हरियाणा: हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना येथील बाबा बालकनाथ मंदिराचा पुजारी अमरपुरी उर्फ जलेबी बाबा उर्फ बिल्लू याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोन दिवसांनी कोर्ट जलेबी बाबाला शिक्षा सुनावणार आहे.जलेबी बाबा वर 120 वेगवेगळ्या महिलांवर बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप होता. पोलिसांच्या छाप्यात 120 महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारीवरून बाबा अमरपुरी याला अटक करण्यात आली. तांत्रिक होण्याआधी अमरपुरी टोहानाच्या रेल्वे रोडवर फेरीवाला म्हणून जिलबीचा धंदा करत होता.त्यामुळे त्याला जलेबीवाला बाबा हे नावही पडले. जलेबी बाबा च्या नावाने हे प्रकरण देशात आणि राज्यात प्रचंड चर्चेत आहे.असे भोंदू बाबा बुवा देव भोळ्या लोकांच्या धार्मिक श्रद्धांच्या नावाखाली गैरफायदा घेत असतात.यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
जलेबी बाबा अशा प्रकारे महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा
जलेबी बाबा उर्फ अमर पुरी खूप शातीर होता. तो महिलांना भूतबाधा झाल्याचे सांगत असे. भीतीमुळे ती महिला त्याचं बोलणं ऐकत असे.महिला भूतबाधा दूर करण्याच्या आशेने जलेबी बाबाच्या तांत्रिक कार्यात सहभागी होत असे मग हा लिंगपिसाट चमडीबाबा तंत्रविद्येत महिलांना अमली पदार्थ द्यायचा, त्यामुळे महिला बेहोश व्हायची.यानंतर बाबा महिलेवर बलात्कार करायचा आणि व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मोठी रक्कम सुद्धा वसूल करायचा. एवढच नाही तर महिलांना व्हिडिओच्या नावाखाली धमकावून तो जबरदस्तीने पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध ठेवायचा.
पोलिसांना तपासात 120 व्हिडिओ सापडले
जलेबी बाबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो महिलांसोबत शारीरिक संबंध बनवताना दिसून आला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. डीएसपींनी जलेबी बाबाला अटक करण्याची सूचना केली. पोलिसांनी अमर पुरी उर्फ बिल्लू याला अटक करून त्याच्यावर बलात्कार, आयटी अॅक्ट, ब्लॅकमेलिंगसह इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना अमरपुरीकडून 120 व्हिडिओ मिळाले होते, ज्यामध्ये तो महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता. यासोबतच पुजाऱ्याच्या खोलीतून नशेच्या गोळ्या आणि तंत्र-मंत्राचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.आरोपी बाबा बिल्लू राम उर्फ अमरपुरी याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३, २९४, ३७६, ३८४, ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हरियाणाच्या फतेहाबादमध्ये अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या जलेबी बाबाच्या शिक्षेला शनिवारी स्थगिती देण्यात आली.
कोर्टात दोन्ही बाजूंमधील वादविवाद होऊ शकला नाही. आता न्यायालय 9 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. दुसरीकडे, शनिवारी न्यायालयात आरोपी बाबा न्यायाधीशांसमोर ढसाढसा रडला. तत्पूर्वी, आरोपी बाबाला कडेकोट बंदोबस्तात जलदगती न्यायालयात आणण्यात आलं.
जिलबी चा बाकडा लावणारा तांत्रिक जलेबी बाबा कसा झाला?
जलेबी बाबाचे खरे नाव अमरवीर आहे. तो 20 वर्षांपूर्वी पंजाबमधील मानसा येथून तोहानाला आला होता.
यानंतर अमरपुरी उर्फ बिल्लूने स्त्याच्या कडेला जिलबीचा बाकडा लावला.यादरम्यान अमरपुरी च्या पत्नीचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपी तांत्रिक क्रिया शिकण्यासाठी पंजाबला गेला आणि त्यानंतर दोन वर्षांनी तोहानाला परतला.
इथं आल्यावर तो जलेबी बाबा म्हणून अवतार घेऊन राहू लागला.
यानंतर त्याने महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ बनवले.
अशोक स्तंभ:शोधलेल्या इंग्रजाने घराला ‘सारनाथ’ नाव दिलं, ते राष्ट्रीय चिन्ह कसे बनले?
ल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08,2023 23:04 PM
WebTitle – Jalebi-baba-120-obscene-video-court-convicted