कानपूर : सोशल मीडियावर दलित युवकाला मारहाण करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ कानपूरमधील अकबरपूरचा असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका दलित युवकाला झाडाला बांधून तासनतास मारहाण केली गेली. त्याच्या खाजगी भागात काठी घालण्याचा प्रयत्नही केला गेला. हे सर्व व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. असा आरोपही केला जात आहे की जेव्हा या घटनेची तक्रार घेऊन तरूणाचे वडील पोलिसांकडे पोहोचले तेव्हा त्यांनी त्याला पळवून लावले.आणि तुमच्या मुलाला घेऊन जावा नाहीतर त्याला छेडछाडीच्या गुन्ह्यात आत टाकू अशी धमकी देण्यात आली.पीडित तरुणाला गंभीर अवस्थेत सध्या हॅलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की कानपूर येथील एका गावातील काही लोकांनी दलित तरूणाला झाडाला बांधले आहे.एक व्यक्ती मारहाण करत त्याच्या खाजगी भागात एक काठी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच पीडित तरुणाच्या दोन्ही खाजगी भागावर मारताना दिसत आहे.पीडित तरुण वेदनेने विव्हळत आहे.पण त्याला काठीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. त्याचवेळी आजूबाजूला उभे असलेले लोक शिवीगाळ करीत आहेत.त्यांच्यातील काहींनी असे म्हटलं की – जास्त मारू नका, अन्यथा तो मरून जाईल. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
टाइम्स ऑफ इंडिया ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
https://twitter.com/JournoPrashant/status/1413485127674470411
पोलिसांना काय म्हणने आहे?
या घटनेसंदर्भात अकबरपूरचे सीओ अरुण कुमार सिंह म्हणाले आमच्या निदर्शनास ही घटना आली आहे.
त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दलित युवकाला मारहाण करत त्याच्या खाजगी भागात काठी घातली गेली होती.
रुण कुमार सिंह म्हणाले की,आम्ही या घटनेची माहिती घेत आहोत.
पीडित तरुणाच्या घरातील सदस्यांना तक्रार देण्यासाठी बोलविण्यात आले आहे.
त्यांनी एफआयआर दाखल केल्यास पुढील कारवाई करता येईल.
वृत्तानुसार, ही बाब अकबरपूर पोलिस स्टेशन परिसरातील कमलपूर गावची आहे.पत्री गावात राहणारा सरवन चित्रकार-पेंटर म्हणून काम करतो. पेटींगच्या कामासाठी जवळपासच्या कमलपूर गावी गेला होता. या दरम्यान गावात राहणा संजय पालच्या मुलीशी त्याची ओळख झाली.त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. संजयला हे कळताच त्याने मुलीला बोलावून सरवन ला गावात भेटायला बोलावले.असा आरोप केला जात आहे की संजय यांच्यासह इतरांनी सरवनला गावातील एका झाडाला बांधून काठ्यांनी मारहाण केली.तसेच त्याच्या खासगी भागात काठी घालण्याचा प्रयत्न केला गेला.
जेव्हा प्रकृती अधिकच वाईट झाली तेव्हा मुलाच्या कुटूंबाने त्याला लाल लजपत रुग्णालयात नेले.
या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकबरपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी तुलसीराम पांडे
यांनी मुलीचे आरोपी वडील संजय पाल आणि अन्य अज्ञात लोकांविरुद्ध प्राणघातक हल्लासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की एफआयआरनंतर आरोपी गाव सोडून पळून गेले आहेत.
हे ही वाचा… “आपण दलितांना सन्मान द्यायला कमी पडतो म्हणून ते धर्मांतर करुन ख्रिश्नन होतात”
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 10 , 2021 13 : 33 PM
WebTitle – Kanpur: Atrocities by tying a dalit youth to a tree, trying to put a stick in his private part 2021-07-10