भारतात लोकशाही आहे,आणि भारताचे धोरण वेलफेअर स्टेट म्हणजेच कल्याणकारी राज्याची संकल्पना यावर आधारित आहे.स्वातंत्र्य मिळल्यापासून आपण हे धोरण अवलंबले आहे.या धोरणानुसार सरकारी रेशन दुकानात रास्त भावात धान्य उपलब्ध करून दिले जाते.कोरोना महामारीच्या काळात देशातील गरीब जनतेला मोफत धान्य वाटप करण्यात आले होते,नंतर ही योजना पुढे चालू ठेवण्यात आली आहे.2 रु किलो दराने गरिबांना धान्य उपलब्ध करून दिले जाते.मात्र काही ठिकाणी गैरफायदा घेत ज्यांची ऐपत असते असे लोकही अशा स्वस्त धान्यांचा वापर करण्यास धजावतात,यामुळे गरजू लोक मात्र वंचित राहतात.आता तर सरकारी रेशन घेण्यासाठी चक्क मर्सिडीज या महागड्या गाडीतून लोक यायला लागलेत असे चित्र समोर आले.आलिशान मर्सिडीज गाडीतून आलेल्या व्यक्तीने धान्याची पोती गाडीच्या डिकीत टाकतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सरकारी रेशन घेण्यासाठी आणली मर्सिडीज?
Man taking Government ration in Mercedes: डिजिटल युगात सगळं डिजिटल झालं आहे. बातम्या घटना सगळं काही आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतं,प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे सगळेच घडणाऱ्या घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सज्ज असतात,असाच एक व्हिडिओ पंजाबमधील होशियारपूरमधून समोर आला आहे. येथे एक व्यक्ती मर्सिडीजमध्ये स्वस्त रेशन घेण्यासाठी आली होती. त्यांनी बाहेर मर्सिडीज उभी केली. मर्सिडीज चालवणारा माणूस रेशन दुकानाकडे गेला.तिथून त्यांनी काही धान्य पोती घेऊन मर्सिडीजच्या डिकीमध्ये घालतानाची घटना व्हिडिओ मध्ये कैद झाली.या मर्सिडीजचा नंबरही व्हीआयपी होता.
सरकारी रेशन घेण्यासाठी चक्क मर्सिडीज कार आणल्याने हा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाला.अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं,तर अनेकांनी ट्रोल करायला देखील सुरुवात केली.यामध्ये गोदी मिडिया सुद्धा मागे नव्हता,त्यांनी तर सत्य समोर आलेलं असतानाही घटनेला ट्विस्ट करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न केला.
आजकाल इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा कुणीही त्यांच्या मागचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही,दुसरी बाजू बघत नाहीत.आपल्यासमोर ज्या पद्धतीने व्हिडिओ चित्रित करून ठेवला आहे तेच आणि तेवढेच सत्य आहे असं मानून लोक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात.यावेळीही ते झालेच,अनेकांनी मर्सिडिज मध्ये आलेला गरीब असा उपहास करत प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र झी न्यूज मध्यप्रदेश अन अशा अनेकांनी तर बातमीचे वार्तांकन करताना
सत्य उघड होऊनही आपल्या पद्धतीची मत त्याच्यात ठळक करण्याचा प्रयत्न केला.
सरकारी रेशन घेण्यासाठी आलेल्या मर्सिडीज च्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
सरकारी रेशन घेण्यासाठी आलेल्या मर्सिडीज च्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य असं की रेशन घेण्यासाठी मर्सिडिज आली जरूर पण तिचा मालक कुणी दुसराच आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये मर्सिडीज कारमध्ये रेशनच्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचं नाव सुमित सैनी असून एका वृत्त वाहिनीचे त्याच्याशी बोलणे झाले असता त्याने सांगितले की, व्हिडीओत दिसणारी गाडी त्याच्या शेजऱ्याची आहे, हा शेजारी सध्या राहायला परदेशात आहे आणि गाडी त्याच्या घराजवळ उभी असते, त्याच्या घराची देखभाल सुद्धा सुमित सैनी हेच करत आहेत.दुसऱ्या व्हीडिओत सुमित पत्रकाराला एका मोठ्या घराजवळ उभी असलेली मर्सिडिज कार दाखवतात आणि घरही दाखवतात याशिवाय मर्सिडिज कारचे पेपर आरसी बुकही दाखवतात ज्यावर मालकाचे नाव हर्षवर्धन शर्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता गोष्ट खरी आहे सरकारी रेशन घेण्यासाठी सुमित सैनी हे त्या मर्सिडीज कारने आले,मात्र असं कोणत्याही वाहनाने जे आपल्या मालकीचे नाही अशावेळी तो गुन्हा ठरत नाही.मात्र अशी व्यक्ती जर सरकारी निकषात बसत नसेल आणि ती अशाप्रकारे गैरवापर करत असेल तर सरकारी यंत्रणेने त्यावर जरूर ती कारवाई सुद्धा केली पाहिजे.
अंबानी ची कमाई तासाला 90 कोटी;दुसरीकडे मजुरांनी केलेल्या आत्महत्या
टाटा ग्रुप चे सायरस मिस्त्री यांचा अपघात कसा झाला? गाडीचे फोटो आले समोर
आज प्रधानमंत्री मोदींवर टीका केल्याने तुरुंगात जाण्याचा धोका आहे – माजी न्यायाधीश
मोफत धान्य घोषणा राजकीय आणि कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात,जाणून घ्या
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 08,2022, 14:40 PM
WebTitle – Mercedes brought to take government ration; viral video behind the truth