मुंबई,12 : Manoj bhai sansare wikipedia मनोज भाई संसारे (55) यांचं दु:खद निधन झालं.गेल्या अनेक दिवसांपासून Manoj Bhai Sansare मनोज भाई संसारे आजारी होते.मनोज भाई लवकर गेलात.जाण्याचं वय नव्हतं,हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है ही घोषणा तुमच्याकडून ऐकत आलो.गेले कित्येक दिवस तुम्ही संघर्ष करत होतात.झुंज देत होतात.तुमचं भाषण,सुरुवातीचा अर्धा तास केवळ उद्धारकर्ते,सामाजिक क्रांती करणाऱ्या थोर महापुरुषांची नावे प्रत्येक सभेत न चुकता घेणारे तुम्ही एकमेव नेता होता.अलिकडे महापुरुषांच्या नावांचा क्रम किंवा उल्लेख संदर्भात वाद होतात पण तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज ते फातिमा बी पर्यंत सर्वच महापुरुष महामातांच्या नावांचा उल्लेख तुम्ही आवर्जून करत आला.ही शैली मी अन्य कुठेही अनुभवली नव्हती.हा एकमेव नेता होता.
मुंबईत असल्याने नाव माहित होतं लहानपणापासून ऐकत होतो.आपली भेट झाली अण्णा हजारे यांच्या राम लीला मैदान अजेंडा विरोधात मुंबईतील अन देशातील पहिलं आंदोलन झालं त्यावेळी.जेव्हा संपूर्ण देश वरपासून खालपर्यंत अन अनेक समविचारी पुरोगामी मंडळी या नादाला लागलेली असताना केवळ आंबेडकरी चळवळ एकमेव होती जीने विरोध केला,धोके ओळखले,त्या आंदोलनाचे नेतृत्व आपण करत होतात.त्यानंतर आपला संपर्क वाढला.आंबेडकरी चळवळ समाजात असणारी मरगळ दूर करण्यासाठी काहीतरी घडायला हवं होतं.ते रिपब्लिकन पुनर्बांधणी अभियान चालवून तुम्ही घडवून आणलं.त्यावेळी वडाळा डॉ.आंबेडकर कॉलेजला भेट झालेली.तिथून तुमच्यासोबत जोडलो गेलो.तुम्ही आंबेडकरी चळवळतील कलाकार मंडळी जपली.त्यांच्यासाठी फंड उभा केला.पुढील आयुष्य सुखकर व्हावं म्हणून धडपड केली.
रिपब्लिकन चळवळ पुनर्बांधणी अभियान म्हणून राज्यभर दौरे करत शेवटी कुर्ला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन या पक्षाची स्थापना झालेली.या पक्षाच्या प्रोसेस मध्ये मी अतिशय जवळून सगळ्या घडामोडी पाहात होतो,त्याचा मी एक अभ्यासक म्हणून साक्षीदार आहे.पक्षाचा अध्यक्ष ठरवण्यासंबंधीच्या बैठकीत सुद्धा मी,मित्र अमोल गायकवाड आम्ही दोघे उपस्थित होतो.पक्षातील जेष्ठ नेते आमचा आदर करणारे आमच्या वैचारिक बैठक आणि मांडणीचा आदर करणारे होते,आहेत,त्यामुळे आम्ही याचे साक्षीदार बनू शकलो.
