लाखिम्पूर खीरी: उत्तर प्रदेश, लखीमपुर खीरी येथे दलित वर्गातील दोन सख्ख्या बहीणींचा बलात्कार करून नंतर खून झाला आहे.तसेच त्यांचे शव झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.परिसरात तणावाचे वातावरण असून,पीडित मुलांच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळले आहे.या प्रकरणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण देखिल तापले असून दोन दलित अल्पवयीन मुलींवर बलात्कार, खून झाल्यानंतर, योगी सरकारने या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे योगी सरकारला विरोधी पक्षांनी घेरलं असून,या घटनेत लखीमपुर खीरी च्या एसपी संजीव सुमन यांनी मोठी अपडेट दिली आहे. पोलिसांनी लखीमपुर खीरी प्रकरणातील सर्व सहा आरोपींना अटक केली आहे. या सहा आरोपींची नावे उघडकीस आली आहेत. घराच्या दाराजवळूनच 17 आणि 15 वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या आईसमोरच उचलून नेऊन अपहरण करत या अल्पवयिन मुलींवर बलात्कार करून त्यांचे खून करून झाडाला लटवकवण्यात आल्या प्रकरणी आरोपी छोटू ला प्रथम पोलिसांनी अटक केली त्यांनंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर पाच आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे.
मुलींचे मृतदेह पाहून आई-वडील बेशुद्ध
लखीमपुर खीरी येथे दलित वर्गातील दोन सख्ख्या बहीणींचा बलात्कार करून नंतर खून करण्यात आला.ही घटना जेव्हा मुलींच्या आई वडिलांना समजली तेव्हा त्यांच्यावर आभाळच कोसळले होते.आपल्या लाडक्या मुलींचे मृतदेह गावातीलच एका शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहून आई-वडील जागेवर बेशुद्ध पडले.या अमानुष घटनेमुळे परिसर हादरला असून प्रचंड तणावाचे वातावरण असल्याचे समजते आहे.या स्थितीत मुलींना पाहून, कुटुंबासह गावकरीही स्तब्ध झाले. धाय मोकलून रडणारी आई म्हणते की शेजारच्या गावातील तरुण आपल्या घराशेजारून जात होते,त्यांच्यासोबत शेजारचा छोटू होता,या नराधमांनी माझ्या मुलींचे माझ्या डोळ्यादेखत अपहरण केले आणि बलात्कार करून नंतर त्यांना ठार मारले याची कल्पनाही नव्हती.
शोक संतप्त कुटुंबासह गावकऱ्यांनी केला रस्ता जाम
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना जिल्ह्यातील निघासन गावातील पोलिस स्टेशनच्या परीक्षेत्रातील असून बुधवारी संध्याकाळी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह झाडावर लटकलेले अवस्थेत आढळून आल्याने निघासन शहर भागात एकच खळबळ उडाली,पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचा एक शेजारी छोटू आणि इतर तीन नराधमांनी तिच्या समोर तीच्या दोन्ही मुलींचे अपहरण केले गेले. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर रास्तारोको केला या घटनेच्या माहितीनंतर, पोलिस अधीक्षक लक्ष्मी सिंग यांनी संध्याकाळी उशिरा आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यानंतर रस्ता जाम हटविण्यात आला.
लखीमपुर खीरी : बलात्कार खून घटनेतील नराधमांची नावे
छोटू : मुलींच्या बलात्कार आणि खून प्रकरणात छोटूला प्रथम अटक करण्यात आली. तमोली पुर्बा गावचा रहिवासी. याचं घर पीडित मुलींच्या शेजारी आहे.
जुनैद: जुनैद हा लालपूर गावचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव इजराईल आहे.
सुहेल: सुहेल हाही लालपूर गावचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव इस्लामुद्दीन आहे.
हाफिजूर: हाफिजूर रहमान उर्फ मजिलके हाही लालपूर गावचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव अझीझूर रहमान आहे.
करीमुद्दीन: करीमुद्दीन उर्फ डीडी, हाही लालपूर गावचा रहिवासी असून या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.त्याच्या वडिलांचे नाव कलिमुद्दीन आहे.
आरिफ : या प्रकरणात अटक केलेला सहावा आरोपी आरिफ उर्फ छोटे असून हाही लालपूर गावचा रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे नाव अहमद हुसेन आहे.
अशा बातम्या मेनस्ट्रीम मिडिया देत नाही,आपल्या जागल्याभारतला सपोर्ट करण्यासाठी
आपल्या मित्र परिवार ग्रुपमध्ये बातम्या /लिंक शेअर करत चला तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करा Support US!
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 15,2022, 13:50 PM
WebTitle – Lakhimpur Khiri: Both sisters were kidnapped in front of their mother, raped, killed and hanged from a tree