काही दिवसांपूर्वी दिल्लीत ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे पोस्टर चिकटवण्यावरून आम आदमी पार्टी (Aam Adami Party) आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला होता.दरम्यान पोस्टर्स लावणाऱ्या पैकी सहा लोकाना अटक झाली होती,तर शंभर एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.
देशभरात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे पोस्टर्स
आम आदमी पक्षाने आता या पोस्टर्सच्या माध्यमातून मोठा हल्लाबोल करण्याची योजना तयार केली आहे.
पक्षाचे नेते आणि अरविंद केजरीवाल सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
३० मार्च रोजी देशभरात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे पोस्टर्स लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हे पोस्टर्स देशाच्या विविध भागात 11 भाषांमध्ये लावण्यात येणार आहेत. हे पोस्टर उर्दू, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तेलुगू, बांगला, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर काही भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.त्याप्रमाणे आता सगळीकडे पोस्टर्स झळकल्याचे दिसून येत आहेत.
काही दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीतील काही भागात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ अशी पोस्टर्स आढळून आली होती.
त्या नंतर दिल्ली पोलिसांकडून या पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच अनेक पोस्टर्स जप्त करण्यात आली होती.
याशिवाय आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून निघालेली एक व्हॅनही पकडण्यात आली. त्या व्हॅनमध्ये हजारो पोस्टर्स सापडले.यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटकही केली. या पोस्टर्सच्या खाली पोस्टर चिकटविणाऱ्याचे नाव लिहिलेले नाही, जे नियमांच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले होते.
पोस्टर्समुळे भाजप आणि प्रधानमंत्री घाबरले आहेत- केजरीवाल
दिल्ली पोलिसांच्या या कृतीमुळे आम आदमी पक्षात खळबळ उडाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना पोस्टर चिकटवणारे छोटे लोक असल्याचे म्हटले होते. या क्षुल्लक लोकांवर कारवाई करणे योग्य नाही. या पोस्टर्समुळे भाजप आणि प्रधानमंत्री घाबरले आहेत, असे केजरीवाल आणि इतर पक्षाचे नेते सातत्याने सांगत होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचेही ते म्हणालेत.
या पोस्टरवरून झालेल्या वादानंतर भाजप नेत्यानेही एक पोस्टर जारी केले होते. या पोस्टरद्वारे अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. ‘केजरीवाल हटाओ दिल्ली बचाओ’ असे या पोस्टरमध्ये लिहिले होते. या पोस्टरला उत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, लोकशाहीत प्रत्येकाला हे करण्याचा अधिकार आहे. पण पंतप्रधान मोदींनी लहान लोकांवर कारवाई करू नये कारण ते त्यांना शोभत नाही. पोस्टर हटवल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शनेही केली होती.
देश को बचाना है, अनपढ़ PM को हटाना है
आम आदमी पार्टी कडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर पोस्टर्सच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला जात असतानाच आणखी एक मुद्दा पुढे करून आम आदमी पार्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.देश वाचवायचा आहे, निरक्षर पंतप्रधानांना हटवायचे आहे.देशाने खूप काही सहन केले आहे, भारताच्या पंतप्रधानांनी शिक्षित असले पाहिजे. असा स्पष्ट संदेश आम आदमी पार्टी ने देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
देश को बचाना है, अनपढ़ PM को हटाना है❌
Message साफ़ है: देश ने बहुत सह लिया, भारत का प्रधानमंत्री पढ़ा लिखा होना चाहिए असं ट्विट मध्ये मेंशन करण्यात आलं आहे.
लोकशाहीचा मूलभूत आधार म्हणजे राज्यघटना, संसद, विधानसभा आणि निवडणूक व्यवस्था – सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष.
एजन्सींचा गैरवापर करून विरोधाशिवाय सत्ता चालवणे हे दाखवते की, भारत हुकूमशहाच्या ताब्यात असावा हे भाजपचे ध्येय आहे.
त्यामुळे देशाची आता निराशा होत आहे. असं आम आदमी पार्टीचे नेते गोपाल राय यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तुम्हाला काय वाटतं? मोदी हटाओ देश बचाओ हा नारा योग्य आहे का? भारत का प्रधानमंत्री पढ़ा लिखा होना चाहिए या आम आदमी पार्टीच्या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
मंत्रालयाबाहेर एकाच दिवशी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न;एक मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 30,2023 14:17 PM
WebTitle – Modi Hatao Desh Bachao posters