उत्तरप्रदेश: कुशीनगर (Kushinagar) जिल्ह्यातील रामकोला पोलीस ठाण्याच्या काठघरी गावात भाजप चा प्रचार आणि सरकार स्थापन झाल्यावर मिठाई वाटण्याच्या मुद्यावरून एका मुस्लिम तरुणाला जीव गमवावा लागला.(Muslim youth babar azam killed due to distribute sweets after bjp victory )
मुस्लिम तरुणाला त्याच्याच विभागातील लोकांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.जबर मारहाणीनंतर या तरुणाला जिल्हा रुग्णालयात आणि नंतर लखनऊला रेफर करण्यात आले. जिथे रविवारी उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. घटना गेल्या 20 मार्चची आहे. आज मृतदेह गावात पोहोचल्यावर नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि लोकांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला.
हे प्रकरण सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने प्रशासकीय कर्मचारीही सक्रिय झाले. प्रादेशिक आमदारही घटनास्थळी पोहोचले. मृत बाबरच्या नातेवाइकांनी सांगितले की, बाबर भाजपचा प्रचार का करत आहे, याचा राग शेजारी राहणाऱ्यांना होता.बाबरला अनेकदा भाजपचा प्रचार करण्यास मनाई करण्यात आली होती. बाबरने नेरमकोला पोलिस ठाण्यात अनेक अधिकाऱ्यांकडे संरक्षणाची याचना केली, परंतु त्याची विनंती ऐकली गेली नाही.
भावाने सांगितलं जुनं वैमनस्य
मृत युवक बाबरच्या भावाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की त्याचा भाऊ बाबर आणि आरोपी यांचे जुने वैर होते.ते लोक त्याला मारण्यासाठी चार महिन्यापासून संधी शोधत होते.जी संधी त्यांना भाजप च्या विजयानंतर पेढे वाटले म्हणून सापडली.पूर्ववैमनस्यातून अगोदरही भांडण झाले होते,घरावर देखील दगडफेक करण्यात आली होती.तेव्हा रामकोला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती मात्र पोलीस स्टेशन ने कोणतीही कारवाई न केल्याने टोळक्याला धीर आला आणि त्यांनी बाबरला बेदम मारहाण करून त्याला छतावरून खाली फेकून दिले.यात तो गंभीर जखमी झाला.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.यानंतर बाबरच्या पत्नीने आरोपीविरुद्ध रामकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गरीब परिस्थितीत जगत होतं कुटुंब
बाबरच्या घरी आता मिडियाची गर्दी होत आहे.बाबरच घर कच्च्या विटांचं दिसत आहे..भिंतीवर भाजपचा झेंडा लावलेला दिसतो.
आई सुद्धा अत्यंत गरीब दिसते.अंबवा चौकात बाबर चिकन विकण्याचं काम करत होता,
त्याच्या एका भावाचा १२ वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे,तर दुसरा भाऊ मुंबईत टेलरचं काम करतो.
आरोपीना अटक
या घटनेबद्दल बोलताना कुशीनगर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील दोन आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे, त्यांची ओळख आरिफ आणि ताहिद अशी आहे. ते पुढे म्हणाले की ते मारहाणीत सहभागी असलेल्या इतरांचा शोध घेत आहेत. बाबर अली याची पत्नी फातिमा खातून ने 21 मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून आयपीसी कलम 323, 504, 452, 336 आणि 308 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोहोचलेले एसडीएम वरुण पांडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, आरोपींना अटक केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. प्रादेशिक आमदार पी.एन.पाठक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला. बाबर यांच्या पार्थिवाला प्रदेश आमदारांनी स्वतः खांदा दिला.
स्थानिक आमदार पी.एन.पाठकही घटनास्थळी पोहोचले.आमदार पी.एन.पाठक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला.आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पाठक यांनी दिले तसेच आरोपींच्या घरासमोर बुलडोझर उभा केला जाईल असा इशाराही माध्यमांशी बोलताना दिला.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे यांना विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी
जगातील सर्वात वृद्ध लोकांची यादी; भारतातील एकही व्यक्ती नाही
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
काश्मीर फाईल्स:तेव्हा कुणीही अश्रू देखील ढाळले नाहीत-उद्धव ठाकरे
व्यवस्थेचे बळी : उद्या कदाचित तुम्ही सुद्धा…..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 29, 2022 19: 25 PM
WebTitle – Muslim youth babar azam killed due to distribute sweets after bjp victory