मुंबई : सोशल मिडियात नेहमीच सक्रिय असणारी आणि नेहमी वादग्रस्त विधाने करत लोकांकडून नेहमीच धारेवर धरण्यात येणारी केतकी चितळे सध्या मेंदूचा आलेख काढण्याची ट्रीटमेंट घेत आहे.केतकी चितळे स्मॉल स्क्रिनवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत झळकलेली होती.
केतकी चितळे कडून काहीही विचार न करता बेछूट बोलण्याने /लिहिण्याने ती नेहमीच लोकांकडून ट्रोल केली गेली.अनेकांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.तर काहींनी अशिष्ट भाषेचा वापर देखिल केला होता.
सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळं चर्चेत येण्याची केतकीची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर सतत टीका केली जाते.तिच्यावर आतापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. तिचे वादग्रस्त व्हिडिओ तिला नेहमीच महागत पडल्याचं दिसून येतं.आता केतकी तिने नुकतेच शेअर केलेल्या काही व्हिडिओंमुळे पुन्हा चर्चेत आलीये.
परंतु यावेळी कारण वेगळे आहे.आणि त्यामुळे कदाचित लोकाना इथून पुढे तिला ट्रोल करताना विचार करावा लागेल.गेल्या काही वर्षापासून केतकी चितळे स्वत:ला मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओज ती स्वत: शेअर करताना दिसते. पण नुकतच तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती मेंदूचा आलेख काढून घेत असल्याचं दिसून आलंय.
View this post on Instagram
मेंदूचा आलेख घेतानाचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ तिने शेअर केलाये. तिची ही पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
View this post on Instagram
मेंदूचा आलेख घेण्याअगोदर आणि घेतल्यानंतरची परिस्थितीने तीने या व्हिडिओद्वारे शेअर केलीये. ट्रीटमेंट घेतल्यानंतर केसांची आणि चेहऱ्याची कशी अवस्था होते याबद्दल ती बोलताना दिसते.तिच्या चेहऱ्यावर ट्रीटमेंट मुळे जखमा झालेल्या दिसतात.माझी त्वचा नाजुक असल्याने मला चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. मात्र अशा जखमा तुम्हाला होतीलच असे नाही असे तीने म्हटलंय.
याआधी एका शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत शुल्लक कारणावरुन भांडण करतानाचा व्हिडिओ देखील तिने शेअर केला होता.
ज्यावरुन तिला चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं.
आक्षेपार्ह अशा पोस्टमुळे तिला इंटरनेटवर नेहमीच धारेवर धरलं जातं..
अभिनेत्री केतकी चितळे हिला एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार हा आजार आहे.
या आजाराबद्दल केतकी जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असते.
या आजारामुळं समाजात कशा प्रकारचे अनुभव आले, ते अनेकदा केतकीनं शेअर केले आहेत.
हे ही वाचा.. नाटककार विजय तेंडुलकर
हे ही वाचा.. साहित्यिक नाटककार महेश एलकुंचवार
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 03 , 2021 16 : 30 PM
WebTitle – Marathi actress Ketaki chitale take electric shock in head shared post on Instagram 2021-07-03