गाभा:
दिलेली माहिती अधिकृत शासकीय माहिती समजू नये.
“राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना”(सोयीसाठी “रा. गां. योजना”/RGJAY ).
“महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना”(सोयीसाठी “म. फु. योजना”/MJPJAY )
हि योजना महाराष्ट्रातील नागरिकांचा विनामुल्य आरोग्य विमा आहे असं थोडक्यात म्हणता येईल.
आणि योजना म्हंटलं कि अटी आल्या.
प्रस्तावना:
१> योजना पूर्वी म्हणजे २ जुलै २०१२ ला प्रायोगिक तत्वावर केवळ ८ जिल्ह्यात लागू करण्यात आली होती. याला Phase – I म्हणतात.
योजनेंअतंर्गत येणाऱ्या ८ जिल्ह्यांची नावे :- अमरावती, रायगड, सोलापूर, धूळे, नांदेड, गडचिरोली, मुंबई, मुंबई उपनगर(दहिसर, मुलुंड, मानखुर्द पर्यंत).
२> योजनेंअतंर्गत ९७२ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा निवडल्या गेल्यात. रुग्णाचा उपचार या ९७२ उपचारांपैकी असावा(हे वैद्यकीय सल्लागार ठरवतात).
३> २१ नोवेंबर २०१३ पासून योजना उर्वरित महाराष्ट्रात (थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्रात) राबवण्यात आली. सहाजिकच उर्वरित महाराष्ट्र Phase – II.
४> आता योजनेत ९७१ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा निवडल्या गेल्यात. (शेवटी दिलेल्या संकेत स्थळावर यादी उपलब्ध).
५>१ एप्रिल २०१७ पासून पूर्वीच्या योजनेचे नाव बदलून “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे करण्यात आले आहे.
पात्रतेविषयी बोलू.
पात्र रुग्णांना लागणाऱ्या कागदपत्रांविषयी
१> रुग्ण हा महाराष्ट्रीय असावा, तसे सिद्ध करण्यासाठी त्याकडे शिधापत्रक हवे. सोबत रुग्णाचे एखादे ओळखपत्र(मतदान पत्र, आधार पत्र, ई) देखील असावे.
२> शिधापत्रक पिवळे/केशरी असावे (केशरी असल्यास वार्षिक उत्पन्न १ लाखाहून कमी असावे.)
३ > इस्पितळात दाखल होते वेळी हे कागदपत्र(Original) त्याने सोबत घेऊन यावे व त्या इस्पितळातील योजनेच्या कार्यालयात द्यावित.
४ > रुग्णांकडे “राजीव गांधी आरोग्य पत्र”( RAAJIV GANDHI HEALTH CARD)(केवळ Phase – I मधील,Phase – II मधील आरोग्यपत्र निरुपयोगी) असल्यास त्यावर रुग्णाचे नाव व त्याचा फोटो ठळक असल्याचे निश्चित करून घ्यावे, तसेही केवळ ओळखपत्र म्हणून एखाद्या अपवादात उपयोगी अन्यथा पूर्णपणे निरुपयोगी.
५ > यांव्यतिरिक्त “अन्नपूर्णा” व “अन्तोदय” योजनेचेहि पत्रक चालतील, पण ते याच ८ जिल्ह्यांपैकी एकातले असावे.(मी अजूनपर्यंत तरी हे दोन्ही पत्रकं पाहिली नाहीत)
६>तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. (मी तरी आजवर एकही शुभ्र शिधापत्रिका धारक लाभार्थीला भेटलेलो नाही)
पात्र उपचारांविषयी
१> रुग्णाचे केवळ कागदपत्र पात्र असून उपयोग नाही तर त्याचा उपचार देखील ९७१ पैकी असावा तरच तो लाभार्थी ठरतो.
२> उपचारांचे दोन वर्गात वर्गीकरण करता येईल “नियोजित उपचार(ठरवून केले जाणारे)” व “आपत्कालीन उपचार”.
३> उपचार नियोजित असल्यास रुग्णालयात दाखल होते वेळीच कागदपत्र दाखवून नाव नोंदनी करून घ्यावी.
उपचाराकरिता लागणारी शासकीय मंजुरी/ अनुमती येण्यास ६-२४ तास लागू शकतात.(सर्व बाबी बरोबर असल्यास).
४>आपात्कालीन वेळेत रुग्णाला दाखल करतेवेळेस उपचार योजनेत करायचे आहेत असे रुग्णालयाला सांगावे. आपात्कालीन उपचार केले जातात व कागदपत्रांचे सोपस्कार पार पाडण्यास रुग्णाच्या नातेवाईकांना ७२ तास दिले जातात.
