नागपूर,दि 21 – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.अनेक शहर जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश रुग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत.अनेक लोकांची घरे लहान आहेत.याशिवाय घरात इतर सदस्य देखील असतात.त्यामुळे रुग्णासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरातील इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन उत्तर नागपुरातील नारी रोडवरील कपिलनगर येथील कपिलवस्तू बुद्धविहार कमिटीने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.कपिलवस्तू बुद्ध विहार क्वारंटाईन सेंटरसाठी खुले करण्यात आले आहे.
कमिटीचे अध्यक्ष तुषार नंदागवळी व सचिव मनीष भगत यांच्यासह इतर सर्व सदस्यांनी
कपिलवस्तू बुद्ध विहार पहिल्या माळ्यावरील सभागृह हे कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर बनवण्याचा स्तुत्य निर्णय घेत सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
कपिलवस्तू बुद्धविहाराचे सचिव मनीष भगत यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा भाग आहे.
सध्या कठीण काळ आहे. केवळ प्रशासनाच्या भरवशावर राहून चालणार नाही.
समाजातील लोकांनाही पुढे यावे लागेल.आम्ही आमच्यापासून सुरुवात केली.
शहरातील प्रत्येक भागात समाजभवन, मनपा शाळा आणि धार्मिक स्थळे आहेत.सध्या ते बंद आहेत.
ते बंद ठेवण्याऐवजी त्यांचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो.
यासाठी प्रशासनाने आमदार व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे.
या संबंधीचे पत्र पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना देण्यात आले.
कोकणातील पुरग्रस्तांना अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तूंचे वाटप..
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 21, 2021 21: 03 PM
WebTitle – Kapilvastu Buddha Vihar opened for quarantine center 2021-04-21