आंध्रप्रदेश : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यास जातीयवाद्यांकडून विरोध.कोनासीमा जिल्ह्याला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या प्रस्तावाविरोधात मंगळवारी जिल्हा मुख्यालयात निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिस आणि कोनासीमा साधना समिती यांच्यात संघर्ष झाला.त्यानंतर हिंसाचार उसळला. (Konaseema Sadhana Samithi (KSS) अमलापुरम शहराला आंदोलकांनी आग लावली. पोन्नाडा चे आमदार सतीश यांचे घरही आंदोलकांनी पेटवून दिले. या घटनेत अनेक पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आंदोलकांनी मोठ्याप्रमाणावार दगडफेक केली. शहरात पोलिसांचे वाहन आणि शैक्षणिक संस्थेची बसही जाळण्यात आली. परिवहन मंत्री पी. विश्वरुपू यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला आणि तेथे ठेवलेल्या फर्निचरची तोडफोड करण्यात आली.
‘राजकीय पक्षांनी भडकले लोकांना’
काही राजकीय पक्ष आणि समाजकंटकांनी जाळपोळ केल्याचा आरोप राज्याच्या गृहमंत्री तानेती वनिता यांनी केला.
“या घटनेत सुमारे 20 पोलीस कर्मचारी जखमी होणे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन तानेती यांनी यावेळी दिले.
4 एप्रिल रोजी जिल्ह्याचे नाव बदलले होते
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यामधून कोनसीमा जिल्हा तयार करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने कोनसीमा जिल्ह्याचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यासाठी
प्राथमिक अधिसूचना जारी करून लोकांकडून हरकती मागवल्या होत्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यास जातीयवाद्यांकडून विरोध करण्यात आला.या पार्श्वभूमीवर कोनसीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेत जिल्ह्याचे नाव कोनसीमा असेच ठेवण्याची मागणी केली. जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या विरोधात जिल्हा दंडाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत मंगळवारी समितीने निदर्शने केली होती. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर आंदोलक संतप्त झाले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली.
कोनासीमा एसपी के.एस.एस.व्ही. सुब्बा रेड्डी म्हणाले की,आंदोलकांच्या संघर्षात पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. “चकमकीत जखमी झालेल्या जवानांची नेमकी संख्या आम्हाला माहीत नाही.
जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर लोकांच्या वेगवेगळ्या गटांनी आणि सोशल मिडियातील अनेक ग्रुप्सनी सुरू केलेल्या
ऑनलाइन कॅम्पेनमुळे हा संघर्ष झाला,” असं ते म्हणाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली.आम्ही चकमकीत जखमी झालेल्यांना वैद्यकीय मदत देण्यावर भर देत आहोत”, सुब्बा रेड्डी यांनी पुढे माहिती दिली.. मात्र, कोनासीमा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
‘हे घर विक्रीसाठी आहे’ आंबेडकरी समाजाने घरांबाहेर लावले बॅनर
ज्ञानवापी प्रकरणी फेसबुक पोस्ट ; डॉ. रतन लाल यांना अटक
MP:दलित वराच्या वरातीवर दगडफेक,सरकारने पाडली बुलडोझरने घरे
विधवा प्रथा : समाज मनाचा दृष्टिकोन अन् मानसिकता बदलली पाहिजे..
ज्ञानवापी मशिद मुद्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे?
भगवान बुद्ध आणि माझा खास संबंध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
First Published by Team Jaaglya Bharat on MAY 24, 2022 23:00 PM
WebTitle – Konaseema agitation Oppose to naming Dr. Babasaheb Ambedkar; mob arson, stone throwing