1 *लॉक डाउन इफेक्ट:* *मुंबईतील भाडे करार वाढले; मासिक भाडे मात्र घटले*
मागील वर्षी बांद्रा येथील तीन बीएचके फ्लँटसाठी सरासरी ९० हजार रुपये मासिक भाडे मिळत होते. तिथे आता ७० हजार रुपयांत भाडेकरू मिळणे अवघड झाले आहे. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे वन बीएचकेसाठी २२ हजार रुपये भाडे आकारले जायचे. मात्र, १८ ते २० हजार रुपयांत घर भाडे तत्वावर द्यावे लागत आहे. सप्टेंबर महिन्यांत मुंबई, ठाणे परिसरातील भाडे करार वाढताना दिसत असले तरी या घरांच्या भाड्यापोटी मिळणारी रक्कम १० ते २० टक्क्यांनी घटली आहे.११ महिन्यांचा करार पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण १० टक्के भाडे वाढ केली जाते. मात्र, यंदा वाढ सोडा आहे तेवढे भाडे देण्यासही भाडेकरू तयार होत नाहीत. पर्यायी भाडेकरू मिळणे अवघड असल्याने कमी भाड्यात तडजोड होत असल्याचेही ठाण्यातील इस्टेट एजंट श्रेयस महाजन यांनी सांगितले.
2 *महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी – कर्मचारी यांच्या शासकीय सेवेतील पदोन्नतीमधील आरक्षण संदर्भात वंचितचे मुख्यमंत्र्यांना पत्र*
मागासवर्गीय अधिकारी – कर्मचारी यांच्या शासकीय सेवेतील पदोन्नतीमधील आरक्षणासंबंधी मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस संदर्भात . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून महत्वाच्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती यांच्या हक्काचे पदोन्नतीमधील आरक्षण टिकविणे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अविरत प्रयत्न करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.
3 *राज्यात आता रेस्टॉरंट्स आणि बार वेळ वाढविण्यात आली.व्यावसायिक आणि ग्राहकानाही दिलासा*
हॉटेल्स, रेस्टोरंट्स आणि बार उघडे ठेवण्याच्या वेळांमध्ये आता वाढ करण्यात आली असून सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत.याअगोदर सकाळी 8 ते सायंकाळ 7 अशी वेळ होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.रेस्टोर्ंट आणि बारच्या वेळा वाढवाव्यात अशी मागणी संबधित व्यवसायिक संघटनांची होती त्यानुसार सरकारने नवा आदेश काढला आहे.
4 *शेतकऱ्याच्या प्रश्नावर वर्ध्यात ‘युवा परिवर्तन’चा राडा*
वर्ध्यात शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलकांनी उग्र रुप धारण केलं.जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ‘युवा परिवर्तन की आवाज’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी दोनदा निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने आंदोलन केल्याचा दावा संघटनेने केला आहे. जिल्ह्यात शेकडो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला मात्र सरकारी अधिकारी कामच करत नाहीत. खासगी कंपन्यांना पाठिशी घालतात असाही आरोप केला जात आहे.संघटनेने कार्यकर्ते दुपारी कृषी कार्यालयात आले आणि त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आलं नसल्याने त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयातल्या खुर्च्यांची मोडतोड केली.जाताना आंदोलकांनी अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयाला टाळे ठोकून आत कोंडून निघून गेले.
5 *MPSC परीक्षा घेतली तर वाईट परिणाम भोगावे लागतील, संभाजीराजेंचा थेट इशारा*
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत ’11 तारखेला जर MPSC ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
6 *दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, शरद पवारांनी लगावला सणसणीत टोला*
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला आहे.शरद पवार आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला आहे.
7 *नवी मुंबईतील मराठा आरक्षण बैठकीकडे फिरवली पाठ, उदयनराजेंनी धरली नाशिकची वाट !*
एक नेता एक आवाज ही घोषणा खरी ठरवत खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईत आज होणाऱ्या मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.
8 *सार्वजनिक ठिकाणं अनिश्चित काळासाठी बंद केली जाऊ शकत नाहीत, शाहीन बाग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय*
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात (CAA) शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनाप्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे की शाहीन बाग किंवा इतर काही सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते अनिश्चित काळासाठी बंद केले जाऊ शकत नाहीत. तसेच कोर्टाने, केवळ नियुक्त केलेल्या ठिकाणी निषेध करण्यास परवानगी असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवासाचा अधिकार अनिश्चित काळासाठी रोखला जाऊ शकत नाही, असे सांगितले.या प्रकरणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की सार्वजनिक ठिकाणे आणि रस्ते अनिश्चित काळासाठी बंद केली जाऊ शकत नाहीत. तसेच यावेळी सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले की जाहीर सभांवर बंदी असू शकत नाही मात्र नियुक्त केलेल्या ठिकाणीच निषेध व्यक्त व्हावे.
9 *कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार*
परतीचा मान्सून ८ आक्टोबर रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र हवामानातील बदलामुळे परतीचा मान्सून अद्यापही उत्तर भारतात असतानाच आता दुसरीकडे ९ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंतर्गत भागात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल. आणि ही स्थिती पुढचे ६, ७ दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. ८ आणि ९ आक्टोबर रोजी मुंबई ढगाळ राहील. तापमान ३३ अंशाच्या आसपास राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
10 *पॉझिटिव्ह बातमी! शर्यतीत पुढे गेली चीनी कंपनीची लस; साईड इफेक्ट्सशिवाय इम्युनिटीवर ठरली प्रभावी*
चीनमध्ये कोरोना व्हायरसची एक्सप्रिमेंटल लस सुरक्षित आणि प्रभावी ठरली आहे. ही लस चायनीज अॅकडेमी ऑफ मेडिकल सायंसेजच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीकडून विकसित करण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायलच्या सुरूवातीच्या टप्प्यात ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार १९१ स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं होतं. सगळ्या वॉलेंटिअर्सचं वय १८ ते ५९ वर्ष या दरम्यान होते.या चाचणीतील परिक्षण डेटावरून लस प्रभावशाली, सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. चीनसह अजूनही काही लसी शर्यतीत पुढे आहेत. त्यात कॅनसिनो बायोलॉजिकल, सिनोवॅक आणि बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकलद्वारे विकसित करण्यात आलेल्या लसीचा समावेश आहे. दरम्यान या लसीची चाचणी पूर्ण होण्याआधीच आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लोकांना, गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या लोकांना लस देण्याची मोहिम चीनमध्ये सुरू झाली होती. या लसीच्या सुरक्षिततेबाबत वैज्ञानिकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या चीनी कंपनीच्या चार लसी या क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहेत.
#Jaaglya_Top_10 #जागल्याभारत #Jaaglyabharat #जागल्या #jaaglya #jaglya #Jaaglya_Top_10 #MarathiNews
06 – OCT – 2020
Jaaglyabharat.com brought to you worldwide news updates
News produce by Team Jaaglya
jaaglyabharat.com
===========================================
#Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी
jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 06 – OCT-2020
Thanks Team Jaaglya
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)