कोल्हापूर,दि 16 : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण ( Maratha Arakshan )देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात या निकालाचे पडसाद उमटत असून, आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची हाक दिली होती.
या पार्श्वभूमीवर पहिलं आंदोलन कोल्हापूरात होत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ मोर्चात
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर कोल्हापूर येथील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी
खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चात सहभागी झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर कोल्हापूर येथे मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चात सहभागी झाले आहेत. @Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji pic.twitter.com/p1c3bBVbNT
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 16, 2021
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक मराठा आंदोलनस्थळी दाखल झाले.
छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी दिग्गज नेते उपस्थित होते.
“आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये.लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षण : घटना दुरुस्ती शिवाय पर्याय नाही संभाजीराजे भोसले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Corona Vaccine Box
First Published on JUN 16, 2021 11 : 30 AM
WebTitle – maratha-arakshan-morcha-kolhapur-live-update-2021-06-16