राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे. अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ कायम राहिली तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन
आणि अजून कठोर निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(lockdown is certain if the corona virus cases continues to rise health minister rajesh topes warning)
”दररोज राज्यात ३ लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता २० बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे इथून पुढे आणखी जे जे लोकं लसीकरणाची मागणी करतील, सगळे अर्ज आम्ही पुढे पाठवून मंजुरी घेऊ, आम्हाला मोठ्याप्रमाणावर लसीकरण करायचं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. त्यामुळे लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिलेलं आहे.”असं आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितलं.
आजची कोरोना रुग्ण संख्या अपडेट
राज्यात आज 30535 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11314 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2214867 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 210120 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 22, 2021 19:55 PM
WebTitle – lockdown is certain if the corona virus cases continues to rise health minister rajesh topes warning