डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरु क्रांतिसूर्य जोतीबा फुले यांच्या वैचारिक चळवळीस सैद्धांतिकरित्या मूर्त रूप दिलं. केवळ सामाजिक व्यवस्थेतील दोषच दूर करण्यावर या दोघांनी भर दिला नाही तर समाजाच्या अनुषंगाने इतर क्षेत्रातही आपले भक्कम योगदान दिलेलं आहे.आज शेती प्रश्न अतिशय बिकट झाला आहे.शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत,दुष्काळ आक्राळविक्राळ रूप अनेकांचा घास घेतोय.
शेतकऱ्यांचा आसूड
शेतकऱ्यांच्या तळमळीतून ज्योतीबांनी १८८3 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” नावाचा ग्रंथ लिहिला.
हा ग्रंथ वाचला असता असे लक्षात येते कि इथल्या समूहांना जसे इंग्रजांनी छळले
त्याहीपेक्षा किंबहुना जास्त शोषण आणि छळवणूक हि त्यावेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने केली होती.
या ग्रंथात शेतीविषयक व्यावसाभिमुख शेतीचे संकल्प चित्र आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ज्योतीबांनी सामाजिक,आर्थिक,राजकीय
आणि व्यावसायिक अनुषंगाने समस्या आणि उपाय सुचविले होते.
शेतकऱ्यांचे कर्ज,दुष्काळ समस्या आणि नियोजन,नापीकी,पीक पद्धती,शेती संरचना, शेतमालाची लुट करणारे दलाल
आणि व्यापारी सावकार आणि एकूणच या सर्वातून नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या यावर उपाययोजना सुचवल्या होत्या.
शेतीच्या व्यवसायाला इतर उद्योगांची जोड दिली पाहिजे असे त्यांचे मत होते.
शेतीसाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी,पाण्याचे दुर्भिक्ष आज प्रचंड प्रमाणात आहे.
शेतीसाठी पाणी
त्यावेळी फुले यांनी शेतीच्या पाण्यासाठी धरणे,विहिरी,तलाव कॅनॉल बांधले पाहिजेत असे सुचवले होते.
पावसाचे पाणी अडवून त्या पाणीसाठ्याद्वारे कायमस्वरूपी सिंचन सुविधा निर्माण करण्याविषयी सांगितले.
जवळ जवळ १३२-३३ वर्षे अगोदर त्यांनी शेतमालाला योग्य भाव देण्याविषयी मत मांडले होते,
हा ग्रंथ शेतीसाठी किती उपयुक्त आहे याचे अनुमान यावरून करता येवू शकते.
दुर्दैवाने आजही यातील एकही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही असे म्हणता येईल.
बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दृष्टीकोनातून पुढे आपल्या विचारांची दिशा दृढ केली.
शेतजमीनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे असा विचार त्यांनी मांडला.
तसेच सर्व शेती हि सामुदायिक पद्धतीने म्हणजे कलेक्टिव्ह पद्धतीने करावी असे सुचवले होते.
ज्योतीबांनी सावकार दलाल यांवर आसूड ओढला बाबासाहेबांनी तोच विचार पुढे नेत
खोती पद्धती विरोधी बील मंत्रीमंडळात सादर करून ती जुलमी शोषण पद्धती कायमची बंद केली.
शेतीकरिता जमीन आणि पाणी हे दोन मुख्य घटक आहेत.शेतजमीन आहे परंतु पाणी नाही अशी परिस्थिती यासाठी बाबासाहेबांनी नदीजोड प्रकल्प सुचवला.दुष्काळावर मात करायाची असेल तर पाण्याचे नियोजन अत्यावश्यक ठरते. यातून साकार झाला “दामोदर खोरे परियोजना प्रकल्प”
अणुउर्जेने पुरावर नियंत्रण
भारतातील थोर शास्त्रज्ञ डॉ होमी जहांगीर भाभा बाबासाहेबांचे खूप जवळचे मित्र होते.बाबासाहेब कामगार मंत्री असताना त्यांच्याकडे जास्तीचे सिंचन / पाटबंधारे खाते सुद्धा होते,एकदा बाबासाहेबांनी स्थापत्य अभियांत्रिक (सिविल)सी.एस.पिलाई यांचा “अणुउर्जेने पुरावर नियंत्रण” हा लेख वाचला, यापूर्वी बाबासाहेब अणु उर्जेच्या वापराच्या संशोधनात होतेच.
आपल्या काही लेक्चर्समध्ये त्यांनी हा पर्याय सुचविला सुद्धा होता. महापूर किंवा पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचे आतापर्यंत अमलात आणलेले सर्व पर्याय फसलेले असताना या सर्व धर्तीवर भारतीय इंजिनिअर्स अणूउर्जेच्या पर्यायाकडे का पाहत नाहीत? असे विचारताना त्यांनी १० सप्टेंबर १९५४ च्या Bombay Contemporaryया वृत्त पत्राचा दाखला दिला, तसेच ” Atomic science to the rescue ” या मथळ्याखाली आलेल्या माहितीपर लेखाबद्दल उपस्थितांना प्रबोधित केले बाबासाहेब नेहमीच नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध आणि त्याचा मानवी आयुष्यातील उपयोग आणि फायदे यांचा खुल्या मानाने स्वीकार करत असत, त्यांचा सतत नवनवीन शोध आणि पर्यायांचा अभ्यास सुरु असायचा या विषयाला फक्त चर्चेत न सोडता बाबासाहेबांनी यावर संशोधन करत असलेल्या पिलाई यांच्या कडून अणु ऊर्जेबद्दल आणि तिचा पूरनियंत्रण करण्यास कसा उपयोग करता येईल यावर सखोल चर्चा करून माहिती मिळवून घेतली.
