कोरोना मुळे जगाला जेरीस आणले आहे.त्यामुळे जगभरात लॉक डाउन सुरू होते.परंतु हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. काही देशांमध्ये अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली. तसेच भारतातही जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आली असून,1 फेब्रुवारी पासून मुंबई लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मिळाली आहे
अनलॉक प्रक्रियेत उद्योग धंदे आणि इतर सेवा अंशत: सुरू झालेल्या असल्या तरी
कोरोनाच्या काळात मुंबईकरांची लाईफलाइन असणारी मुंबई लोकल जी सामान्य मुंबईकरांसाठी बंद होती,
ती मात्र सुरू होण्यास उशीरच होत होता.कोरोनाच्या रुग्ण संख्येत देखील सातत्याने चढ-उतार होत असल्याने
नागरिकांनी मागणी करूनही मुंबईची लोकल मात्र सुरू करणे लांबणीवर पडत होते.
आता मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आली असून,1 फेब्रुवारी पासून मुंबई लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र सामान्य मुंबईकरांसाठी त्यातही काही नियम असणार आहेत.तसेच लोकलचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार पहिली लोकल ते सकाळी ७, त्यानंतर दु. १२ ते सायं ४ व रात्री ९ ते शेवटची लोकल, या वेळेत सामान्य नागरिकांना प्रवास करता येईल.
इतर वेळेत लोकल ट्रेन सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहील.असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
मात्र काही मुंबईकर नाराजी व्यक्त करत असून अशा गैरसोयीच्या वेळेत आम्ही कामावर कसे जाणार असे प्रश्न विचारले जात आहेत.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)