रुग्णांना रुग्णालयात आल्यावर येणाऱ्या अडचणी
१> सर्वप्रथम रुग्णांना आपण या योजनेत मोडतो कि नाही हेच माहित नसतं.
२> योजनेची माहिती असली तरीही बरेच रुग्ण/रुग्णाचे नातेवाइक दाखल होते वेळी नाव नोंदणी करून घेत नाहीत व इस्पितळातून discharge च्या वेळेस राजीव गांधी आरोग्य पत्रक दाखवून केलेला खर्च परत मागतात(गुंठा मंत्री/भाऊ/ आबा/ आप्पा/ यांची ओळख सांगणारे) .
३> ऐन वेळेस शोधून आणलेले जीर्ण झालेले कागदपत्र .
रुग्णांनी/नातेवाईकांनी घ्यावयाची खबरदारी
१> रुग्णाला इस्पितळात दाखल केल्यावर त्याचे कागदपत्र (Original ) घेऊन त्या रुग्णालयातील योजनेच्या कार्यालयात नोंदणी करवून घेने.
२> नोंदणी करवून घेतल्यावर नोंदणीच्या दाखल्यासोबत एक (आणखी एक किंवा नोन्दनिच्याच दाखल्यावर मागील बाजूस) दाखला दिला जातो(PREAUTH/PREAUTHORISATION ).
३> हा अतिरिक्त दाखला (PREAUTH ) रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सल्लागाराने भरावयाचा असतो.
४> हा दाखला (PREAUTH ) वैद्यकीय सल्लागाराकडून लौकरात लौकर भरवून घेण्याचे काम रुग्णाचे/नातेवाईकांचे असते. जर लागणारा उपचार योजनेंअतंर्गत येत असेल तरच वैद्यकीय सल्लागार हा दाखला भरतिल.
५> नंतर हा भरलेला दाखला (PREAUTH ) पुन्हा “म. फु.” कार्यालयात देणे (हा दाखला शासनाकडून उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी असते).
६> कार्यालयात दिल्यानंतर कार्यालयातून याच दाखल्याचे संगणकीकृत तीन पाने दिली जातात ज्यावर योजनेचे वैद्यकीय सल्लागार (Medical Co -ordinator) सही करतात.
७> शासनाकडून सर्व बाबी तपासून त्वरित अनामत रक्कम मंजुर केली जाते .
८> या मंजुरीत रक्कम व उपचार या दोन्ही गोष्टी नमूद असतात.
९> हि रक्कम रुग्णांना न भेटता ती इस्पितळास मंजूर होऊन येते.
*(क्रमांक २ ते ६ रुग्णालयाच्या सोयीसाठी असल्याने प्रत्येक रुग्णालयात असे होतेच असे नाही, काही रुग्णालये हे सर्व स्वतः करून रुग्ण/नातेवाईकांची स्वाक्षरी घेतात.)
रुग्णांना भेटणाऱ्या वैद्यकीय सेवेचे स्वरूप
रुग्णालयातील वास्तव्य
निदान सेवा
भूल सेवा व शस्त्रक्रिया
आवश्यक औषधोपचार
शुश्रुषा व भोजन
एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च.
प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत, केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपानासाठी २.५ लाख रुपये पर्यंत मदत. (प्रती वर्ष )
योजनेची माहिती/मदत व अन्य कोणत्याही मदतीकरिता रुग्ण/नातेवाईक म. फु. योजनेचे कर्मचारी ज्यांना आरोग्यमित्र म्हणतात त्यांची मदत घेऊ शकतात.
आरोग्यमित्र हे २४ तास मदतीस उपलब्द्ध व तत्पर असतात.
कुठल्याही वेळी सेवा केंद्राशी सहाय्यते साठी संपर्क साधता येईल. ह्याचाशी निगडीत दूरसंचार क्रमांक खालील प्रमाणे :
निशुल्क सेवा माहिती : १८०० २३३ २२ ००/१ ५ ५ ३ ८ ८ .
या क्रमांकावर संपर्क करून जवळच्या इस्पितळाविषयी चौकशी करू शकतो आणि संकेत स्थळ इथे.
इतर काही मदत लागल्यास मी आहेच.
स्टँड अप इंडिया अनुसूचितजाती व बौद्ध समाजाच्या घटकांकरिता योजना
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)