नागपूर : बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला आपली आदर्श मानून देशातील हजारो-लाखो मुली बॅडमिंटन खेळत आहेत. कारण त्यांनाही तीच्यासारखी यशस्वी खेळाडू व्हायचे आहे. मात्र गुरुवारी इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत मोठा इतिहास घडला.जिथे अवघ्या 20 वर्षीय मालविका बनसोड ने ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालला कडवी झुंज दिली.
ज्यांना आदर्श मानले जाते त्यांना हरविणे हे एका मोठ्या स्वप्नापेक्षा कमी नाही
वास्तविक, सायनाला कडवी झुंज देत इतिहास रचणारी मालविका बनसोड ही मूळची महाराष्ट्रातील नागपूर शहरातील आहे.
ती बॅडमिंटनची उगवती स्टार आहे. नेहवालला पराभूत केल्यानंतर मालविका म्हणाली
– मी सायना ला लहानपणापासून बघतच बॅडमिंटन खेळायला शिकले आहे.त्या माझा आदर्श आहेत, त्याना पराभूत करणे माझ्यासाठी मोठ्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
नागपूरच्या या मराठमोळ्या मुलीने अनेक विजेतेपद पटकावले आहेत
मालविकाने 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील स्तरावर राज्य स्पर्धा जिंकली आहे. 2018 मध्ये जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली होती. इतकेच नाही तर तिने 2018 मध्ये काठमांडू येथील दक्षिण आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली आहे. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये तीने अखिल भारतीय वरिष्ठ रँकिंग स्पर्धा जिंकली होती. त्याच वर्षी 2019 मध्ये मालविकाने मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सिरीज स्पर्धेचे विजेतेपद सुद्धा पटकावले.डावखुरी खेळाडू असलेली मालविका बनसोड दोन-वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि पाच-वेळा विश्वविजेता ठरलेला चीनचा बॅडमिंटनपटू लिन डॅन याला आदर्श मानते.
मालविका बनसोड चा जन्म महाराष्ट्रातील नागपूर शहरातला असून वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली आहे. ती शालेय अभ्यासात सुद्धा एक हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध आहे.दहावीच्या परीक्षेत मालविकाने ९५ टक्के गुण मिळविले होते. विशेष म्हणजे परीक्षेची तयारी करत असताना तिने आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.खेळाशी शैक्षणिक अअभ्यासाची कसरत करण्याच्या तिच्या अनुभवाच्या आधारे मालविका म्हणाली की खेळ आणि अभ्यास यांना जोडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.तिच्या मते, महिला खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक प्रणालीला लवचिक बनून प्रतिसाद देण्याची गरज आहे कारण महिला खेळाडूंना देशासाठी पदक जिंकण्याबरोबरच अभ्यासही गमावायचा नाही. यामुळे क्रीडा आणि अभ्यासात महिलांसमोर कोणाचीही निवड करण्याची गरज भासणार नाही, असेही ती सांगते. मालविका बनसोड भारताची नवी बॅडमिंटन स्टार आहे.
हायपरसोनिक शस्त्र कोणती आहेत…भारताकडे अशी शस्त्र आहेत?
पुष्पा बॉक्स ऑफिस कलेक्शन: चित्रपटाची हिंदी आवृत्ती 75 कोटीजवळ
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 13, 2022 22: 52 PM
WebTitle – Malvika Bansod who made history by defeating Saina Nehwal?