नवीदिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणूक डाव्यांचा विजय : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू JNU) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. विद्यापीठात अध्यक्षपदासह विविध पदे डाव्यांनी जिंकली आहेत. जेएनयूमध्ये अध्यक्षपदासाठी डाव्यांचे धनंजय यांनी अभाविपचे उमेदवार उमेशचंद्र अजमिरा यांचा पराभव केला. चार वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या JNUSU निवडणुकीत 2024 मध्ये डाव्यांनी चारही पदे जिंकली आहेत. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दुसऱ्या स्थानावर आहे.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या (जेएनयूएसयू) निवडणुकीसाठी शुक्रवारी ७३ टक्के मतदान झाले, जे गेल्या १२ वर्षांतील सर्वाधिक आहे. निवडणूक समितीने सांगितले की, जेएनयूएसयू निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या, ज्या लॉजिस्टिक व्यवस्थेमुळे उशीर झाल्या. चार वर्षांच्या कालावधीनंतर मतदान झाले आणि 7,700 हून अधिक नोंदणीकृत मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे म्हणजेच बॅलेटपेपरवर मतदान केले.
मतदानासाठी विविध अभ्यास केंद्रांमध्ये एकूण 17 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले मतदान सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होते.
जेएनयूमध्ये 2019 मध्ये 67.9 टक्के, 2018 मध्ये 67.8 टक्के, 2016-17 मध्ये 59 टक्के, 2015 मध्ये 55 टक्के,
2013-14 मध्ये 55 टक्के आणि 2012 मध्ये 60 टक्के मतदान झाले होते.
मतदार आपापल्या केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असताना विविध विद्यार्थी संघटनांच्या समर्थकांनी त्यांच्या नेत्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.
जेएनयू विद्यार्थी संघटना निवडणूक डाव्यांचा विजय;दलित चेहरा अध्यक्ष
सकाळी 11 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमू लागल्याने ढोल-ताशांच्या गजरात जय भीम, भारत माता की जय आणि लाल सलामच्या घोषणांनी वातावरण तापले. जेएनयूएसयू केंद्रीय पॅनेलसाठी एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, तर स्कूल कौन्सिलर पदासाठी 42 जणांनी नशीब आजमावले. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आठ उमेदवारांमध्ये लढत होती. पदांबद्दल बोलायचे तर केंद्रीय पॅनेलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव आणि सरचिटणीस यांचा समावेश आहे.
निवडून आलेले अध्यक्ष धनंजय हे मूळ बिहारमधील गया येथील असून ते दलित समाजातील आहेत.
AISA या त्यांच्या संस्थेनुसार, 27 वर्षांनंतर दलित समाजातील एक विद्यार्थी JNU विद्यार्थी संघाचा अध्यक्ष बनला आहे.
जेएनयूमध्ये तब्बल चार वर्षानंतर या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका झाल्या आहेत. कोविड महामारीमुळे मधल्या काळात निवडणुका झाल्या नाहीत.
यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी नेत्या ऐशी घोष यांची अध्यक्षपदी निवड झाली होती.
त्यांच्या उमेदवारीला डाव्या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 25,2024 | 12:45 PM
WebTitle – JNU Student Union Elections Victory for Left, Dalit Face President; Heavy defeat of ABVP