लुंबिनी नेपाळ : भारत आणि नेपाळ चे संबंध हिमालयाप्रमाणे अतूट आहे.भगवान गौतम बुद्ध आणि माझे खास संबंध आहेत.जे एक अद्भुत आणि आनंददायी देखील आहे. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लुंबिनी,नेपाळ येथे भगवान बुद्धांच्या जन्मस्थळी बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजित खास कार्यक्रमात केले.
बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी येथे पोहोचले आणि यावेळी त्यांनी
रामापासून भगवान बुद्धापर्यंतच्या समान वारशाचा उल्लेख केला. नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देउबा यांची भेट घेण्याव्यतिरिक्त,
प्रधानमंत्री मोदींनी भगवान बुद्धांच्या जन्मस्थान लुंबिनीलाही भेट दिली, जिथे त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले.
2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे.
काय म्हणाले मोदी ?
आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध आहे, जो एक अद्भुत योगायोगही आहे.
आणि जो खूप आनंददायी देखील आहे. माझा जन्म गुजरातमधील वडनगर हे अनेक शतकांपूर्वी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र होते.
आजही तेथील उत्खननात प्राचीन अवशेष बाहेर पडत आहेत, ज्यांच्या संवर्धनाचे जतन करण्याचे काम सुरू आहे.
आणि आपल्याला माहित आहे की भारतात अशी अनेक शहरे आहेत, अनेक ठिकाणे आहेत,
ज्यांना लोक अभिमानाने त्या राज्याची काशी म्हणून ओळखतात. हे भारताचे वैशिष्ट्य आहे,
आणि म्हणूनच काशीजवळील सारनाथशी माझे नाते तुम्हालाही माहीत आहे.
भारतातील सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर ते नेपाळमधील लुंबिनीपर्यंत, ही पवित्र ठिकाणे
आपल्या सामायिक वारसा आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहेत.
हा वारसा आपण सर्वांनी मिळून विकसित करून तो अधिक समृद्ध करायचा आहे.असेही प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
या वक्तव्यावरून सोशल मिडियात ट्रोल
दैनिक जनसत्ताच्या वृत्तानुसार यानंतर सोशल मिडियात युजर्सनी प्रधानमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून ट्रोल केले.प्रधानमंत्री मोदींच्या भगवान बुद्धांशी असलेल्या संबंधांबाबतच्या वक्तव्यावर सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. स्वामी नावाच्या युजरने लिहिले की, ‘मालक, तुमचा कोणाशी संबंध नाही, फक्त ती जागा सांगा!’ संतोष यादव नामक एका युजरने लिहिलं आता असं म्हणू नका की भगवान बुद्ध जेव्हा थकत असत तेव्हा तुमच्या हातचा चहा प्यायला ते वडनगर स्टेशनला येत असत.
विजया शर्मा नावाच्या युजरने लिहिले की, ‘असे कोणी उरले आहे का ज्याच्याशी तुमचा संबंध नाही?’ हिमांशू जैन नावाच्या युजरने लिहिले की, ‘मोदीजींचा सगळ्यांशी काही ना काही संबंध जुळून येतोच आहे, फक्त मोदीजीचा सत्याशी कधीच संबंध येत नाही,दूरदूर पर्यंत संबंध येत नाही.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
एलआयसी इंडिया शेअर पहिल्याचदिवशी डाउन,लोकानी फिरवली पाठ?
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 17, 2022 20:05 PM
WebTitle – Lord Buddha and my special relationship – Prime Minister Narendra Modi