Kawad Yatra 2023 : मेरठ मध्ये हायटेंशन वायर मुळे कावड घेऊन जाणाऱ्या कावड यात्रेकरू भक्तांच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा जागीच विजेचा धक्का लागून भाजून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर भाजल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ परीक्षितगड रोडवर असलेल्या राली चौहान गावासमोरील कंवर कॅम्पच्या वरती हाय टेंशन वायर पडली, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा यांनी ५ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय.
हायटेंशन लाईनला कावडिया भक्तांच्या डीजेची धडक बसली
मेरठ येथे कावड घेऊन जाणाऱ्या कावडिया भक्तांचा डीजे हायटेंशन वायर ला टच झाला होता,
या घटनेनंतर कावड भक्तांसह संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.
भावनापूरमधील किला रोडवरील राली चौहान गावातील ही घटना आहे.
हायटेंशन लाईनला कावडिया भक्तांच्या डीजेची धडक बसली
आणि करंट पसरल्याने अनेक कावडीयाचा जळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
यासोबतच अनेक कावडे गंभीर जखमी असल्याची माहिती झाल्याचीही बातमी समोर आली आहे.
हरिद्वारहून कावड आणणाऱ्या एका शिवभक्ताने सांगितले की,
कावड यात्रा गावात प्रवेश करत असताना वरच्या हायपर टेंशन विजेच्या तारेला गाडीच्या टपाचा स्पर्श झाला
आणि करंट लागून जागेवर अनेकांना शॉक लागला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.हे सगळे तरुण राली चौहान गावातील स्थानिक रहिवासी आहेत.
सरकारी नोकरी आणि एक करोड द्या समाजवादी पार्टीची मागणी
मेरठमध्ये कावड यात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून यात्रेकरूंचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद बातमी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! यूपीच्या भाजप सरकारने या घटनेमागे सरकारी गैरकारभार जबाबदार धरून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 1 सरकारी नोकरी आणि प्रायश्चित्त म्हणून 1 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी.अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
मेरठ एक्सप्रेस हायवेवर शाळेची बस रॉंगसाइडने सुसाट ; 6 जणांचा मृत्यू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 16,2023 | 13:50 PM
WebTitle – Meerut High tension wire current 5 Kavad devotees death, many burnt