खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी शाळेला सातत्याने सहकार्य करत असल्यामुळे शाळेच्या माध्यमातून चिंचवली गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते Milind Kamble Chinchwalkar मिलिंद कांबळे चिंचवलकर व त्यांच्या सहचारिणी शोभा कांबळे चिंचवलकर या उभयतांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. नम्रता कोलते अन् सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भालेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. डाबेराव पवार, सह शिक्षक श्री. गोरखनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या श्रीम. साक्षी भालेकर, श्रीम. दर्शना गुरव अन् विद्यार्थी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत ते पाच मुली दत्तक
मिलिंद कांबळे चिंचवलकर यांनी श्री. बाळकृष्ण जाधव यांच्या वतीने तत्कालीन राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर सरांच्या माध्यमातून शाळेचे कंपाऊंड व गेटसाठी पाच लाख रुपये खासदार निधी मिळवून दिला असून, शाळेला महापुरुषांचे २० फोटो, शाळेच्या डागडूजीसाठी १० हजार रुपये, ग्रीन बोर्डसाठी १,६५० रुपये, शाळेसाठी १२ लिटरचा कुकर, गॅस शेगडी, मिक्सर अन् भित्ती चित्रासाठी मदत असे सहकार्य केले आहे.
तसेच बालवाडीला स्टेशनरीसाठी कपाट देणार असून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत ते पाच मुलींना दत्तकही घेणार आहेत.
त्यांच्या सहकार्याबद्दल शाळेच्या शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी आभार व्यक्त करुन,
सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भालेकर यांनी त्यांच्या कार्याच कौतुक केले.
मिलिंद कांबळे चिंचवलकर यांचं सामाजिक योगदान
आयु.मिलिंद कांबळे चिंचवलकर हे आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक असून सामाजिक, प्रबोधनात्मक विषयांवर त्यांनी विविध वृत्तपत्रांतून लिखाणही केले आहे. सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपत त्यांनी आजतागायत अनेकांना मदतीचा हात दिला असून, काही दानशूर मान्यवरांच्या माध्यमातून अनेकांना मदतही मिळवून दिली आहे. वृत्तपत्र लेखन सामाजिक, विधायक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. चिंचवलकरांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 10,2023 19:54 PM
WebTitle – Milind Kamble Chinchwalkar felicitated by Chinchwali Madhliwadi School