MPSC पूर्वपरीक्षा सुधारित तारीख: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा – २०२० आता २१ मार्चला घेण्यात येणार.
MPSC पूर्वपरीक्षा सुधारित तारीख – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही रविवार २१ मार्च रोजी होणार आहे.
आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.
दुसरीकडे, आंदोलनकर्त्या उमेदवार मात्र ही परीक्षा १४ मार्चलाच घेतली जावी या मागणीवर ठाम आहेत.
आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की ही परीक्षा ११ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत.
MPSC : विद्यार्थी रस्त्यावर ; राज्यसरकारमध्ये मतभेद
१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
दरम्यान परीक्षा पुढे ढकलण्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. कॉँग्रेसने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करत थेट निषेध केला असून कॉँग्रेसचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी निर्णय बदलावा असे म्हटले आहे. “एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा.. एमपीएससी परीक्षा,तारखांचा गोंधळ; नेमकं काय झालं?
हे ही वाचा.. MPSC : विद्यार्थी रस्त्यावर ; राज्यसरकारमध्ये मतभेद
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 12, 2021 13 :10 PM
WebTitle – mpsc exam revised date mpsc preliminary exam will be conducted on 21 march 2021 new date