बंगळुरु 23 मे : एक अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेत एका मागासवर्गीय तरुणानं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या तरुणाच्या म्हणण्यानुसार,हात-पाय बांधून मागासवर्गीय तरुणाला पोलिसाकडून मारहाण करण्यात आलीय.पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस स्टेशन मध्ये नेऊन हात-पाय बांधून जबरी मारहाण केली. (bangalore Sub Inspector Beat Dalit Youth) इतकंच नाही तर चौकशीदरम्यान त्याला तहान लागली असता त्याला मूत्र पाजण्याचं (Forced to Drink Urine) किळसवाणं कृत्यही केलं.
तरुणानं या प्रकरणाची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना कर्नाटकच्या (Karnataka) चिकमंगलूरमधील गोनीबीड़ू पोलीस ठाण्यातील आहे.
गोनीबीडू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पुनीत यांनी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन यांच्यावर आरोप केला, की पोलिसानं चौकशीदरम्यान त्याना मूत्र पाजण्यात आले.पुनीत यांनी याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांना आणि मानव अधिकार आयोग यांना पत्र लिहित याबाबतची तक्रार केली आहे. आपल्यासोबत झालेल्या या अमानवीय कृत्यासाठी न्याय मिळावा अशी मागणीही केली आहे.
काय आहे प्रकरण ?
गावातील लोकांनी पुनीत यांची तोंडी तक्रार केली होती,त्याचं कारणही अजब आहे.
गावातील एक महिला प्रियकरासोबत पळून गेली होती.
तिच्यासोबत पुनीत बोलताना आढळून आले.त्यामुळे नाराज गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.
पुनीत यांनी सांगितलं, की मला ठाण्यात घेऊन जाण्यात आलं आणि यानंतर मला मारहाण करण्यात आली तसंच माझे हात-पायही बांधण्यात आले. मला तहान लागल्यानं मी पिण्यासाठी पाणी मागितलं. मला इतकी तहान लागली होती की पाणी न मिळाल्यास माझा जीव जाईल, असं वाटत होतं. मात्र, पोलिसांनी चेतन नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीला माझ्यावर लघूशंका करण्यास सांगितले.
हात-पाय बांधून मागासवर्गीय तरुणाला पोलिसाकडून मारहाण
पुनीत यांनी पुढे म्हटलं, की मला ठाण्यातून सोडण्यासाठी त्यांनी फरशीवरील मूत्र चाटण्यास सांगितलं.
काहीही पर्याय नसल्यानं मी ते केलं आणि बाहेर आलो.
चिकमंगलूर जिल्ह्याच्या एसपींनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत संबंधित पोलीस उपनिरिक्षकाविरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
एसपी म्हणाले, की संबंधित पोलिस अधिकाऱ्यास सध्या दुसऱ्या पोलिस ठाण्यात ट्रान्सफर केलं गेलं आहे
आणि डीवायएसपी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुनीत यांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकाविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 23, 2021 20 : 30 PM
WebTitle – karnataka dalit youth alleges cops beat him up made him lick urine inside police station 2021-05-23