सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात खटला दाखल होणार आहे. त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिले आहेत. रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्ट यांचा उल्लेख करत काही ट्विट केले होते.ते ट्विट पाहून पुण्यातील काही वकिलांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली.त्याची दखल घेत अॅटर्नी जनरल जनरल के. के. वेणुगोपाल यांनी तत्परता दाखवत खटला दाखल करण्याचे आदेश दिले.
वरील ट्विटला रिट्विट करत कुणाल कामरा (standup comedian kunal kamra) ने या ट्विटची देखील त्याच्या शैलीत खिल्ली उडवली आहे.
हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स (contempt of court) न्यायालयाचा अवमान नसून
भविष्यातील राज्यसभा सिट्सचा अवमान असल्याचे म्हणले आहे.
अलिकडे न्यायदान करणारे न्यायमूर्ती निवृत्त झाले की भाजपच्या आशीर्वादाने राज्यसभेवर जातात याकडे कुणाल कामरा लक्ष वेधत आहेत.
नुकतेच न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या खटल्यात नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले नाही तर कोण करणार,अशी परखड टिप्पणी सर्वोच्च न्यायालयातील न्या. धनंजय चंद्रचूड यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान केली होती.
आता वरील खटला वर्ग करून घेतला जातो की कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)