केरळ 19-12-2025 : केरळमध्ये नाताळच्या सरकारी कार्यक्रमात आरएसएसचे गाणे गाण्याची मागणी, कर्मचाऱ्यांचा नकार; कार्यक्रम रद्द सरकारी कार्यालये ही सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असतात. ती कोणत्याही एका वैचारिक संघटनेचा मंच म्हणून वापरली जाऊ नयेत, अशी घटनात्मक अपेक्षा आहे. मात्र यावर्षी केरळमध्ये झालेल्या एका सरकारी नाताळ कार्यक्रमात मोठा वाद निर्माण झाला आहे. अधिकृत ख्रिसमस कार्यक्रमात ‘आरएसएस गणगीतम’ हे गाणे गायले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. हे गाणे सामान्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वयंसेवक गातात.
केरळमध्ये नाताळच्या सरकारी कार्यक्रमात आरएसएसचे गाणे गाण्याची मागणी
ही मागणी आरएसएसशी संलग्न असलेल्या आणि भारतीय मजदूर संघाशी संबंधित भारतीय पोस्टल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस एम्प्लॉइज युनियन (बीपीएओईयू) या संघटनेने केली होती. बुधवार, १८ डिसेंबर रोजी केरळमधील विविध पोस्ट ऑफिसांमध्ये नाताळचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होते. मात्र कर्मचाऱ्यांनी हे गाणे गाण्यास नकार दिल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गाण्याची मागणी आणि त्यानंतर थेट कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयामुळे अनेक स्तरांवर चिंता आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे नेते आणि राज्यसभा खासदार जॉन ब्रिट्टास यांनी
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना याबाबत पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, भारतात नाताळ हा केवळ सांस्कृतिक सण नाही,
तर तो श्रद्धा, समावेश आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे.
१७ डिसेंबर रोजी, म्हणजे कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पाठवलेल्या या पत्रात ब्रिट्टास यांनी केंद्रीय मंत्र्यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले.
त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की भारतीय पोस्टल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस एम्प्लॉइज युनियनकडून अधिकृत ख्रिसमस कार्यक्रमात आरएसएसचे गाणे समाविष्ट करण्याची मागणी मान्य करू नये.
हे पत्र डाक विभागाचे सचिव तसेच केरळ सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल यांनाही पाठवण्यात आले होते.
आपल्या पत्रात ब्रिट्टास यांनी म्हटले आहे की, कोणत्याही सरकारी कार्यालयात एखाद्या पक्षपाती किंवा वैचारिक संघटनेशी संबंधित गाणे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अयोग्य नाही, तर ते अत्यंत असंवेदनशील असून भारतीय संविधानातील मूल्यांच्या विरोधात आहे.
केरळमधील मातृभूमी या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, आरएसएस गणगीतमसोबतच बीपीएओईयू या संघटनेने ख्रिसमस
आणि नववर्षाच्या कार्यक्रमात ‘गणपती स्तुती’ समाविष्ट करण्याची मागणीही केरळ डाक विभागाकडे केली होती.
कार्यक्रम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा सांप्रदायिक शक्तींसमोर शरणागती पत्करण्यासारखा
या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन (सीसीजीईडब्ल्यू) चे महासचिव जी. आर. प्रमोद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी डाक विभागाने कार्यक्रम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा सांप्रदायिक शक्तींसमोर शरणागती पत्करण्यासारखा असून
केंद्र सरकारच्या संस्थांमधील धर्मनिरपेक्ष परंपरेवर थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.
ब्रिट्टास यांनीही आपल्या पत्रात या संघाशी संबंधित मागण्यांबाबत निर्माण झालेल्या गंभीर चिंतेचा उल्लेख केला आहे.
त्यांनी केंद्रीय मंत्री सिंधिया यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत सांगितले की,
या प्रकरणात डाक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाताळ सणाची प्रतिष्ठा जपली जाणे आवश्यक आहे.
पत्रात त्यांनी असेही लिहिले आहे की, संघटनेच्या पत्रामध्ये ‘देशभक्ती’ या शब्दाचा वारंवार वापर करण्यात आला आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे.
