वंचित बहुजन आघाडीच्या महामोर्चा चा दणदणीत विजय !
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभरातील गायरान धारक आणि SRA, BDD चाळीतील रहिवासी यांचा प्रचंड महामोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. प्रचंड पावसात हजार आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. २ लाख २२ हजारांहून अधिक अतिक्रमणधारकांना त्यांचं घर आणि शेती उध्वस्त करण्याच्या शासनाकडून आदेशाने नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. काल मुंबईतील महामोर्चानंतर या लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.
दरम्यान,काल भरपावसात हा मोर्चा सुरू असताना राज्यसरकारच्यावतीने निरोप देण्यात आला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अॅड.प्रकाश आंबेडकर आणि शिष्टमंडळाची विधानभवनात बैठक झाली.
यावेळी खालील मुद्यांवर चर्चा झाली असून सरकारने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या
१. घरांसाठी केलेलं अतिक्रमण पाडण्यात येणार नाही.
२. अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पट्टे त्यांच्या नावावर करण्यात येतील.
३. अतिक्रमण करून केलेली शेती उध्वस्त केली जाणार नाही, वा येणाऱ्या पिकांचा लिलाव होणार नाही. ज्याने शेती केली त्यालाच ते पीक मिळेल.
४. शेतीचे पट्टे शेती करणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया आपल्याकडून सुरू करण्यात येईल.मात्र यासाठी अजून लढावं लागणार आहे.
५. SRA योजने अंतर्गत ज्या झोपडीधारकांच्या झोपड्या पाडण्यात आल्या व त्या प्रकल्पांचं बांधकाम रखडलेलं आहे अशी लोकं बेघर असल्यासारखीच आहेत.असे सर्व प्रकल्प MHADA, MMRDA, CIDCO अशा सरकारी संस्थांकडे वर्ग करण्यात येतील.
६. SRA अंतर्गत बिल्डरकडून घराच भाडं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. २ – ३ वर्ष काही बिल्डरांनी झोपडीधारकांना त्यांचे हक्काचं भाडं दिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आलीय.असे प्रकल्प ज्या सरकारी संस्थेकडे जातील त्या संस्थेनं हे भाडं थकबाकी सहीत झोपडीधारकांना देण्याचं ठरलं आहे.
७. BDD चाळींच्या संदर्भातील चर्चा पूर्णत्वास पोहोचली नाही.परंतु पुढील बैठकीमध्ये हा मुद्दा पुन्हा मांडण्यात येईल.
तुफान पावसात उसळलेल्या तुफान गर्दीचा हा महामोर्चा यशस्वी
तुफान पावसात उसळलेल्या तुफान गर्दीचा हा महामोर्चा यशस्वी झाल्याचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचे व सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरिकांचे, मुंबई पोलीस व पोलीस आयुक्त यांचे आभार यावेळी त्यांनी व्यक्त केले. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अंजलीताई आंबेडकर, अशोकभाऊ सोनोने, किसन चव्हाण, डॉ. धैर्यवर्धन पूंडकर, प्रियदर्शी तेलंग, सर्वजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, अरुंधतीताई शिरसाठ, विष्णू जाधव, नीलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, शमीभा पाटील, अक्षय बनसोडे, चेतन गांगुर्डे, डॉ. क्रांती सावंत, प्रा. निशा शेंडे, अबुल हसन खान, सुनीताताई गायकवाड, परमेश्वर रनशुर आदी नेते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. अशी माहिती वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महामोर्चा केलेल्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य, BDD चाळींच्या संदर्भातील चर्चा, SRA योजने अंतर्गत
लोकमत चे संपादक आशिष जाधव म्हणाले माझ्याकडे उत्तर नव्हते
या मोर्चा संदर्भात संपादक आशिष जाधव यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “गायरान धारक व SRA/BDD चाळींच्या मुंबईकरांच्या विविध मागण्यांसाठी ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा २० हजार लोकांचा मोर्चा मुंबईत काढला. पण तो मोर्चा आणि त्याची बातमी मेनस्ट्रीम टीव्ही मिडियात ठळकपणे दिसत नाही, असा सवाल मला आज विचारला गेला. माझ्याकडे उत्तर नव्हते.”
यावरून एक गोष्ट आळशी बहुजन समाजाने कटाक्षाने पाळली पाहिजे,आमच्यासारखे छोटे छोटे पोर्टल आपण फॉलो केले पाहिजेत,
आपल्या बातम्या जिथे येतात त्यांना बळ दिले पाहिजे,आपल्याला कशी लढाई लढायची आहे? कुणासोबत लढायची आहे,हे लक्षात घेतलं पाहिजे.अडाणी भान सोडून मला काय करायचं अशा उदासीनतेमुळे आपल्याकडे केवळ मेनस्ट्रीम मिडियाला शिव्या देण्याचीच संधी मिळते,त्यात सुख न मानता स्वत:चा मिडिया उभा करा.प्रत्येकाने पुढाकार घेतला तर अशा अनेक लहान पोर्टल ना बळ मिळेल.पोस्ट शेअर करत चला.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 21,2023 | 19:42 PM
WebTitle – Mainstream media tried to suppress this protest of Vanchit bahujan aghadi