चंदीगड : नुकतेच लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर झाले ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत ने मंडीमधून विजयी झाली. विशेष म्हणजे कंगणा रानौत पहिल्यांदा निवडणूकीसाठी उभी होती, ज्यामध्ये तिचा 74755 मतांनी विजय झाला. दरम्यान कंगणा रानौत 6 जूनला कंगणा चंदिगडमधील विमानतळावर उतरली होती.त्यावेळी तेथील CIFS महिला अधिकाऱ्याने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली.महिलेने कानाखाली मारल्यानंतर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
याघटनेनंतर कंगना आणि CIFS महिला अधिकारी चांगल्या चर्चेत आल्या. या घटनेचा व्हिडीओ आणि काही फोटोही सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.
परंतु ही घटना का आणि कशासाठी घडली याबद्दल सुरुवातीला माहिती नव्हती.
पण नंतर कंगणाने स्वत:च एक व्हिडीओ ट्वीट करत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
कंगनाने या प्रकरणानंतर सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे
महिलेने कानाखाली मारल्याच्या या प्रकरणाबद्दल माहिती देताना कंगणा रानौत म्हणाली की, ’’ नमस्कार मित्रांनो, मला खूप सारे फोन कॉल्स येत आहेत, मीडिया आणि माझ्या शुभचिंतकांकडून फोन येत आहेत, सर्वात अगोदर मी सांगू सगळ्यात आधी तर i am Safe, मी व्यवस्थीत आहे. आज चंदीगडच्या विमानतळावर जे प्रकरण घडलं ते सिक्यूरीटी चेक सोबत घडलंय. तिथं मी सिक्यूरीटी चेक करुन जशी निघाली. त्यावेळी कॅबिनमध्ये जी महिला होती. ती सुरक्षा कर्मचारी होती CIFS ची तिने आधी मी तिथून निघून जाईपर्यंत वाट पाहिली आणि नंतर बाजूने येऊन माझ्या तोंडावर मारलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. ”
अधिक माहिती देताना कंगना म्हणाली, “जेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांनी असं का केलं, त्यावर त्या म्हणाल्या की त्या शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करतात आणि मी सुरक्षित आहे.परंतु मला एकाच गोष्टीची चिंता आहे की, जो आतंकवाद आणि उग्रवाद पंजाबमध्ये वाढत आहे. त्याला कसं सांभाळणार आहोत. “
कंगनाचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही युजर्स सोशल मीडियावर कंगनाला ट्रोल करत आहेत,
तर काही लोक तिच्या बाजून आवाज बोलत आहेत.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 06,2024 | 22:35 PM
WebTitle – Kangana Ranaut slapped by CISF woman