देशभक्ती ही कोणत्याही वैचारिक संघटनेशी निष्ठा ठेवण्यातून येत नाही, तर ती भारतीय संविधानाशी प्रामाणिक राहण्यातून निर्माण होते.
ब्रिट्टास यांनी ठामपणे सांगितले की, कर्मचाऱ्यांनी आरएसएस स्वयंसेवकांचे गाणे गाण्यास विरोध केला,हा मुद्दा केवळ गाण्याच्या निवडीपुरता मर्यादित नाही.
हा प्रश्न थेट घटनात्मक धर्मनिरपेक्षतेशी संबंधित आहे. तसेच हा अल्पसंख्याक समुदायांच्या श्रद्धेचा अपमान ठरू शकतो
आणि धार्मिक सणावर वैचारिक अजेंडा लादण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिला जाऊ शकतो.
Government offices are not ideological platforms. Introducing “RSS Ganageetham” into an official Christmas celebration violates constitutional secularism and insults minority faiths. It was a deliberate attempt to appropriate or overshadow a religious celebration with an… pic.twitter.com/LJRRZxqd0T
— John Brittas (@JohnBrittas) December 18, 2025
सिंधिया यांना लिहिलेल्या पत्रासोबतच ब्रिट्टास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही केली आहे.या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की,
वादग्रस्त मागणी नाकारण्याऐवजी किंवा योग्य तो तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाने थेट ख्रिसमस कार्यक्रमच रद्द केला.
ज्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला, त्या कर्मचाऱ्यांना आता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
केरळमध्ये आरएसएसचे गाणे,बेकायदेशीर किंवा सांप्रदायिक स्वरूपाच्या कोणत्याही कृतींना डाक विभागात परवानगी दिली जाऊ नये.
ते पुढे म्हणाले की, शक्तिशाली गटांना खूश करण्याच्या आणि दुर्बलांना शिस्त लावण्याच्या नादात प्रशासनाने कर्मचाऱ्यांचा मोठा सण साजरा करण्याचा हक्क डावलला आहे. यात नेमका फायदा कुणाचा झाला, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अजेंडा लादणाऱ्या बीएमएसशी संलग्न संघटनेचा की फक्त सन्मानपूर्वक नाताळ साजरा करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, असा सवाल त्यांनी केला.
जेव्हा सरकारी जागा वैचारिक संघर्षाचे मैदान बनतात, तेव्हा सर्व धर्मांचा सन्मान राखून काम करू इच्छिणाऱ्या सामान्य लोकांचेच सर्वाधिक नुकसान होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यार्थी संघटना डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) यांनीही डाक विभागाच्या या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बेकायदेशीर किंवा सांप्रदायिक स्वरूपाच्या कोणत्याही कृतींना डाक विभागात परवानगी दिली जाऊ नये.
भाजप, ज्याचा वैचारिक पाया आरएसएस आहे, केरळमधील ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असला तरी, अनेक वेळा त्यांच्याशी संलग्न संघटना किंवा सदस्यांच्या कृतींमुळे विरोधाचा सामना करावा लागलेला आहे. मागील वर्षीच्या ख्रिसमसदरम्यानही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निमंत्रणावरून वाद निर्माण झाला होता.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकार ख्रिसमस आठवडा, म्हणजे १९ डिसेंबर ते २५ डिसेंबर हा कालावधी ‘सुशासन सप्ताह’ म्हणून साजरा करते. २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान आणि भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे.
२०२४ मध्येही ख्रिसमसच्या काळात हिंदुत्वाशी संबंधित गट आणि व्यक्तींनी केलेल्या कथित हल्ल्यांच्या विरोधात नागरिकांनी निदर्शने केली होती. अशा प्रकारच्या घटनांची नोंद मागील काही वर्षांमध्येही झाल्याचे अहवालांमधून समोर आले आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 19,2025 | 17:37 PM
WebTitle – Kerala Christmas Event Cancelled After RSS Song Demand in Government Offices























































