आज Jaaglyabharat Top 10 मध्ये
महत्वाच्या बातम्यांवर एक नजर
1 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही लिंक शेअर केली आहे.
या लिंकवरूनच विद्यार्थ्यांना 10वी, 12वीचा सराव संच उपलब्ध होणार आहे. (Question Bank for ssc and HSC)
महत्वाच्या बातम्यांवर एक नजर
या प्रश्नपेढ्या https://maa.ac.in/index.php?tcf=home या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत
महत्वाच्या बातम्यांवर एक नजर
2 सचिन वाझे प्रकरणात अखेर ‘त्या’ मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा (mukesh ambani security scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करणाऱ्या एनआयएनं आता पोलीस दलातील इतर बड्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. त्याचसाठी एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत आले आहेत.
3 सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य
सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका. वाझे यांचे तीन अर्ज #NIA कोर्टानं फेटाळले.
एनआयए कार्यालयात सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य.
केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टानं अशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांनासोबत राहण्याची मुभा
4 बेळगावसह मराठी भाषिक राहतात तो भाग केंद्रशासित करा, शिवसेनेची भूमिका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग यामध्ये मराठी भाषिक राहतात तो भाग केंद्र केंद्रशासित करावा, ही शिवसेनेचे भूमिका आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पत्र देखील लिहलेले आहे. लोकसभेत बोलू न देणे हे योग्य नाही.
बेळगाव प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्याचा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
बेळगाव मध्ये जी मारहाण झाली हा पुरावा सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
5 कोलकात्यात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा राडा, मुकुल रॉयना धक्काबुक्की
भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ( west bengal election ) उमेदवारांची यादी जाहीर केलीय. यानंतर उमेदवारी न मिळाल्याने नाराज नेते आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यलयात जोरदार राडा केला. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला. नाराजांनी तेथील बॅरिकेडींग तोडण्याचा प्रयत्नही केला आणि बऱ्याच वेळ हा राडा सुरू होता. एवढचं नव्हे तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, शिव प्रकाश आणि अर्जुन सिंह यांना धक्काबुक्कीही केली गेली. नाराज भाजप कार्यकर्ते हे हावडामधील पंचला इथले होते, असं सूत्रांनी सांगितलं.
6 Privatisation of Railway : रेल्वेच्या खाजगीकरणावर मंत्री पियुष गोयल यांनी केली मोठी घोषणा
भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होईल, अशा चर्चा सुरू असतानाच त्याला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पूर्णविराम दिला आहे. भारतीय रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, असं ठामपणे गोयल यांनी लोकसभेत सांगितलं आहे. रेल्वे ही कायमच सरकारकडे राहील, असं आश्वासन पियुश गोयल यांनी दिलं आहे.
लोकसभेत आज हा मुद्दा तापलेला असताना रेल्वेमंत्री म्हणाले, की रस्ते हे पण सरकारचेच असतात, मात्र तरीही त्यावरून खाजगी वाहनं जातात. तेव्हा कोणी म्हणतं का, की सरकारी रस्ता आहे तर इथून सरकारी वाहनेच जाणार? त्यामुळे जेव्हा रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणुकीचा विषय येतो, तेव्हा त्याचं स्वागत झालं पाहिजे, त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणं शक्य होणार आहे, असं पियुष गोयल म्हणाले. खाजगी रेल्वे गाड्या चालवल्या जाणार असल्या तरी रेल्वेशी निगडीत यंत्रणा ही सरकारच्याच मालकीची राहील, असं रेल्वेमंत्र्यांनी आश्वस्त केलं.
7 काँग्रेसमधून बाहेर पडलेले पी. सी. चाको आठवड्याभरात राष्ट्रवादीत दाखल!
“पक्षामध्ये गटबाजी सुरू असून काँग्रेसमध्ये काम करणं आता अवघड झालं आहे”, असं म्हणत बाहेर पडलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार पी. सी. चाको आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. केरळ विधानसभा निवडणुकांसाठी महिन्याभरात मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर चाकोंनी ‘पक्षात काम करणं अवघड झालंय’, असं म्हणून बाहेर पडणं हा काँग्रेससाठी केरळमध्ये मोठा फटका मानला जात होता.मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पी. सी. चाको यांनी आपला निर्णय पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला आहे.
8 भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना पाहायला मिळत आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका रॅलीत जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना छळण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, असा हल्लाबोल ममत बॅनर्जी यांनी केला.भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय. निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचतोय. माझे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना हटवण्यात आले. नंदीग्राम येथील घटनेला भाजप जबाबदार आहे, असा आरोप करत, भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
9 ‘मराठा आरक्षणाबाबत ते विधान माझं नाही” अशोक चव्हाण कडाडले
“केंद्र सरकार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वेगळे सांगते आणि महाराष्ट्रात भाजपचे नेते दुसरेच काही सांगतात. मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. या विषयाच्या आधारे भाजपने लोकांच्या भावनांशी खेळू नये, दिशाभूल करू नये आणि खोटेही बोलू नये”, असा घणाघात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला (Ashok Chavan answer to Chandrakant Patil).
अशोक चव्हाण यांनी 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नसल्याचे म्हटले, असे चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. पण पाटील यांची विधाने चुकीची असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे (Ashok Chavan answer to Chandrakant Patil).“102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत, असे मी कधीही म्हणालेलो नाही. केंद्र सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार ॲटर्नी जनरल यांनी ही भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्याचीच माहिती मी सभागृहाला दिली. ॲटर्नी जनरल यांनी 102 व्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडलेली भूमिका रेकॉर्डवर आहे”, असं त्यांनी सांगितलं.
10 कुत्रा पाळताय तर सावध व्हा… अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास
तुम्ही जर घरात कुत्रा पाळला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. तुमचा कुत्रा जर कुणाला चावला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. नागपुरात अशाच एका प्रकरणात कुत्र्याच्या मालकिणीला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे.अनेकजण आवड म्हणून कुत्रा पाळतात. कौतुकानं त्याचे लाडही पुरवतात. पण तुमचा आवडता कुत्रा तुम्हाला तुरूंगाची हवा खायला लावू शकतो. नागपुरातल्या एका महिलेला याचा चांगलाच अनुभव आला आहे. तिच्या पाळीव कुत्र्यानं एका मुलाला चावा घेतला. त्यामुळे नागपूरच्या कोर्टानं तिला सहा महिने कारावास आणि 50 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.डॉ. संगीता बालकोटे असं या महिलेचं नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना आणखी सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते. 29 जून 2014चं हे प्रकरण आहे.आपल्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण न ठेवता आल्यानं कोर्टानं या महिलेला कारावासाची शिक्षा सुनावलीय.अशा प्रकारची ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे.
Jaaglyabharat.com brought to you worldwide news updates
The news produced by Team Jaaglya भारत
jaaglyabharat.com
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 16, 2021 21:25 PM
WebTitle – latest marathi news updates