नागरी (लोकसेवा आयोग) परीक्षांची तयारी करून अधिकारी होणं अनेकांचं स्वप्नं असतं,त्यासाठी अनेकजण रात्रीचा दिवस करतात,महागडे कोचिंग क्लासेस लावतात,तेही हमखास यश देण्याची हमी देतात,त्यामुळे फी सुद्धा त्याच पटीत असते,मग परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर झालेला खर्च भरून काढणे अन झटपट श्रीमंत होणे सुखसोयीयुक्त चांगलं (?) आयुष्य जगणं यासाठी काही लोक भ्रष्टाचार करायला सुरुवात करतात अशी चर्चा असते,अन असे अधिकारी देखील सापडून आलेले आहेत.महाराष्ट्राप्रमाणे अनेक राज्यात त्यांची त्यांची नागरी सेवा परीक्षा केंद्र मंडळे असतात आपली MPSC तशी झारखंड ची JPSC आहे,यातून अधिकारी निवडले जातात,जे गोरगरीब जनतेची “सेवा” करतात.अशीच एक गरीब जनतेची सेवा करणारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकली.रंगेहात पकडली गेली,विशेष धक्कादायक बाब म्हणजे मॅडमनी नोकरीच्या पहिल्याच दिवशी वसुलीचा नारळ फोडलाय, बोहनी केलीय त्यामुळे हे प्रकरण जोरदार व्हायरल होतंय.सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या लागत नाहीएत अनेक दिवस झाले भर्ती बंद तर दुसरीकडे पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी असे कारनामे करणारे तरुण अधिकारीही पाहायला मिळत आहेत.
झारखंड लोकसेवा आयोगातून निवड झालेल्या कोडरमामध्ये तैनात असलेल्या सहकार विभागातील कोडरमा सर्कलच्या सहाय्यक निबंधक मिताली शर्मा यांना शुक्रवारी (07-07-2023)लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हजारीबाग पथकाने 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. मिताली शर्मा (वडील मुकेश शर्मा), बडा बाजार, हजारीबाग येथील रहिवासी असून कोडरमा व्यापारी मंडळ सहयोग समिती लिमिटेडच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रामेश्वर प्रसाद यादव (रा. गरहाई पथलडीहा) यांच्याकडून आपल्या कार्यालयातच लाच घेताना सापडली.Mitali Sharma arrested red-handed while taking bribe on first day of posting
20 हजार रुपयांची मागणी होती
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर प्रसाद यादव यांनी एसीबीला एक अर्ज दिला होता, ज्यामध्ये त्यांनी कोडरमा व्यापारी मंडळ सहयोग समिती लिमिटेडच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य असल्याचे म्हटले होते. कोडरमा व्यापारी मंडळ ही बियाणे वितरणासाठी नोडल एजन्सी आहे.16 जून 2023 रोजी सहकार निबंधक मिताली शर्मा यांनी व्यापार मंडळाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी खुलासा मागितला. या संदर्भात रामेश्वर प्रसाद यादव सहाय्यक निबंधकांना भेटायला गेले असता, मॅडम यांनी खुलासा टाळायचा असेल तर 20 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
रामेश्वर प्रसाद यादव यांना मिताली शर्मा ला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी कारवाईसाठी एसीबी हजारीबागच्या पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली, आणि त्यांना निवेदन दिले.अर्जाची पडताळणी केल्यानंतर एसीबी हजारीबाग पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०५/२३ दाखल करण्यात आला.त्यानंतर एसीबी हजारीबागच्या दंडाधिकार्यांच्या उपस्थितीत एसबीच्या सापळा पथकाकडून शुक्रवारी मिताली शर्मा हिला दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
मिताली शर्मा चं स्वप्न खूप मोठी आणि खूप लवकर श्रीमंत व्हायचं होतं
याआधी 27 जून रोजी एका वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हजारीबाग पथकाने 500 रुपयांची लाच घेताना अटक केली होती.
एसीबीने 11 दिवसांत जिल्ह्यात ही दुसरी कारवाई केली आहे.
हजारीबागची रहिवासी असणाऱ्या मिताली शर्मा ची ही पहिलीच पोस्टिंग होती.
मिताली शर्माच्या मित्रांच्या मते मिताली शर्मा चं स्वप्नं खूप मोठी आणि खूप लवकर श्रीमंत व्हायचं होतं.
ती अभ्यासात देखील हुशार होती.मिताली शर्माला ज्या पद्धतीने रंगेहात पकडले गेले
त्यामुळे 7व्या JPSC मध्ये निवडलेल्या सह-अधिकारींनाही लाज वाटली.
सरकारकडून तिला सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात होत्या, पण अतीलोभाने तिला अशा ठिकाणी पोहोचवले.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 17,2023 | 16:15 PM
WebTitle – Mitali Sharma arrested red-handed while taking bribe on first day of posting