नागपूर प्रतिनिधी- दिनांक 16 ऑक्टोबर रविवारी रोजी नागपूर येथील मनसर येथील प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ याठिकाणी नाशिकच्या
दान पारमिता फाउंडेशन तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,ह्या कार्यशाळेत नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी मधील ५० अभ्यासक उपस्थित होते.कार्यशाळेस आलेल्या अभ्यासकानी ह्या प्राचीन स्तूपाची माहिती घेऊन बुद्ध कालीन स्थापत्य कलेचा सर्व इतिहास जाणून घेतला,सहभागी सर्व अभ्यासक अगोदर धंमलिपि शिकले, शिल्पकलेचा अभ्यास केला व त्यानंतर मनसर येथे कार्यशाळेचे आयोजन करून ह्या कार्यशाळेस उपस्थित झाले.

मनसर म्हणजे मनाला सर करणारे मनावर विजय प्राप्त करणारे बुद्ध
सोशल मीडियावर ओळख असलेल्या परंतु कधीही एकमेकांना न भेटलेल्या महाराष्ट्रातील मधील अनेक धम्म भगिनी आज एकत्रितपणे अभ्यासदौऱ्यात सहभागी झाल्या होत्या,सर्वप्रथम प्रियदर्शी खोब्रागडे , डॉ.लेले हाँग (चायना) दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील खरे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला,यानंतर निर्झरा रामटेके यांनी बनवलेले असाईनमेंट डॉ लेले हाँग यांना भेट देण्यात आले.

यावेळी नागपूर, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, मधील अभ्यासकांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ प्रियदशी खोब्रागडे सर आले होते.
सम्राट अशोक कालीन स्तूप बघून तेथे विटा, शून्यागार, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असलेल्या वर्ग खोल्या,ह्या सर्वांचा अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले,मनसर म्हणजे मनाला सर करणारे मनावर विजय प्राप्त करणारे बुद्ध असा त्याचा अर्थ होतो म्हणून त्याचे नाव मनसर असे पडले असावे असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.
मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ

त्याचप्रमाणे प्राचीन बौध्द संस्कृतीचे एकूण २७०० वरील अवशेष उत्खननात प्राप्त झालेत.
यावरून प्राचीन मनसर हे बौध्द संस्कृतीचे धम्मकेंद्र हेच सिद्ध होते,
मनसर हे प्राचीन बौध्द धम्मकेंद्र सम्राट अशोक काळापासून इसवीसनाच्या सहाव्या शतकापर्यंत एकूण नऊशे वर्ष होते.
असे संशोधकाचे मत आहे.हे नालंदाच्या विश्व विद्यापीठाच्या समकालीन विद्यापीठ होते असे अनेक संशोधकांनी मत मांडले आहे.
दुपारच्या सत्रात स्नेहभोजन झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना धम्मलिपि ग्रहण केल्याचे प्रमाणपत्राचे वितरण निशुल्क रित्या करण्यात आले,
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे धम्मलिपि मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली,
परीक्षा झाल्यावर धम्मलिपिचे वर्णमाला सेट सर्व सहभागी अभ्यासकांना दान पारमिता फाउंडेशन तर्फे वितरित करण्यात आले,
तसेच गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने
एक वही एक पेन ही संकल्पना करून प्रत्येकाने एक वही व एक पेन संस्थेला भेट दिला.

निर्झरा रामटेके, प्रिती रामटेके, दिशा गायकवाड, नरेश तेलतुंबडे , अपेक्षा अमीन दिवाण, यांनी यावेळी कार्यशाळा बद्दल मनोगत व्यक्त केले,
ह्यावेळी डॉ लेले हाँग (चायना) ह्या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या व तसेच नागपूर मधील धम्मलिपि शिक्षिका निर्झरा रामटेके, अलका गवई, तेजल नंदेश्वर , वंदना ओरके, नेहा राऊत यादव, करुणा गोडबोले ,प्रीती रामटेके, अपेक्षा अमीन दिवाण, सचिन म्हस्के, सरोज माटे इंदू सोमकुवर, सीमा थुल ,कैलास सहारे,नम्रता मेश्राम, वर्षार्थी इंदूरकर,दिलीप वासनिक, प्रवीण पवार,दिशा गायकवाड, रीना खोब्रागडे, विजय धांडे, मयंक अंबादे, युवराज बर्वे, सुनंदा साबळे, शील गजभिये , मधुमती कांबळे,नीलिमा पाटील,इत्यादी कार्यशाळेस उपस्थित होते.
लुम्बिनी मध्ये लिप्यांतर केल्यामुळे बुद्धांचे जन्मस्थळ निश्चित झाले- प्रा.इंगळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on OCT 18,2022, 15:28 PM
WebTitle – Maharashtra’s largest ancient Buddhist world university at Mansar nagpur