मुंबई: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या एका मोठ्या संकटात सापडलेत. त्यांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. Kirit Somaiya Video clip viral किरीट सोमय्या यांचे एक दोन नाही तर तब्बल ३५ व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.यानंतर विरोधी पक्षाने किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केलीय.Kirit Somaiya Video clip viral व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर 12 तासांनी किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. मी कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असं सांगत त्यांनी होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गृहमंत्री फडणवीस यांनी माझी चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.मात्र या क्लिप माझ्या नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
ठाकरे गटाने किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे.त्यासाठी योग्य त्या ठिकाणी दाद मागितली जाणार आहे. अंबादास म्हणाले की, माझ्यासाठी तक्रार करणाऱ्या महिलांची सुरक्षा ही मुख्य गोष्ट आहे. त्याचबरोबर इतर नेतेही भाजपवर हल्लाबोल करत आहेत. सोमय्या यांच्यासाठी भाजपचे काही वेगळे निकष आहेत का, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केला. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांनी स्वत: अश्लील कृत्य केले असताना त्यांना इतरांची बदनामी करण्याचा नैतिक अधिकार नाही.
भ्रष्टाचाराचे खोटे आणि बेछूट आरोप करून अनेक नेत्यांना बदनाम करणारा, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘बोगस वस्त्रहरण’कार,
भाजप नेता किरीट सोमय्या उघडा-नागडा पडला आहे.
‘ब्लॅकमेलिंग’चा एकमेव उद्योग असलेल्या या भाजपच्या पोपटाचे विकृत चाळे जगासमोर आले आहेत.
अशा शब्दांत सामना मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आलीय.
Kirit Somaiya Video clip viral सोमय्या यांनी लिहिलं फडणवीस यांना पत्र
किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल, पत्रात म्हटलंय की,
आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली.
या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.
अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले,
अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत.
तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो.
त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.
शिंदे गटाने केली पाठराखण
“किरीट सोमय्या यांच्याबाबतीत कोणत्या महिलेनं तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे हे अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सुरू असल्याचा आमचा थेट आरोप आहे. कोणत्याही महिलेचा त्यावर काही आक्षेप नाही कुठलीच तक्रार प्राप्त नाहीए. केवळ अन केवळ त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. असं कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकवण्याची गरज नाही” असं शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी आरोप करत म्हटलंय.
मुंबई काँग्रेसच्या प्रमुख प्रा. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की
“बेछूट खोटे – नाटे आरोप करून अनेकांची सार्वजनिक प्रतिमा मलीन करणाऱ्या, सर्वांवर शिंतोडे उडवणाऱ्या भाजपा नेते #किरीट_सोमय्या स्वतः चिखलात लोळून माखलेले आहेत. त्यांच्या विकृत प्रवृत्तीचा भांडाफोड ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीने आज देशासमोर केला आहे.
नैतिकतेच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या सोमय्यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ किळसवाणा प्रकार आहे. दुसऱ्यांचे चारित्र्य हनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपाने सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आता धाडस दाखवावे.
हिशेब तर द्यावाच लागेल…. या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भाजपाचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा म्हणजेच ‘बेटियों को भाजपा से बचाओ’ असा नारा आहे.
अतिशय लज्जास्पद बाब..!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 18,2023 | 15:10 PM
WebTitle – Kirit Somaiya Video clip viral