पुलवामा इम्रान सरकारचंच कृत्य: पाकिस्तानी मंत्र्यांनेच दिली कबुली :हाइलाईट
1 राज्य सरकारचा नवा आदेश; शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची 50 टक्के उपस्थिती अनिवार्य
राज्य सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहणारे बंधणकारक ठरणार आहे.शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन, ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शासकीय, खासगी, अनुदानित विना अनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे.
2 इथेनॉलच्या दरात वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) आजच्या बैठकीमध्ये इथेनॉलची किंमत 43.75 रुपये प्रतिलिटर वरून 45.69 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. इथेनॉलच्या किमतीत जवळपास 8 टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाची घोषणा केली.
3 “राज्यसरकार आणि बीएमसीचा ९०० कोटींचा जमीन घोटाळा”; चौकशी करण्याची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे सरकारने सत्तेत आल्या आल्या दहिसर येथील एका बिल्डरला ९०० कोटींची जमीन बहाल करण्याचा निर्णय घेतला असा आरोप भाजपानं केला आहे.
4 कांदा बियाणे निर्यातीवर बंदी
परतीच्या पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आधीपासून मुबलक व स्वस्त दरानं कांदा बियाण उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं आज कांद्याच्या बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
5 पुलवामा इम्रान सरकारचंच कृत्य: पाकिस्तानी मंत्र्यांनेच दिली कबुली
पुलवामामधला हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य आहे अशी कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी त्यांच्या संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष PTI आणि इम्रान खान यांना दिलं आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतातील पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. या घटनेत भारताचे ४० जवान शहीद झाले होते. फवाद चौधरी यांनी आता पुलवामा हल्ला हे त्यांच्या पक्षाचं आणि इम्रान खान सरकारचं यश असल्याचं म्हटलं आहे. भारताला आपण त्यांच्या घरात घुसून उत्तर दिलं असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
6 “मर्यादा ओलांडू नका”; सोशल मीडिया पोस्टसाठी नोटीस पाठवणाऱ्या पोलिसांना SC ने फटकारलं
सोशल मिडियावरील पोस्टसाठी देशाच्या एका राज्यातील पोलीस खात्याकडून दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला नोटीस पाठवण्याचे प्रकार दिवसोंदिवस वाढ असून यासंदर्भात आता थेट सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अशा प्रकारे पोलीस देशाच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या व्यक्तीला सोशल मिडियावरील एखाद्या सरकारवर केलेल्या टीकात्मक पोस्टसाठी त्रास देऊ शकत नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने पोलीस खात्यांना सुनावलं आहे. बुधवारी यासंदर्भातील एका सुनावणीमध्ये न्यायालयाने वेगवेगळ्या राज्यांमधील पोलीस खात्यांची कानउघाडणी केली.बंगाल पोलिसांनी दिल्लीमधील एका व्यक्तीला पाठवलेल्या नोटीशीसंदर्भातील खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं आहे.
7 नवरात्रातल्या गर्दीमुळे राजधानीत Corona ची दुसरी नव्हे तिसरी लाट; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
Coronavirus चे नवे रुग्ण देशात कमी होत असतानाच काही राज्यांत आणि शहरात मात्र दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. विशेषतः सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारातली गर्दी वाढत असतानाच ही Covid-19 ची तिसरी आणि मोठी लाट असू शकते, अशी चिंता राजधानीच्या (Coronavirus 3rd wave) आरोग्यमंत्र्यांनीच व्यक्त केली आहे.बुधवारी दिल्लीत एका दिवसात 5600 नवे कोरोनारुग्ण आढळून आले. ही एका दिवसात सापडलेली उच्चांकी संख्या आहे. 40 रुग्णांचा मृत्यूही नोंदवला गेला. त्यामुळे ही कोरोना साथीची तिसरी लाट असू शकते, असं जैन म्हणाले. ऋतू बदलामुळे दिवसाचं तापमान कमी होऊ लागलं आहे आणि त्यात दिल्लीतलं प्रदूषणही प्रचंड वाढलं आहे. या कारणानेही अधिक रुग्णसंख्या वाढत असेल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
8 कोरोनावरील लस डिसेंबपर्यंत मिळू शकते, भारतातील लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात
‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लसच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. लशीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
9 पदोन्नतीतील आरक्षणावर महाविकास आघाडी ठाम, कर्नाटक पॅटर्न आणणार
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम राहत सर्वोच्च न्यायालयात त्या संबंधीची बाजू भक्कमपणे मांडण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारले तर कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालिन आघाडी सरकारने अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आणि एसबीसी या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणारा कायदा केला होता. त्यानुसार पदोन्नतीदेखील देण्यात आल्या. मात्र, महाराष्ट्र प्रशासनिक लवाद (मॅट) आणि मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरविले होते. त्याला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
10 फ्रान्स मधील चर्चमध्ये घुसून महिलेचा शिरच्छेद! हल्ल्यात 3 ठार
फ्रान्सच्या नीस (Nice knife attack) शहरात एका माथेफिरू हल्लेखोराने अल्लाहू अकबरचा नारा देत चर्चमध्ये घुसून चाकू हल्ला (france terrorism attack) केला. एका महिलेचा थेट शिरच्छेद करत अनेकांना त्यानं भोसकलं. या भीषण हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. नीस शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली, कारण त्यामागे फ्रान्समध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव आहे.नीसचे मेयर ख्रिस्तियन इस्टोर्सी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. आता नीस शहराच्या चर्चमध्ये हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी या प्रकरणी तपास करत आहेत.
Jaaglyabharat.com brought to you world wide news updates
News produced by Team Jaaglya भारत
jaaglyabharat.com
===========================================
Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 23 – OCT-2020
Thanks Team Jaaglyabharat
Jaaglyabharat.com brought to you world wide news updates
News produced by Team Jaaglya भारत
jaaglyabharat.com
===========================================
Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 29 – OCT-2020
Thanks Team Jaaglyabharat