आज Jaaglyabharat Top 10 मध्ये
महत्वाच्या बातम्या वर एक नजर…
1 Param Bir Singh Letter प्रकरणामुळे राष्ट्रवादीत खळबळ, पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक
महत्वाच्या बातम्या – मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.परमबीर सिंग पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना दिल्लीतच बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रिपद बदलण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार असून आज सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे.तर शिवसेना नेते संजय राऊतही पवारांची दिल्लीत भेट घेणार आहेत.
2 BREAKING : mansukh hiren death case प्रकरणी 2 जणांना अटक, महाराष्ट्र ATS ची मोठी कामगिरी
मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे खळबळ उडाली असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (mansukh hiren death case) 2 जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र एटीएसच्या (ATS) पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्यात आला आहे. पण, त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र एटीएएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे.मात्र अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.हिरेनप्रकरणी एटीएसने आतापर्यंत 25 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातून बरेच धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
3 गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजप आक्रमक राजीनाम्याची मागणी
मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे देशात खळबळ उडाली आहे.
यामुळे विरोधक मात्र आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने मुंबईत करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
महत्वाच्या बातम्या
नागपूर येथेही निदर्शने करण्यात आली.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
4 वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशात आज एक दिवसाचे लॉक डाउन घोषित
देशात काही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ दिसत असून यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाचा प्रसार मधल्या काळात नियंत्रणात आल्याने काही ठिकाणी काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती
मात्र आता पुन्हा वाढ झाल्याने कोरोना संबंधित नियम आणि निर्बंध कडक करण्यात सुरुवात झाली आहे.
आज मध्यप्रदेश सरकारने एकदिवसीय लॉक डाउन घोषित केला आहे.यामुळे रस्ते सुनसान दिसत असून
अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने आस्थापने बंद असल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
5 राज्यात पुन्हा चिंतेचे वातावरण; गेल्या 24 तासात २७ हजार १२६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्णवाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात बाधित रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सौम्य, मध्यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेशा संख्येने खाटांची गरज भासणार आहे. यासाठी महापालिकेने गेल्यावर्षीप्रमाणेच रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. नागपूर,औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात गेल्या 24 तासात २७ हजार १२६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत 92 बाधितांचा मृत्यू झाला असून मुंबईत 2 हजार 982, तर नाशकात 1 हजार 872 रुग्ण वाढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
6 पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई, दररोज 6 लाख दंड वसूल
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट आली असून, तिचा विस्तार वेगाने वाढत आहे. मात्र, त्याचवेळी नागरिकांची बेफिकिरीही वाढत चालली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. सध्या विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांवर दररोज ६ लाख रुपयं दंड वसूल केला जात आहे. १९ मार्चअखेरपर्यंत २ लाख ५६ हजार ८२१ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १२ कोटी ४४ लाख ११ हजार रुपये दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.जानेवारी महिन्यापासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क कारवाईचा वेग वाढविला. शहरातील विविध चौकात पोलीस विनामास्क जाणाऱ्यांवर अडवून कारवाई करीत आहेत. पोलिसांच्या दंडाच्या भीतीलाही न जुमानता लोक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत.
7 राज्यात अवकाळी पावसाची हजेरी;गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान
वाशिम जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखामंगरुळपिर तालुक्यात वादळी वा-यासह पावसाचं थैमान शेलुबाजार परिसरात तुफान त्याचप्रमामे गारपिट देखील झाली. पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराज मात्र त्रस्त झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, बीड जिल्ह्यातील माजलगाव वडवणी आणि गेवराई तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं. एवढंच नाही तर या तिन्ही तालुक्यांमध्ये गारपीटही झाली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव या गावांमध्ये जोरदार गारपीट झाली तर वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव तसंच गोविंद वाडी या भागांमध्ये गारपीट झाली. पाऊस आणि गारपिटीनं पिकांसह फळबागांचे मोठं नुकसान झालं.
8 त्या पत्राच्या सत्यतेबाबत शंका; परमबीर सिंह यांनी केला खुलासा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत.
सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्रामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, या मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पत्राबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले असून
पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असतानाच परमबीर सिंह यांनी याबाबत खुलासा केला आहे.
परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर पत्र प्राप्त झाले आहे.
paramirs3@gmail.com या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले
व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं होतं.
त्यामुळं परमबीर सिंह यांच्या या पत्रावर शंका उपस्थित करण्यात येत होती. आता परमबीर सिंह यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आपणच लिहलं असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
तसंच, लवकरच स्वाक्षरी असलेल्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
तसंच, पत्रात आपण सर्व नमूद केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
9 8 वी पास ‘डॉक्टर’ ने केलं गर्भवती महिलेचं ऑपरेशन; बाळासहित आईचा मृत्यू
एका आठवी पास डॉक्टरने (8th pass doctor) गर्भवती महिलेचं ऑपरेशन केल्याचं (operation on pregnant woman) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे संबंधित महिलेचा बाळासहीत मृत्यू (Pregnant woman death with baby) झाला आहे. पीडित कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर संबंधित रुग्णालयाचं काळंबेर समोर आलं आहे.
