जालना: मनोज जरांगे पाटील यांच्या तब्बेतीबाबत मोठी बातमी समोर येत आली आहे. मराठा आरक्षण मुंबईच्या वेशीवर येऊन आंदोलन स्थगित केल्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या येत होत्या,आता गंभीर बातमी असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव असल्याची बातमी येत आहे. मात्र तरीदेखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आलीय. मराठा आरक्षण संदर्भातील सगेसोयरेची मागणी मान्य झाली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव असल्याची बातमी
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना मधील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली.अनेकदा उपोषण केलं. त्यावेळी त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आल्यानंतर हा मुद्दा राज्यात गाजला, त्यानंतर त्यांनी मराठा बांधवांना सोबत घेऊन पायी मुंबईच्या दिशेने दिंडी मोर्चा काढला. मात्र जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी अडवला गेला. त्यावेळी राज्य सरकारकडून त्यांची सगे सोयरेची मागणी मान्य केली गेली. सरकारकडून मागण्या मान्य झाल्याचे जाहीर झाल्यावर जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अजूनही सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला.आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून पाच दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा थेंबही न घेतल्यानं त्यांची प्रकृती आता खालावली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव असल्याची बातमी येत आहे. मात्र तरीदेखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आलीय. यामुळे मराठा आंदोलकांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला राज्यातील काही जिल्ह्यात चांगला प्रतिसाद पाहायला मिळत असून जालना जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन महामार्गावर मराठा आंदोलकांकडून टायर जाळून आंदोलन करण्यात आलं.
यावेळी आंदोलक मोठी घोषणाबाजी करत होते. रस्त्यावर टायर जाळल्याने दोन्हीही बाजुने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्याचे चित्र होते.त्यामुळं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महाविकास आघाडीच्या साठी दिलेला लिखित स्वरूपातील किमान समान कार्यक्रम
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 14,2024 | 11:12 AM
WebTitle – Manoj Jarange Patil’s Nose Bleed Raises Concerns About Deteriorating Well-being