जालना | 2 सप्टेंबर 2023 : जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबार केल्याची घटना घडल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे. राज्यात सात जिल्ह्यांमध्ये आज बंद पाळण्याची हाक देण्यात आली आहे. या घटनेचे आजही पडसाद उमटत आहे. धुळ्यात जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त असून वाहतूक कोंडी झाल्याचेही वृत्त आहे. तर औरंगाबाद येथेही सकाळीच आंदोलकांनी जाळपोळ करत निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे जालन्यात जाणार असून मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत.
जालना लाठीचार्ज, या सात जिल्ह्यात बंद ची हाक,जाळपोळ, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
मराठा समाजाने शांततेने केलेल्या आंदोलनाला लाठीहल्ला करून वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.जालना येथे मनोज जरंगे हे मराठा समाजातील आंदोलक गेल्या 5 दिवसांपासून उपोषण करत होते.त्यांनी टीव्ही9 ला दिलेल्या माहितीनुसार सरकारने अचानक मोठ्याप्रमाणावर पोलिस पाठवले,त्यांना पाणी पिण्यास सांगितलं त्यांनी ते पिलं आणि मग 100-200 पोलिसांनी गावातील लोकांना हाणायला सुरुवात केली.इथं एक गंभीर गोष्ट आहे केवळ हा सोबतचा फोटो व्हायरल होतोय,केवळ त्यांचे डोके फोडलेले नाही तर तिथं गोळीबार सुद्धा करण्यात आलाय.मनोज जरंगे यांनी ती गोळीची केस सुद्धा दाखवली,एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस यांच्यावर हा कायमचा डाग आहे असंही मनोज जरंगे यांनी गोळीबार संदर्भात माहिती देताना म्हटलंय.गावात कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.ते तत्काळ थांबविण्याची मागणी मनोज जरंगे यांनी केली.
जालना येथे झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यात काही ठिकाणी मध्यरात्री जाळपोळ सुरू झाली.
औरंगाबा मधिल सिडको बसस्थानकात बस पेटवण्यात आली आहे.
शहागड मधिल बसस्थानकातील चार ते पाच बसेसना आग लावत जाळपोळ करण्यात आली आहे.
बसला आग लावल्याचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल होत आहेत.लाठीचार्ज घटनेनंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
सात जिल्हे बंद
जालना येथे लाठीचार्ज झाल्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्यावतीने मराठा आंदोलकांनी जालनासह नंदूरबार, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये बंद ची हाक दिली आहे. तसेच अनेक तालुक्यातील कारभारही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवृत्त व्हा,आता वय झालं…भारताला कोरोना लस देणाऱ्या सायरस पूनावाला यांचा मित्र शरद पवार ना सल्ला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 02,2023 | 09:10 AM
WebTitle – Jalna lathi charge, latest update