जयपूर : राजधानी जयपूरमधून एक मोठी बातमी आली आहे. एका दोन वर्षांच्या मुलीचा बळी जाता जाता राहिला,जीव वाचला. स्त्री तांत्रिकाने तिच्या आईच्या सानिध्यात झोपलेल्या मुलीला बळी देण्यासाठी उचलले.पण बाळाने मृत्यूला हरवलं.अन जीव वाचला.या प्रकरणाचा तपास जयपूर जिल्ह्यातील प्रताप नगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीमध्ये राहणारा विक्रम कुमार काही दिवसांपूर्वी पत्नी मनीषासोबत जयपूरला आला होता. दोघेही जयपूरच्या प्रताप नगर भागात सेक्टर २६ मध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची दोन वर्षांची मुलगीही राहत होती. पोलिसांनी सांगितले की, मनीषा भाड्याच्या खोलीजवळील रस्त्यावरील विक्रेत्याकडे कपडे धुण्याचे आणि इस्त्री करून देण्याचे काम करत असे.
तांत्रिकाने अपहरण करून नर बळी देण्याचा प्रकार
रविवारी दुपारीही ती कामावर हजर होती. आई मनिषा ने तिच्या मुलीला जवळच झोपवले होते.
बाळाची आई मनीषा काम करत होती, त्यादरम्यान एका महिलेने बाळाला उचलून नेले.
लहानगी ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबलं गेलं. पण थोड्याच अंतरावर गेल्यानंतर मुलगी जोरजोरात रडू लागली.
आईचे लक्ष जेव्हा मुलीकडं गेलं तेव्हा आपली मुलगी बेपत्ता असल्याचे तिला समजले.
तिने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता काही अंतरावर एक महिला
मुलीला घेऊन जात असून काही लोकांनी तिला पकडले असल्याचे तिला दिसले.
मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या तांत्रिक महिलेच्या बॅगेत चाकू, तेल, अंगारा आदी पूजेचे साहित्य आढळून आलेय.
नरबळी देण्याच्या उद्देशाने घरातून उचलण्यात आले
स्थानिक महिलांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आता तपास करत आहेत. प्राथमिक तपासात या संपूर्ण प्रकरणाकडे मानवी नरबळी च्या दृष्टीने पाहिले जात आहे. मात्र, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मनिषाच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेली महिला स्वतःबद्दल फारशी माहिती देत नाही.
डॉ.आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 17,2023 13:30 PM
WebTitle – mantrik-kidnapped-a-2-year-old-girl-for-the-sacrifice-failed