यानंतर पोलिसांनी रुग्णालयाची चौकशी केली असता, रुग्णालयातील डॉक्टर आठवी, तर संचालक 12 वी पास असल्याचं निष्पन्न झालं आहे. या अर्धवट शिकलेल्या लोकांनी वैद्यकीय क्षेत्राला व्यवसाय समजून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला होता. पण तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रुग्णालयाचा पर्दाफाश केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मधिल आहे.
सुलतानपूरजवळील पुरवा गावातील पूनम नावाची महिला गर्भवती होती.मंगळवारी रात्री कुटुंबियांनी तिला अरवल येथील मां शारदा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं.येथील डॉक्टरांनी पूनमवर ऑपरेशन केलं होतं. मात्र त्यावेळी तिला रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी दोघांनाही उपचारांसाठी लखनऊला पाठवलं. पण उपचारासाठी जात असताना वाटेतच गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
आई आणि बाळाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर यांच्याविरोधात बाल्दीराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मां शारदा हॉस्पिटलचे संचालक, राजेश साहनी हे 12 वी पास आहेत.तर, रूग्णालयात तैनात असलेला कथित डॉक्टर राजेंद्र प्रसाद शुक्ला हा केवळ 8 वी पास आहे. तर त्याचा सहकारी केवळ 5 वी पर्यंत शिकला आहे.ही अर्धवट शिकलेली लोकं हॉस्पिटल उघडून लोकांच्या जीवाशी खेळत होते.या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
10 “मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करीत आहोत?”
मंदिरात जाऊन पाणी पिणाऱ्या एका मुस्लीम मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली होती. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही रोखठोक सदरातून या घटनेवर खंत व्यक्त केली. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.
दलितांना पाणवठ्यावर येण्यास बंदी होती. त्या विरोधात हे बंड होते. पाण्यास जातही असते हे डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले. आता पाण्यास धर्मही असल्याचे त्या मुसलमान मुलाने दाखवून दिले,” असं म्हणत यांनी घटनेवर भाष्य केलं आहे.“जात आणि धर्माचे भूत आपल्या देशातून जाईल असे दिसत नाही. जात आणि धर्म आरक्षण, राखीव जागांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. आपला हिंदुस्थान देश महान असल्याचे भाषणात नेहमीच सांगितले जाते. पण त्या महानपणास जातीयतेचा डाग लावून काही लोक देशाला खुजे करीत असतात.
कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व आपण करीत आहोत?
अशाच एका प्रकरणाने देशाच्या महानतेवर प्रश्नचिन्ह लागले.कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व आपण करीत आहोत? असा प्रश्न मला या सर्व प्रकरणात पडला. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा अलंकार. अशा घटना समोर येतात तेव्हा तो अलंकार खोटा ठरतो. हिंदू समाजातील पददलित, गरीब लोक मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे करतात.
आदिवासी पाड्यांवर ख्रिश्चन मिशनरी जातात व त्या अशिक्षित लोकांचा बुद्धिभेद करतात. अशा वेळी त्या मिशनऱ्यांना ओडिशाच्या जंगलात जाळून मारणारे लोक आपल्याच धर्मात निर्माण झाले व त्या जाळणाऱ्यांचा जाहीर गौरव करणारे लोकही पाहिले. ‘लव्ह जिहाद’विरोधात वातावरण तयार करणे, गोमांसप्रकरणी हिंसाचार घडवणे हे आता रोजचेच झाले आहे.
पण हे सर्व करणारे आणि त्या कृत्याचे समर्थन करणारे आता तहानलेल्या मुस्लिम मुलास, तो मंदिरात पाणी प्यायला म्हणून जी मारहाण केली गेली त्या घटनेचेही समर्थन करणार आहेत का?,” असा सवालही राऊत यांनी केला आहे.“प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’चा नारा देत नाहीत, त्या हिंदूविरोधी आहेत, असा प्रचार सुरू आहे.
पण हिंदूंच्या मंदिरात तहानलेल्यास पाणी नाकारणे व पाणी प्यायल्याबद्दल एका मुलास मारणे हेसुद्धा तितकेच हिंदूविरोधी आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ‘मन की बात’मधून देशातील अनेक लहानसहान घटनांना भावनिक फोडणी देत असतात. त्यांनी पाणी नाकारल्या गेलेल्या त्या लहान मुलाच्या विषयासही स्पर्श करावा,” असं आवाहन राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं आहे.
Jaaglyabharat.com brought to you worldwide news updates
The news produced by Team Jaaglya Bharat
jaaglyabharat.com
Help us to share the news widely
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 21, 2021, 11:00 AM
WebTitle – latest marathi news updates