एमडीएच मसाला जाहिराती मध्ये दिसणारा एक करारी चेहऱ्याचा वृद्ध सोशल मिडियात चर्चेचा विषय होता,मध्यंतरी त्यांच्या निधनाच्या अफवेची बातमी सुद्धा आलेली,त्यावरून मोठ्याप्रमाणावर विनोद देखिल केले जात.कारण होतं त्यांचं वय आणि या वयातही जाहिराती मध्ये फिट एंड फाईन दिसणारे आजोबा एमडीएच ची जाहिरात करत होते.
आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या 98 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.मिडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या 3 आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.पहाटे 5:30 वाजता (हृदय क्रिया बंद पडली) cardiac arrest मुळे त्यांचे निधन झाले.
मूळचे पाकिस्तान सियालकोट
भारतीय बाजारपेठेत एमडीएच मसाला किंग म्हणून दबदबा आहे. या आजोबांचा इतिहास सुद्धा रोचक आहे.
जाहिरातीत दिसणारे आजोबा,फक्त या जाहिरातीचे मॉडेल नव्हते तर तेच मालक सुद्धा होते.होय एमडीएच चे निर्माता खुद्द हे आजोबाच.
महाशय धर्मपाल गुलाठी असं या आजोबांचे नाव असून,मूळचे पाकिस्तान सियालकोट मधिल त्यांचे कुटुंब आहे.सियालकोट मध्येच त्यांचा जन्म (27 मार्च 1923 ) झाला होता.फाळणीनंतर गुलाठी कुटुंब भारतात पंजाब,अमृतसर येथे आलं.पुढे अमृतसर मधून त्यांनी दिल्ली येथे सुरुवातीला टांगा चालवणे सुरू केले.इथं तांगाभाई नामक व्यक्तीला पाहून त्यांनी मसाला विकणे सुरू केले. 1959 मध्ये दिल्लीच्या कीर्ती नगर मध्ये त्यांनी मसाल्याची पहिलं छोटं युनिट सुरू केलं. आणि नंतरचा इतिहास आणि वर्तमान आज समोर आहे.एमडीएच भारतीय बाजारपेठेत एक मोठा ब्रॅंड आहे.
महाशय धर्मपाल गुलाठी यांनी सामाजिक कार्यातही योगदान दिलेलं आहे.
2019 मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)