दहशतवादी कारवायांच्या निषेधाचे सूर मुस्लिम समाजात इतके अल्पमतात आहेत की त्यांचा आवाज क्षीण पडतो.हिंदू समाजात दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश प्रकरणात जसं तुटून पडलं जातं, तसा जोश आणि संख्याबळ मुस्लिमांच्यात नसतं.’सेव्ह गाझा’ चा आवाज जितका दुमदुमतो तितका ‘बॅन तालिबान’ किंवा ‘हेल इसीस’चा आवाज अजिबातच नसतो. “दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादाला धर्म नसतो” या वाक्याचा खरा अर्थ “दहशतवाद ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसते” असा आहे.
दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या गोष्टी समाजात तीन पातळींवर होत असतात –
१. कुराणातल्या आयतींचे मुल्ला मौलवींनी लावलेले अर्थ आणि त्यांची कडवी धार्मिक शिकवणूक दहशतवाद्यांना हिंसेची प्रेरणा देतात.
२. त्यांच्या समाजातले झाकीर नाईक सारखे बुद्धिभेद करणारे स्युडोबुद्धिवादी लोक जे लोकांच्या मनाची मशागत करून कडव्या धार्मिक विचारांचं पीक येण्यासाठी मदत करतात.
३. त्यांच्या समाजातले लोक जे ‘फक्र हैं’ म्हणत दहशतवाद्यांची भलामण करतात, प्रसंगी देणग्याही देतात, अथवा बहुसंख्य लोक जे अशावेळी सोयीस्कर मौन धारण करतात.
या तीनही स्तरांवरचे लोक ‘छुपे दहशतवादी’ असतात.. यांच्या हातात बंदुका नसतात फक्त, पण डोकी ही पूर्ण बॉम्बनी भरलेली असतात.. या असल्या बावळट लोकांच्या मागे लागून अनेक तरुणांची डोकी भडकतात.. आणि हेच माथेफिरू लोक दहशतवादाचे ‘रॉ मटेरियल’ असतात.
मग अशांना ‘पोटेंशिअल टेररिस्ट’ किंवा ‘छुपे दहशतवादी’ का म्हणू नये?
क्रिकेट मध्ये पाकिस्तान जिंकल्यावर भारतात फटाके वाजवणारे आणि दाभोळकरांच्या खुनानंतर पेढे वाटणारे सामान्य लोक हे छुपे दहशतवादीच असतात.
एम एफ हुसेनच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेत चार्ली हेब्दो वरच्या हल्ल्याचे मात्र समर्थन करणारे हे छुपे दहशतवादीच असतात. (vice a versa)
26/11 च्या बाबतीत ‘फक्र हैं’ म्हणणारे आणि ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या बाबतीत ‘गर्व हैं’ म्हणणारे दोन्हीकडचे लोक हे छुपे दहशतवादीच असतात.
हे विचारांनी गंडलेले लोक असतात.आपल्या धर्मातला माणूस पकडला गेला की हेच लोक हळूच आपल्याला ‘इग्नोर’ करायला सांगतात,
किंवा मग ‘ते करतात तेंव्हा का नाहीत बोलला’, जरा ह्यांच्याबद्दल पण बोला की,
जरा त्यांच्याबद्दल पण बोला की’ असला रडीचा डाव खेळत राहतात.हे सारे लोक छुपे दहशतवादीच असतात.
इस्लाम खतरे में
आपली आवडती लोकं सापडली की ‘पुरावे द्या’ म्हणत गलका करणारे,
अन ‘त्यांना उगीच अडकवलं जातंय’ अशी भूमिका घेणारे, पण दुसरीकडचे लोक सापडले की मात्र ‘कसले पुरावे शोधता?
ह्यांना घरात घुसून मारलं पाहिजे’ असा जोश दाखवणारे दोन्हीकडचे लोक हे छुपे दहशतवादीच असतात.
