22 डिसेंबर 2024 | कल्याण : कल्याण शहरातील एक हायप्रोफाइल सोसायटीमध्ये तीन दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबावर बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे परप्रांतीय कुटुंबाने गावगुंड बोलावून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली असून मराठी माणसांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.या घटनेची प्रतिक्रिया विधानसभेत देखील उमटली आणि तात्काळ पोलिसांनी आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, या घटनेनंतर कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांकडून परत एकदा दादागिरी पाहायला मिळाली.गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून धुडगूस घालण्यात आला आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात एक मराठी कुटुंब त्यांच्या चार वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या परप्रांतीयाला जाब विचारण्यासाठी गेले होते, पण त्यांना परप्रांतीय कुटुंबाने उलट त्यांनाच मारहाण केली. मारहाण करणाऱ्याचे नाव उत्तम पांडे असे आहे आणि त्याच्या पत्नीने देखील त्यात सहभागी होऊन मारहाण केली असल्याचे कळते.विशेष बाब म्हणजे ज्या मराठी कुटुंबाला मारहाण झाली ते पोलिस कर्मचारी असल्याचे कळते.
कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून पुन्हा मारहाण
या प्रकरणात, उत्तम पांडे आणि त्याची पत्नी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांना तपास करण्यात मदत होईल. या घटनेत, मराठी तरुण, त्याची पत्नी आणि आई जखमी झाले आहेत.
अशा प्रकाराच्या घटनांमध्ये पोलिसांची सुरक्षा सुद्धा धोक्यात?
तीन दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर दोन परप्रांतीय कुटुंबांकडून हल्ला करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे, ज्यात पोलिसाच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे – “पोलीसही सुरक्षित नाहीत का?”
पोलिसांचा तपास सुरू
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता,
याचा जाब विचारण्यासाठी मराठी कुटुंब पांडे आणि त्याच्या पत्नीकडे गेले होते.पांडे आणि त्याची पत्नी त्यांना मारहाण करत होते,
आणि हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिक तपास सुरू आहे.
कल्याणमधील हे घटनाचक्र, खासकरून पोलिसांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी एक गंभीर चिन्ह आहे.राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशी घटना चिंतेचा विषय ठरली आहे. पोलिसांचे काम अधिक कठीण होत चालले आहे, आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनांचा प्रतिकार करण्यासाठी कठोर उपाययोजना होणे आवश्यक आहे.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 22,2024 | 21:15 PM
WebTitle – kalyan-marathi-police-family-beaten-by-non-marathi
#KalyanCrime #MarathiFamily #PoliceFamily #OutsidersAttack #CrimeInMaharashtra #MarathiNews #KalyanNews