1 शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्यव्यापी एल्गार
केंद्र सरकार केंद्र सरकार च्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
2 शेतकरी आंदोलनाला कॅनडाच्या पंतप्रधानांचा पाठिंबा; म्हणाले, “भारतातील परिस्थिती काळजी करण्यासारखी
भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला.
3 गॅस सिलेंडर महागले,आता 55 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार
आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर वाढला आहे. हा सिलिंडर आता ५५ रुपयांना महाग होईल.चेन्नईमध्ये १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर ५६ रुपयांनी महागला आहे.चेन्नईमध्ये त्याची किंमत आता प्रति सिलिंडर १४१० रुपयांवर गेली आहे.दिल्लीतील १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ५५ रुपयांनी वाढ झाली असून आता ती १२९६ रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय कोलकाता आणि मुंबईत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ५५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल सिलिंडरची नवीन किंमत कोलकाता येथे १३५१.५० रुपये आणि मुंबईत १२४४ रुपये आहे.
4 डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी करोनावरची लस दिली जाणार-राजेश टोपे
महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे या यादीत नाव यावं म्हणून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी फिल्डिंग लावत आहेत असाही आरोप होतो आहे. या सगळ्यावर भाष्य करत राजेश टोपे यांनी सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असं त्यांनी म्हटलं आहे.
5 कोरोना लसी संदर्भात Moderna कंपनीनं दिली GOOD NEWS
अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna Inc.) कंपनीनं आपल्या कोरोना लशीच्या (Corona vaccine)
क्लिनिकिल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल जारी केला आहे.
ट्रायलमध्ये आपली लस 94.1% परिणामकारक असल्याचं मॉडर्नानं सांगितलं आहे.
तर गंभीर कोरोनावर ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे, असा दावाही केला आहे.
6 काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून सध्या शेतकरी आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे.केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनाही आज हरयाणामधील अंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले.
कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं.आंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केले.कटारिया अंबाला येथे आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकार आणि कटारिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करायला लावूनच आम्ही थांबणार आहोत, असे शेतकरी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनाही विरोध केला आहे.
7 आमच्या देशातील अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करू नका; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची कॅनाडाच्या पंतप्रधानांना समज
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. यासंदर्भात, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिव्र प्रतिक्रिया देत, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात ट्रुडो यांना समज दिली आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव ट्रुडो यांच्या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, ‘आपल्या भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये बघितली, जी चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. अशाप्रकारच्या वक्तव्यांना कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. विशेषतः जेव्हा प्रश्न एखाद्या लोकशाही देशातील असतो. मुत्सद्देगीरीच्या पातळीवरील चर्चेला राजकीय हेतूने चुकीच्या पद्धतीने ठेऊ नये.’
8 दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली महाराष्ट्रात
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात पोहचू लागली आहे.
आज, मंगळवारी नगर जिल्ह्यातील राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्तावर उतरून
केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.
9 ‘जलयुक्त’च्या चौकशीला वेग; राज्यसरकारने दिले आदेश
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानुसार सरकारने पुढचे पाऊल टाकले असून आज यासंबंधी एक समिती गठीत करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांवर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांनी ताशेरे ओढले आहेत. त्याआधारेच या योजनेची खुली चौकशी होणार आहे. यात कामांची संख्या मोठी असल्याने नेमकी कोणत्या कामांची खुली चौकशी व्हायला हवी, याचा शोध घेण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार हे या समितीचे अध्यक्ष असतील.
10 श्रीलंकेच्या जेलमध्ये पोलिस आणि कैद्यांमध्ये धुमश्चक्री; आठ कैद्यांचा मृत्यू, ५० जखमी
श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या बाहेरील भागात असलेल्या एका जेलमध्ये कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या भीषण झटापटीत ८ कैद्यांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. काही कैदी जेलचा दरवाजा तोडून पळण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर ही हिंसक घटना घडली.काही कैदी जेलचा दरवाजा उघडून पळण्याच्या बेतात होते. यावेळी पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे तेथील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने विरोध होत आहे. अनेक तुरुंगांत कैद्यांनी काही आठवड्यांत याविरोधात आंदोलने केली आहेत. या साऱ्या विरोधात कोलंबोपासून जवळच असलेल्या महारा जेलच्या कैद्यांमध्ये असंतोषाचे वातावरण चिघळले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनी बळाचा वापर केला. यामध्ये ८ कैद्यांचा मृत्यू झाला.
Jaaglyabharat_Top_10 नियमित अपडेट्स साठी
आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा जागल्या भारत
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा फेसबुक ग्रुप
आपलं टेलिग्राम चॅनेल सुद्धा सबस्क्राईब कर टेलिग्राम
=================================================================
News date 01 – DEC- 2020
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)