नॅशनल | डिसेंबर 11-12-2025: मराठी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर मोठा बहुमान मिळत आहे. प्रख्यात मराठी लेखक आणि प्रशासकीय सेवेत विविध माध्यम संस्थांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्य केलेले शाहू पाटोळे यांना नालंदा लिटरेचर फेस्टिव्हल (NLF) मध्ये वक्ते म्हणून विशेष निमंत्रण मिळाले आहे.Marathi Author Shahu Patole to Speak at Nalanda Literature Festival 2025
पाटोळे हे “स्थानिक ते जागतिक : साहित्यिक अनुवादाच्या बदलत्या प्रथा” या विशेष चर्चासत्रात सहभागी होणार असून या सत्राचे संचालन अदिती माहेश्वरी करतील. वक्ते म्हणून अभय के., अमर मित्रा आणि शाहू पाटोळे उपस्थित राहणार आहेत.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, डिफेन्स PRO, डायरेक्टरेट ऑफ फील्ड पब्लिसिटी, ऑल इंडिया रेडिओ आणि मुंबई दूरदर्शन या महत्त्वाच्या माध्यम संस्थांमध्ये केलेल्या त्यांच्या कारकिर्दीने त्यांना राष्ट्रीय पातळीवर विशिष्ट ओळख मिळवून दिली आहे.
त्यांचे कालातीत पुस्तक ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ या ग्रंथाने महार आणि मांग या महाराष्ट्रातील दोन समुदायांच्या खाद्यपरंपरेचे संशोधनात्मक आणि संवेदनशील दस्तऐवजीकरण करून दलित खाद्यसंस्कृतीला साहित्यिक इतिहासात अभूतपूर्व स्थान दिले. याच पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘Dalit Kitchens of Marathwada’ देशभरात चर्चेचा विषय ठरला.
नालंदा लिटरेचर फेस्टिव्हल (NLF) हा 21 ते 25 डिसेंबर 2025 दरम्यान बिहारमधील राजगीर येथील
ऐतिहासिक राजगीर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित केला जात आहे.
हा महोत्सव जशन-ए-अदब, भारतीय शास्त्रीय नृत्य केंद्र, शायनिंग मुस्कान फाउंडेशन आणि धनू बिहार
यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नालंदा विद्यापीठाच्या सहकार्याने साकारला जात आहे.
देशभर आणि विदेशातून लेखक, कवी, अनुवादक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी एकत्र येऊन
भारतीय ज्ञानपरंपरेचा, विविध भाषांचा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करणार आहेत.
नोंदणी आणि तिकीट बुकिंग NLF च्या अधिकृत वेबसाइटवर आणि BookMyShow वर उपलब्ध आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 11,2025 | 15:50 PM
WebTitle – Marathi Author Shahu Patole to Speak at Nalanda Literature Festival 2025























































