नवी दिल्ली: जेएनयू पुन्हा एकदा वादात सापडले आहे. जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित (Shantishree Dhulipudi Pandit) यांनी देवतांच्या जाती सांगताना सांगितले की, हिंदू धर्मातील देवता ब्राह्मण किंवा क्षत्रिय नाहीत. महिलांनाही कुलगुरूंनी शूद्र म्हटले आहे. JNU पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. (JNU) जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री धुळपुडी पंडित यांनी देवांची जात सांगून नवा वाद निर्माण केला आहे. कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या की, मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणतीही देवता तथाकथित सवर्ण नाही. भगवान शिव देखील अनुसूचित जाती किंवा जमातीचे असू शकतात. स्त्रिया जन्माने शूद्र असतात पण लग्नानंतर त्यांना पतीची जात किंवा धर्म मिळतो.
हिंदू धर्म ही जीवनपद्धती असेल तर टीका स्वीकारा
खरं तर, जेएनयू च्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित सोमवारी डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत
‘डॉ. बी. आर. आंबेडकरांचे विचार जेंडर जस्टिस: डीकोडिंग द युनिफॉर्म सिव्हिल कोड’ या विषयावर बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, हिंदू हा केवळ धर्म नसून तो एक जीवनपद्धती आहे.
आणि जर धर्म जीवन जगण्याची पद्धत असेल तर त्यावर टीका केल्यावर कुणी का घाबरतं?
का हायतौबा करत हल्लकल्लोळ माजवला जातो? टिकेला विरोध का होतो?
बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजेत
जेएनयू च्या कुलगुरू म्हणाल्या की, आजही समाजात भेदभाव का आहे.
जेव्हा आपण पाहतो की आपल्या सर्व देवी-देवता अगदी स्त्रियाही तथाकथित उच्चवर्णीय नाहीत मग समाजात जातीभेद का?
हा भेदभाव आपण अजूनही का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. जेएनयू च्या कुलगुरू म्हणाल्या की,
बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे.
एवढा महान विचारवंत असलेला आधुनिक भारताचा नेता आपल्याकडे नाही.
गौतम बुद्ध हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी आपल्या समाजातील भेदभाव-जातीय द्वेषाच्या विरोधात आपल्याला जागृत केले.
हिंदू देव उच्चवर्णीय नाहीत, स्त्रिया शूद्र आहेत
कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी नऊ वर्षांच्या मुलासोबत झालेल्या जातीय हिंसाचारावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की, कोणतीही देवता उच्चवर्णीय नाही. ब्राह्मण तर मुळीच नाही. तुमच्यापैकी बहुतेकांना मानववंशशास्त्रीयदृष्ट्या आपल्या देवांचे मूळ माहित असले पाहिजे. कोणताही देव ब्राह्मण नाही किंवा सर्वोच्च क्षत्रिय नाही. जेएनयू च्या कुलगुरू म्हणाल्या की भगवान शिव शंकर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे देखील असू शकतात. अशी ही देवता जी स्मशानात बसते, सापांना गुंडाळते आणि अगदी कमी कपडे घालते. ब्राह्मण स्मशानात बसू शकेल असे मला वाटत नाही. जेएनयू च्या कुलगुरू म्हणाल्या की लक्ष्मी, शक्ती किंवा अगदी जगन्नाथ यासह इतर सर्व देवता anthropologically मानववंशशास्त्रीयदृष्ट्या उच्च जातीतून आल्याचे दिसत नाही. खरे तर भगवान जगन्नाथ हे मूळचे आदिवासी आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी दावा केला की सर्व महिला शूद्र आहेत. कोणतीही स्त्री ती ब्राह्मण किंवा इतर काहीही असल्याचा दावा करू शकत नाही. जात ही फक्त लग्नामुळे असते जी की तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांच्या जातीतून मिळते.
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
Sonali Phogat सोनाली फोगाट या भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टारचं निधन
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 23,2022, 17:56 PM
WebTitle – JNU Vice-Chancellor said there is no God Brahmin, Lord Shiva Shankar belongs to Scheduled Castes, Jagannath is a tribal.