उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य असेल, यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता.UP Madrassa National Anthem Compulsory
सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. २४ मार्च रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये नमाजाच्या वेळी सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की रमजाननंतर १२ मेपासून सर्व मदरशांमध्ये नियमित वर्ग सुरू झाले होते आणि त्याच दिवसापासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
आदेशात असे म्हटले आहे की वर्ग सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीत गायले जाईल, हे सर्व मान्यताप्राप्त, आर्थिक अनुदानित आणि बिगर आर्थिक अनुदानित मदरशांमध्ये लागू असेल. आदेशाचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भाजप नेते मोहसीन रझा यांनीही त्याचे स्वागत केले आहे. यामुळे मुलांमध्ये देशाप्रती प्रेम वाढेल, असे रझा यांनी सांगितले. शिस्त आणि देशभक्ती शिकवेल.
शिक्षक संघ मदारीस अरबियाचे सरचिटणीस दिवाण साहेब जमान खान म्हणाले, “आतापर्यंत मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी फक्त हमद (अल्लाहला) आणि सलाम (प्रेषित मुहम्मद यांना सलाम) गायले जात होते. काही मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायले जात होते, पण ते सक्तीचे नव्हते, जे आता सक्तीचे करण्यात आले आहे.
हा आदेश उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री धरमपाल सिंह यांच्या त्या विधानानंतर आला आहे,
ज्यात त्यांनी मदरशांमध्ये राष्ट्रवादाचा धडा शिकवण्याबाबत बोलले होते.
राज्यमंत्री दानिश आझाद यांनीही मदरशातील विद्यार्थी देशभक्तीने भरलेले असावेत अशी सरकारची इच्छा असल्याचे म्हटले होते.
सध्या यूपीमध्ये 16,641 मदरसे आहेत, त्यापैकी 560 मदरसे आर्थिक अनुदान घेतात.
राज्याचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री धरमपाल सिंह यांनी शनिवारी सांगितले होते की,
मदरशाचा शैक्षणिक अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित असेल. त्यात राष्ट्रवादाशी संबंधित कथा असतील.
धरमपाल सिंग यांच्याकडे यूपीमध्ये पशुसंवर्धन खातेही आहे. ते म्हणाले की यूपीच्या प्रत्येक नगरपालिकेत किमान एक गोठा असेल,
जिथे गायींची काळजी घेतली जाईल.मदरशांमध्येही राष्ट्रवादाचे धडे दिले जाणार आहेत.
राज्यातील मदरशांमध्ये मुलांना राष्ट्रवाद शिकवला जाईल, दहशतवाद्यांबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही.असेही धरमपाल सिंह यांनी म्हटलं होतं.
मदरशांमध्ये भगवा पोशाख
यूपीमधील योगी सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा म्हणतात की मौलाना आणि मदरशातील विद्यार्थ्यांनी भगवे कपडे घालायला सुरुवात केली तर त्यांच्या आयुष्यात प्रकाश येईल. ते म्हणाले की, भगवा हा योगीजींनी बनवलेला रंग नसून ती अल्लाहची देणगी आहे.अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी एनडीटीव्ही वाहिनी शी विशेष संवाद साधताना सांगितले की, ‘खुदा कसम , मला वाटते मौलाना लोकांनी जाऊन त्यांच्या अलिमांना , चांगल्या आणि मोठ्या लोकांना भेटावे आणि त्यांना भगवा म्हणजे काय हे विचारावं,ते प्रकाशाचे प्रतीक आहे हे विचारावे. त्यांनी भगवा परिधान केला तर त्यांच्या आयुष्यात प्रकाश येईल असे मला वाटते.
जेव्हा मोहसीन रझा यांना विचारण्यात आले की त्यांना मदरशांमध्ये भगवा ड्रेस कोड का हवा आहे? तेव्हा ते म्हणाले,
“मुस्लिम आधीच भगवा परिधान करतात. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना मानणारे चिश्तिया सिलसिलाचे सूफी नेहमीच भगवा परिधान करत होते. जे चिस्ती आहेत त्यांना विचारा, ते भगवे का घालतात? मोहसीन रझा हा केवळ भगव्याचा चाहता नाही.ते आरएसएसचेही मोठे चाहते आहेत.देशाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांच्या संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे म्हणतात. ते चांगले काम करत असतील तर काय हरकत आहे? असे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी म्हटलंय.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
शेअर मार्केट कोसळले,चार दिवसांत 13 लाख कोटींहून अधिक नुकसान
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 12, 2022 21:04 PM
WebTitle – Mandatory national anthem in madrassas in Uttar Pradesh, decision of Board of Education