उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर गेले सहा महिने कायद्याने वागा लोकचळवळ अन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर हे पाठपुरावा करत होतो. पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पालिकेने चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे,पालिका कंत्राटदाराकडून कामगारांचे होणारे शोषण आणि प्रशासन पातळीवर होणार भ्रष्टाचार याला आता काहीप्रमाणात आळा बसेल अशी स्थानिक नागरिक आशा व्यक्त करत आहेत.ना खाऊंगा ना खाने दूंगा ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची घोषणा मात्र प्रशासन पातळीवर कचऱ्याच्या डब्यात गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण
याविषयी जागल्याभारत शी बोलताना कायद्याने वागा लोकचळवळ अन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर म्हणाले की, “उल्हासनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर गेले सहा महिने मी पाठपुरावा करत होतो. या दरम्यान, महापालिकेच्या निविदेतील अटीशर्ती आणि कंत्राटी कामगार कायद्याचा अभ्यास केला आणि एका सविस्तर निवेदनाद्वारे महापालिका प्रशासन आपल्या कर्तव्याशी कसं बेईमान होत आहे, ते मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. पण प्रशासनातीलच अनेक लोक भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याने कामगारांचं आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचं काम सुरू होतं.”
उल्हासनगर कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर झुकली पालिका
बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यावर मग धावपळ सुरू झाली. प्रशासनाने चर्चेला बोलावलं. माझे मुद्दे फक्त नियम कायद्यांच्या उल्लंघनाचे होते. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून महानगरपालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही, यावर चर्चेत जोर दिला. कंत्राटदाराने वेतन दिलं नाही तर ते देण्याची जबाबदारी महापालिकेवर येते, हे साधार पटवून दिलं. कंत्राटी पद्धतीतील अनागोंदी उदाहरणांसह मांडली. आज आयुक्तांनी जे परिपत्रक जारी केलंय, ते या अनागोंदीवरच आघात करणारं आहे.
कामगारांचे कायदेशीर हक्क त्यांना प्राप्त होतील अशी आशा आयुक्तांच्या परिपत्रकातून निर्माण झालीय.
शिवाय, मोठा आर्थिक भ्रष्टाचारही बाहेर पडेल. अनेक कर्मचारी अधिकारी गोत्यात येतील.
महत्वाचं म्हणजे कामगारांना वेळेवर आणि पूर्ण पगार हातात येईल.त्याबद्दल आयुक्त अजीज शेख यांचं अभिनंदन व आभार !
अनेकांचं पाठबळ या आंदोलनामागे होतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे… आरोग्य कर्मचाऱ्यांचा ठाम निर्धार !
सर…आमची नोकरी गेली तरी पर्वा नाही, पण या लोकांना धडा शिकवा…
असं म्हणत ४५ कर्मचारी बेमुदत उपोषणात सामील व्हायला तयार झाले होते.
कालपासून इतरही विभागातील कामगार संपर्क करू लागले होते.आंदोलन पुढील घोषणेपर्यंत स्थगित केलंय. मागे घेतलेलं नाही.
कंत्राटदारांनी कामगारांच्या पगारावर डल्ला मारलाय,
त्याची वसुली करून, ज्याने घाम गाळला त्याला परत मिळवून देणं अजून बाकी आहे.
अर्थात, तेही निश्चितपणे होईलच. कायदा हाच आपला सगळ्यात मोठा आधार आहे, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे.
कंत्राटी कामगारांचं शोषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नव्याने परिपत्रक जारी करून घेणं हे पुढचं लक्ष्य आहे.
ही बातमी प्रस्थापित माध्यमात कुठेही दिसणार नाही,फक्त जागल्याभारत आणि मिडियाभारत या गरीब सामान्य वंचित शोषित वर्गांच्या बातम्या देणाऱ्या वृत्त माध्यमातच दिसेल.
संभाजी भिडे गडकोट मोहीम वादात,दुर्गंधी पसरली; कारवाईची मागणी
पल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 07,2023 11:30 AM
WebTitle – Municipality ready for discussion on the issue of Ulhasnagar contract workers