1 मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देऊ’, OBC नेत्याने दिला इशारा
आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही राज्य सरकारमधील मंत्र्यांना इशारा दिला आहे. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर मंत्र्याच्या गाड्या पेटवून देऊ,’ असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. सानप हे आज बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.’मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात मोर्चे काढले असता आम्ही त्यांच्या सोबत होतो. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे. ओबीसीमध्ये अगोदरच अनेक जाती असल्या कारणाने त्यात आरक्षण पुरत नाही, ओबीसीमध्ये मारामारी सुरू आहे,’ असंही बाळासाहेब सानप म्हणाले.
2 महाविकास आघाडी सरकार बैलासारखे -नितीन गडकरी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारल सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
3 राज्यातील 8 जिल्ह्यांत बिबट्याची दहशत
सध्या राज्यातील अहमदनगर, बीड, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बिबट्याची दहशत आहे. बीडमध्ये बिबट्यानं 3 दिवसांत 2 जणांचा बळी घेतला आहे, तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बिबट्यानं बळी घेतला आहे.बिबट्याच्या भीतीनं शेतकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. शेतकऱ्यांनी रात्रपाळीला शेतात पाणी द्यायला जाणं थांबवलं आहे.
4 कोरोनामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षा उशिरा होणार
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. तर दुसरीकेडे भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत देखील प्रशाकनाकडून देण्यात आले आहेत. याचा सर्वात मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला बसत आहे. सध्या देशात ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला जात आहे. तर ९ ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास काही राज्यांमध्ये सुरूवात झाली आहे. अशात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनामुळे परीक्षाही उशिरा होणार असल्याचं जाहीर केलं. कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता १० वी आणि १२वीच्या परिक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून २५ टक्के अभ्यास क्रम कमी करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
5 कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आला आहे. शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला. त्यात दोन्ही कांद्याला प्रथम प्रतवारीमध्ये चार हजार रुपयांचा भाव मिळाला.दुसऱ्या व तिसऱ्या प्रतवारीला १००० ते तीन हजारांपर्यंत भाव मिळाला. शनिवारच्या लिलावातील भाव (गावरान)- प्रथम प्रतवारी ३१०० ते ४१००, द्वितीय १९०० ते ३१००, तृतीय १००० ते १९००, चतुर्थ ६०० ते १००० रुपये. तर (लाल कांदा)- प्रथम प्रतवारी ३३०० ते ४०००, द्वितीय २२०० ते ३३००, तृतीय ११०० ते २२००, चतुर्थ. ५०० ते ११०० रुपये. नगर बाजार समितीत शनिवारी १९ हजार २८६ क्विंटल गावरान, तर ६६६३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.
6 नियमांचं पालन केलं नाही, तर रद्द होईल गाडीचं रजिस्ट्रेशन
तुमच्या वाहनातून प्रदूषणाच्या नियमांचं योग्य पालन होत नसल्यास, तुम्हाला मोठी समस्या येऊ शकते. सरकार अशा प्रदूषण वाढवणाऱ्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकते.सरकारकडून 2021 पर्यंत प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची योजना आखली जात आहे.त्याशिवाय सरकार प्रदूषणाची तपासणीही ऑनलाईन करण्याचा प्लॅन करत आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. या नव्या प्लॅनिंगनंतर प्रदूषण चाचणी केंद्र, प्रदूषण प्रमाणपत्र, वाहन मालक आणि वाहनाची माहिती राष्ट्रीय मोटर वाहन रजिस्टरमध्ये उपलब्ध होईल.सरकारच्या नव्या प्लॅनिंग आणि नियमांनुसार, वाहन मालकांना प्रत्येक सर्व्हिसनंतर प्रदूषणाची तपासणी करावी लागेल. मोटर वाहन इंस्पेक्टर इलेक्ट्रॉनिक लिखित रुपात प्रदूषणाच्या तपासणीचे आदेश देईल.या आदेशानंतर 7 दिवसांत Pollution Under Control Certificate अर्थात PUC सर्टिफिकेट घ्यावे लागेल. असं न झाल्यास वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल.
7 मराठा आरक्षणासाठी 1 डिसेंबरला निदर्शनं, तर 8 डिसेंबरला लाँग मार्च
मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसंच इतर मुद्द्यांवरुन मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत.1 आणि 2 डिसेंबरला महावितरण कार्यालयांसमोर राज्यभर निदर्शनं तर 8 डिसेंबरला मुंबईत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे.रविवारी (29 नोव्हेंबर) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
8 ही लोकं मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी झाली आहेत; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
मराठा समाजाचं आरक्षण स्थगित होण्यास सगळेच जबाबदार आहेत. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. ही लोक मोठी नाहीत, केवळ वयानं मोठी झाली आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला.लोकांनी यांना मान सन्मान दिला, निवडून दिलं. हीच लोक वेळ आली तर खाली खेचतात. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार राहातील, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
9 हैदराबादमधली ‘निजाम संस्कृती’ संपवणार – अमित शहा
हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे.
भाजपचे संपूर्ण कॅबिनेट नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरल्याचे चित्र आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखिल रविवारी (29 नोव्हेंबर) प्रचारासाठी मैदानात उतरले.
सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये त्यांनी रोड शो करत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं.
हैदराबादमधली ‘निजाम संस्कृती’ संपवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.
रोड शो नंतर शाह यांनी पत्रकार परिषध घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली.
10 अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना अपघात; पायाला दुखापत
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये त्यांच्या उजव्या पायामध्ये क्रॅक पडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुत्र्याशी खेळत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला.
सांगितले जात आहे की, पुढील काही आठवडे तरी त्यांना आधार मिळाल्याशिवाय चालता येणार नाही.
घटनेच्या वेळी बायडेन आपला जर्मन शेफर्ड कुत्रा ‘मेजर’ बरोबर खेळत होते.
Jaaglyabharat_Top_10 नियमित अपडेट्स साठी
या लिंकवर क्लिक करून आपलं हक्काचं जागल्याभारत हे फेसबुक पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा
ताज्या घडामोडींसाठी jaaglyabharat.com हा ग्रुप जाईन करा
===========================================
News date 30 – NOV- 2020
Thanks Team Jaaglyabharat
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)