ओहमचा नियम
अणुऊर्जेद्वारे आपण पूरसंकटांवर कायमचे उपाय तयार करू शकतो असे त्यांना समजल्यावर त्यांनी तशी मांडणी सुरु केली, आपल्या एका व्याख्यानात ते म्हणतात, ” अणुउर्जा आणि तिचा वापर समजून घेणे खूप सोपे आहे, ज्यांना विद्युत उर्जेच्या विघटना वरील ओहमचा नियम माहित आहे त्यांना हे समजून घेणे अगदीच सोपे आहे” आण्विक भट्टीमधून अतिवेगवान न्यूट्रोन्सच्या मदतीने आपण नदीच्या पाण्याचा प्रवाह तसेच पाण्याचा स्तर मर्यादित ठेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने पुराच्या पाण्याला आपल्याला हवं तसं नियंत्रित करता येऊ शकेल तसेच नको असलेले जास्तीचे पाणी तिथल्या तिथे वाफेत रुपांतरीत करता येऊ शकते” एखाद्या प्रख्यात वैज्ञानिकाप्रमाणे ते अगदी सोप्या भाषेत सांगत होते. नदीचा पूर हा सतत भेडसावणारा प्रश्न आहे तेव्हा सरकारने फक्त जुन्या पद्धतींवर निर्भर न राहता, शक्य तितक्या नवीन पर्याय आणि सूचनांचा त्यांनी स्वीकार करायला हवा असा इशारा सुद्धा बाबासाहेब देतात.
दामोदर नदी प्रकल्प,भाक्रा नांगल
आपल्या अनुयायांना सुद्धा बाबासाहेब हेच सांगत कि आपण एका पारंपारिक अशा ठराविक चौकटीत राहून विचार करत राहतो आणि आपल्या फायद्याच्या बऱ्याचशा नवीन गोष्टींचा पारंपारिकतेच्या न्यूनगंडामुळे स्वीकार करत नाही हे बदलले पाहिजे. साधारणात: आपण पूर आला कि बचावकार्य करणे आणि केवळ पूर ओसरण्याची वाट पाण्याशिवाय आजतरी इतर कोणती उपाययोजना राबविताना दिसत नाही.बाबासाहेबांनी सुचविलेल्या उपायांवर विचार केल्यास पुराच्या पाण्याचा आणि पाणी टंचाईचा काही प्रमाणत नक्कीच सुटू शकेल यात शंका नाही. दामोदर नदी प्रकल्प हा बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बनलेला यशस्वी आणि पहिला प्रकल्प त्यानंतर भाक्रा नांगल, महानदी, सोने आणि तुंगभद्रा नदी वरील प्रकल्प बांधण्यात यश आले.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर “उर्जा खाते ” बनवण्यात आले ,भारताने फक्त उर्जा निर्मिती वर भर न देता स्वस्त उर्जा कशी बनवता येईल आणि जनतेला पुरवता येईल याचे बाबासाहेबांनी समर्थन केले. त्यांनी अंतरराज्य उर्जा संचार जाल असावे यावर सतत भर दिला जो आजच्या पवारग्रीड या कंपनीचा पाया ठरला.बाबासाहेबांमुळे सिंचन, जल संवर्धन आणि उर्जा क्षेत्रात एक मजबूत तांत्रिक व्यवस्थापन बनण्यास मोलाची मदत झाली.
बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी कसे काय असू शकतात?
आज आपली घरे उजेडात आहेत आणि शेती हिरवीगार आहे तर ती फक्त बाबासाहेबांच्या मेहनतीमुळे, बाबासाहेबांच्या या प्रकल्पामधील उत्तम नियोजनावर भारताची अर्धी अधिक अर्थ व्यवस्था निर्भर आहे आणि यशस्वी आहे.यावरून बाबासाहेब हे केवळ दलितांचे कैवारी कसे काय असू शकतात? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
बुलढाणा अलमपूर येथे गेल्या २५ वर्षापासून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.सदर मतदार संघ हा भाजपाचा असून त्या पक्षाचे आमदार चैनसुख संचेती यांनी हे गाव दत्तक घेतलेलं आहे.गावात बहुसंख्येने असणारा समाज कुणबी माळी म्हणजेच आरक्षण गटातील ओबीसी तथाकथित वर्णव्यवस्थेत शुद्र गणला गेलेला समाज.
ज्या समाजातूनच क्रांतिसूर्य जोतीबा फुलेंनी विद्रोह केला ब्राह्मणी विचार व्यवस्था नाकारली.तोच समाज मनात ब्राह्मण्य जपत आहे, हे धक्कादायक आहे.
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)