मेरठ च्या किठौर पोलीस स्टेशन परिसरात मणिपूरसारखी घटना समोर आली आहे.मुलीचे लैंगिक शोषण करून तिचा न्यूड व्हिडिओ बनवला. Meerut Girl gang-raped in jungle बलात्कार करून व्हिडिओ बनवल्यानंतर मुलीला बेदम मारहाण करण्यात आली.त्यानंतर नराधम आरोपींनी हा व्हिडिओ मुलीच्या भावाला पाठवला. पीडितेच्या आईने हा संपूर्ण प्रकार मेरठ च्या पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
बलात्कारानंतर आरोपीनी व्हिडिओ बनवला
मेरठ मधिल किठोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहणाऱ्या शाकीरचा मुलगा जाहिद याने लग्नाच्या बहाण्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर आरोपीने पीडित तरुणीचं लैंगिक शोषण करत अत्याचार करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांपूर्वी जाहिद ने मुलीला काही नशेचे पदार्थ पाजून जंगलात नेले.त्यानंतर जाहिद, रियासत, पप्पू, गुलजार यांच्यासह अज्ञात तरुणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.एवढेच नाही तर तरुणीचे कपडे फाडून तिचा नग्नावस्थेचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये मुलगी आरोपीसमोर विनवणी करताना दिसून येते आहे, मात्र आरोपीनी तिच्यावर कोणतीही दया दाखवली नाही.
या चार तरुणांनी एका तरुणीला नशेचा पदार्थ पाजून जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यावर त्यांनी पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर आरोपींनी पीडितेचे कपडे फाडून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तरुणी विवस्त्र अवस्थेत आरोपीसमोर कैफियत मांडत राहिली. पण आरोपींना दया आली नाही. सेक्स करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मुलीच्या भावाला व्हिडिओ पाठवला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली
घटनेनंतर आरोपीनी पीडितेला जीवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन घरी पाठवलं.यानंतर आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, सततच्या शोषणाला कंटाळून पीडित तरुणीने शारीरिक संबंधास नकार दिला. त्यानंतर एका आरोपीने सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ पीडितेच्या भावालाच पाठवला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून जाहिद, आलम आणि पप्पू यांना अटक केली. तर इतरांच्या शोध सुरू आहे.
एसपी देहात कमलेश बहादूर सिंह यांनी सांगितले की, किठौर येथील एका महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे की,
एका तरुणाने तिच्या मुलीला लग्नाच्या आमिषाने गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत आहे.
त्या तरुणाच्या मित्रांनी मिळून त्या तरुणीसोबत अश्लील चाळे करत व्हिडिओ बनवला.
3 जणांना अटक करण्यात आली आहे. 164 चे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. इतरांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 25,2023 | 11:32 AM
WebTitle – Meerut Girl gang-raped in jungle