भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी शनिवारी सांगितले की, भारतातील शेकडो तरुण केवळ एखाद्यावर प्रेम केल्यामुळे किंवा जातीबाहेर किंवा कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध कुटुंबाबाहेर लग्न केल्यामुळे त्यांची हत्या केली जाते.अनेक तरुण (honour killings) ऑनर किलिंगमुळे मरतात. या संदर्भात, CJI म्हणाले की नैतिकता ही एक तरल संकल्पना आहे जी व्यक्तीपरत्वे बदलते. त्यांनी एका लेखाचा हवाला दिला ज्यामध्ये 1991 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांनी कसे मारले याचे वर्णन केले आहे.
प्रेम किंवा जातीबाहेर लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेक हत्या – न्या.चंद्रचूड
(CJI DY Chandrachud) चंद्रचूड म्हणाले, “लेखात म्हटले आहे की गावकऱ्यांनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांची कृती स्वीकार्य आणि न्याय्य कशी ठरू शकते? कारण ते ज्या समाजात राहत होते त्या समाजाच्या अशा प्रकारच्या आचारसंहितेचे त्यांनी पालन केले. मात्र हीच आचारसंहिता विवेकवादी लोकांनी मांडली असती का? प्रेमात पडल्यामुळे किंवा जातीबाहेर किंवा कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेकांची हत्या केली जाते.
(CJI DY Chandrachud) चंद्रचूड म्हणाले, की नैतिकतेचा निर्णय अनेकदा प्रभावशाली गटांकडून घेतला जातो.
ते म्हणाले की दुर्बल आणि उपेक्षित गटातील सदस्यांना प्रबळ गटांच्या अधीन राहण्यास भाग पाडले जाते
आणि दडपशाहीमुळे संस्कृती विकसित होत नाही.
चंद्रचूड म्हणाले, की उपेक्षित समुदायातील सदस्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी प्रबळ संस्कृतीच्या अधीन होण्याशिवाय पर्याय नाही. ते म्हणाले, “समाजातील दुर्बल घटक अत्याचारी गटांच्या हातून अपमान आणि भेदभावामुळे संस्कृतीला आव्हान देऊ शकत नाहीत.
त्याचबरोबर अलीकडच्या काळात केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचा संघर्ष सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कायदामंत्र्यांनी संसदेत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला दिला होता आणि शुक्रवारी CJI DY चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला सडेतोड उत्तर दिले.
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 19,2022, 013:00 PM
WebTitle -Many murders every year due to love or out-of-caste marriage, CJI DY Chandrachud