या काळात समाजात दबावगट नव्हता.ताकद वाटावी असा राज्यपातळीवरील पक्ष नव्हता,त्यामुळे हा नवा प्रयोग माझ्यासारख्या प्रयोगशील माणसाला भावला. समाजात असलेली मरगळ यामुळे दूर होईल अशी एक आशा होती.या दरम्यान आपल्याकडील कार्यकर्ता जपण्याचे काम आपण कायम करत आला.आम्ही केवळ सभेला उपस्थित असायचो पण अशातच स्टेजवरून भाईकडून नाव घेतलं जायचं,भेटल्यावर सुद्धा गर्दीतूनही भाई आवाज देऊन विचारपुस करत असे,आणखी आवडणारी गोष्टी म्हणजे माझे त्याकाळी येणारे लेख भाई नियमित वाचत भेटल्यावर त्याबद्दल चर्चा करत.एवढं असूनही भाईंनी कधी माझ्या पक्षात ये सदस्य हो असा आग्रह कधीही केला नाही,माझा पिंड राजकीय नाही याबद्दल मी अगोदरच पूर्वसूचना केलेली,पण आंबेडकरी चळवळ समाज यांच्या भल्यासाठी आपण कायम सोबत राहिलो.मदत करत राहिलो करू ही भावना आजही आहे.
एक आठवण न सांगता थांबणे अप्रामाणिकपणा ठरेल.
फॅमची पहिली फेसबुक वॉल दादर शिवाजीपार्क येथे लावण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो,फेसबुक ची वॉल लोकांना दिसेल अशी दर्शनी भागात असणे आवश्यक होते.दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशेजारी ती जागा होती.तिथूनच प्रवेश असल्याने ती जागा योग्य वाटली,पण पोलिसांनी आम्हाला तिथं एक मिनिट सुद्धा उभं राहू दिलं नव्हतं,हे सगळं इथून उचला म्हणाले.आम्ही हताश झालो.शेवटी मनोजभाई कडे जाऊन मदत मागायचं ठरलं,भाई त्यांच्या गडबडीत होते,पण आमच्यासाठी आवर्जून आले.आम्ही म्हणालो पोलिस दादच देत नाहीत,भाईंनी पोलिसांना सांगितलं लावू द्या त्यांना,सुशिक्षित मुलं आहेत,पोलिस नमले.तेव्हापासून फॅमची फेसबुक वॉलची ती जागा फिक्स झाली,ती आजतागायत.
मी लहान असल्यापासून भाईंचा अन्नदान करणारा स्टॉल पहात आलो.त्याबद्दल कुतूहल होतं,तो कितीवर्षापासून आहे माहित नाही,
पण आजरोजी पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला,तिथं दरवर्षी दोन दिवस देशभरातून येणाऱ्या हजारो लोकांच्या अन्नाची सोय होते.
त्यातून प्रेरणा घेत आम्हीही आमच्या विभागातून अन्नदान सारखे उपक्रम राबवले.तुमचं भाषण ऐकणं एक पर्वणी होती,
तुमच्यासारख्या नेत्यांची चळवळीला नितांत गरज होती. Manoj Sansare अखेरचा जयभीम भाई.
भावपूर्ण आदरांजली
महत्वाची सुचना
रविवार14 मे सकाळी10वा
मनोज भाई संसारे यांचा अंत्यविधीसाठी राज्य व देशभरातुन कार्यकर्ते व नेते सहभागी होणार असल्याने अत्यंविधीचा कार्यक्रम बौध्द धम्म पद्धतीनुसार रविवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वा
वडाळा ते चैत्यभुमी , दादर , मुंबई येथे होणार आहे.
Manoj bhai sansare wikipedia
Manoj bhai Sansare birthdate मनोज भाई संसारे यांचा जन्म 8 एप्रिल 1968 चा.मृत्यू 12 May 2023.
Manojbhai Sansare मनोज भाई संसारे हे मुंबईतील एकमेव आंबेडकरी नगरसेवक होते,जे नेहमी स्वबळावर निवडून येत.
भाई विद्यार्थी दशेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांच्यासोबत काम करत होते.पुढे त्यांनी भाई संगारे यांच्यासोबत काम सुरू केले.भाई संगारे यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी होते.
मनोजभाई संसारे यांचं शिक्षण बीएससी पदवीधर असं आहे.
मिलिंद धुमाळे
संपादक जागल्याभारत
चर्मकार पोराने स्वतःच्या घरावर लावली बाबासाहेबांची सही
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on 12,MAY 2023, 11:58 PM
WebTitle – Manoj Bhai Sansare died at mumbai