,
स्त्रीला “चीज” वस्तु समजणे तिचे वस्तूकरण करणे त्यावेळी सहन केले गेले नव्हते.केस झाली.मात्र ऑब्जेक्शन ओव्हररूल झाले.
त्याच वर्षी ( khuddar 1994) खुद्दार नावाचा करिश्मा कपूर आणि गोविंदा यांचा चित्रपट आला. यात एक गाणे होते.
“सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले” यातल्या सेक्सी शब्दांवर त्यावेळी जोरदार आक्षेप घेण्यात आला होता.
त्यानंतर हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलं आणि सेक्सीच्या जागी बेबी करण्यात आले.
त्यानंतर म्हणजे पुढच्या चार वर्षात 1998 मध्ये (kuch kuch hota hai) “कुछ कुछ होता है रिलीज” झाला.
शाहरुख खान,काजोल,आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट.
सांस्कृतिक बदलाचा कॉन्ट्रॅस्ट
फरीदा जलाल यांनी यात शाहरुख यांच्या आईची भूमिका साकारली.यात शाहरुख च्या मुलीची भूमिका Sana Saeed ने केली होती.चित्रपट तिचे नाव अंजली.हा सीन सुद्धा दोन जनरेशन मधला सांस्कृतिक बदलाचा कॉन्ट्रॅस्ट ठळक पकडतो.फरीदा जलाल भजन म्हणत आहेत,आणि भजनाला आलेल्या स्त्रियांना ईश्वर भक्ती इत्यादी समजावत आहेत.
एक स्त्री किटीपार्टी संदर्भात गप्पा मारत असते.तिला सुनावण्यासाठी फरीदा जलाल म्हणतात,तू आम्हा सर्वांना गायत्री मंत्र म्हणून दाखव,यावर त्या स्त्रीला गायत्री मंत्र म्हणता येत नाही,तेव्हा फरीदा जलाल पुन्हा आपल्या संस्कृती बद्दल कसं गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपण कसे मुलांवर संस्कार केले पाहिजेत,वगैरे निरूपण सुरू करतात,आपण बोलतो वागतो तसेच आपली मुलं वागतात.
आणि हे सांगत असताना शाहरुखची मुलगी आणि फरीदा यांची नात तिथं येते आणि आज्जी ला मिठी मारत हाय सेक्सी असं म्हणते,समोर भाजनाला आलेल्या सर्व स्त्रिया तोंडावर हात ठेवून हसायला लागतात.एक जनरेशन बदलायला इथे फक्त चार वर्षे लागली.1994 साली सेक्सी शब्दावर आक्षेप घेत तो शब्द गाण्यातून वगळला गेला.आणि पुढे एका लहान मुलीच्या तोंडी तोच शब्द चार वर्षांनी वदवला गेला.
मूलभूत प्रश्न आहेत त्यावर त्यांनी जरूर आवाज उठवला पाहिजे
हा बदलाचा वेग प्रचंड आहे.जुन्या काळात प्रेम व्यक्त करताना फुलं एकमेकांवर आदळणे,सूर्यास्त होणे,किंवा दूध उतू जाणे हे प्रतीकात्मकरित्या दाखवले जात होते,त्याची जागा नंतर चित्रपट सोडा डेली सोप मध्येही बोल्ड प्रणय प्रसंग चित्रित झाले.आणि आताचे ओटीटी वर रिलीज होणारे चित्रपट वेबसिरीज हे स्पष्टपणे सेमीपॉर्न आहे.पण हा बदल आहे.आणि त्याकडे तुम्ही कसे बघता हा तुमचा दृष्टिकोण.
नाझ यांना स्त्रियांच्या प्रश्नावर काम करायचं असेल तर असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्यावर त्यांनी जरूर आवाज उठवला पाहिजे.फुटकळ लोगोवर ऊर्जा घालवणे लोकाना हे कॅम्पेन आहे असे वाटू शकते,आणि वाटते आहे.तसे म्हटले आहे तसे होण्यापासून टाळले पाहिजे.
टीम जागल्या भारत
जागल्या भारत साठी हा विषय तेवढा महत्वाचा नव्हता.अशा चर्चा सोशल मिडियात सातत्याने होत राहतात. मात्र कोणत्या चर्चेची दखल घेतली पाहिजे याबद्दल जागल्या भारतचं एक धोरण आहे.व्यापक सामाजिक हित किंवा अहित जेव्हा ठळक होते तेव्हा त्यावर भूमिका घेणे आम्हाला गरजेचे वाटते. Myntra logo
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)