हिंदू धर्माविरोधात पोस्ट टाकली की मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मांध मिटक्या मारत येतात,
पण त्यांच्या धर्माविरोधात पोस्ट टाकली की ते “आमच्या धर्माबद्दल तुम्हाला अधिक वाचायची गरज आहे” असा सल्ला देतात,
किंवा ‘आमच्या धर्माबद्दल बोलायचा तुम्हाला अधिकारच नाही’ असे सूनवतात.
‘आपला तो बाब्या अन दुसऱ्याचं ते कार्ट’ असं वागणाऱ्या या सामान्य लोकांच्या हातात बंदुका नसतात,
किंवा बंदुका घ्यायला ह्यांची फाटते म्हणून हे आपापल्या बाब्यांना समर्थन देत आपला मानसिक कंड जिरवून घेत असतात.
अशा अनेक छुप्या दहशतवाद्यांमध्ये आपण राहत असतो..
आपण आपल्या विचारांची काळजी नाही घेतली तर आपल्याही मनात एक ‘बाल दहशतवादी’ नांदू लागतो,
मग कोणाला ‘इस्लाम खतरे में’ खरं वाटू लागतं, तर कोणाला ‘हिंदू बचाओ’ साद घालू लागतं.
तोपर्यंत दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटणार नाही
“दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादाला धर्म नसतो” या वाक्याचा खरा अर्थ “दहशतवाद ही कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसते” असा आहे.. दहशतवादाला सगळे रंग असतात, आणि सगळ्या धर्मात दहशतवादी असतात.. किंबहूना, प्रत्येक धार्मिक माणूस कमी अधिक परसेंटेज मध्ये दहशतवादी विचारांचे पोटेंशिअल बाळगून असतो. आपण आत्मपरिक्षण करून पहायचे आपण किती टक्क्यांत येतो ते, आणि ते परसेंटेज शून्यापर्यंत खाली आणायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा, तरच आपण ‘सुसंस्कृत माणूस’ म्हणवून घ्यायच्या पात्रतेचे आहोत.
पण अशा छुप्या दहशतवाद्यांना जोपर्यंत “आपण ज्या धर्माच्या रक्षणासाठी आतंक माजवतोय, काफ़िरांचे प्राण घेतोय, त्या माझ्या धर्मबांधवांना त्याबद्दलचं काहीच पडलेलं नाहीये, उलट माझ्या कृत्यांबद्दल माझाच समाज माझी हेटाळणी करतोय”, हे चित्र जोपर्यंत स्पष्ट/अतिस्पष्ट उभं रहात नाही, तोपर्यंत दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटणार नाही.
भुरटा चोर असो, दरोडेखोर असो, बलात्कारी असो किंवा दहशतवादी असो.. जोपर्यंत त्यांच्या कृत्यांना समाजातून नैतिक पाठबळ (दृश्य-अदृश्य) मिळत असतं, तोपर्यंत त्यांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नसते.ती ‘वाल्या कोळ्या’ची गोष्ट सगळ्यांनी ऐकली असेलच.. कोणती गोष्ट त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते ते आपल्याला माहितीये.सध्याच्या समाजातही तसंच होतंय..
साऱ्या जगाने इस्लामी दहशतवादाविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे.
आज साऱ्या जगाने इस्लामी दहशतवादाविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे. प्रत्येक ठिकाणी यांच्याकडे संशयित म्हणूनच पाहिले जात आहे, मग ते विमानतळ असो किंवा साधं घर भाड्यानं द्यायचं असो.. हे थैमान असंच चालू राहिलं तर एक दिवस हे युद्ध प्रत्येक देशातल्या गल्लीगल्लीत लढलं जाईल.
‘ते तसं करताहेत तर आपणही संघटित झालं पाहिजे’ असा डाव टाकून आम्हाला मतं द्या म्हणणारे टपून बसलेले आहेत, त्याआधीच ‘हे असं का होतंय?’ याचा विचार प्रत्येक मुस्लिमाला करायची गरज आहे.
आज फ्रांस आहे, काल श्रीलंका ऑस्ट्रेलिया होतं.उद्या सारं जग असेल.
अगर आज ख़ामोश रहे, तो कल सन्नाटा छा जाएगा ।
BY – डॉ सचिन लांडगे
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)