नवी मुंबई : गेले अनेक दिवस आंबेडकरी समाजातील अस्वस्थता आणि सोशल मिडियात सुरू असलेल्या संतप्त चर्चा,जगदीश गायकवाड ची कथित व्हायरल क्लिप यामुळे वातावरण कमालीचे स्फोटक बनले होते,जगदीश गायकवाडवर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे नोंद होत होते,अखेर आज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मात्र अटक करताना जगदीश गायकवाड ने पोलिसांच्या अंगावरच गाडी घालत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांबाबत केलं होतं वादग्रस्त विधान
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना एड. प्रकाश आंबेडकर तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि इतर आंबेडकरी नेत्यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून जगदीश गायकवाड यांनी समस्त आंबेडकरी समाजाच्या रोष ओढवून घेतला. यामुळे त्यांच्याविषयी समाजातील विविध स्तरातून टीका होऊ लागली होती.वादग्रस्त क्लिप मधिल भाषा अत्यंत हिणकस असून सभ्य समाजात अशी भाषा ऐकणे सुद्धा कठीणच,त्यामुळे राज्यभरातील जनता संतप्त झाली होऊन त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीचा कारवाई साठी मोर्चा
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जगदीश गायकवाड च्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून.
त्याला आपण पोलीस आणि प्रशासनाच्या माध्यमातून कायदेशीर धडा शिकवू. पण कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कायद्याचे पालन करूनही समोरच्याला धडकी भरवू शकतात हे आपण दाखवून देऊ.
असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केले आहे.वंचित बहुजन आघाडी कडून काढण्यात आलेल्या धडक मोर्च्यात ते मोठ्या संख्याने उपस्थित असलेल्या आंबेडकरी नागरिकांना संबोधित करत होते.
जगदीश गायकवाड पळून जाण्याच्या प्रयत्नात

जगदीश गायकवाडवर राज्यात ठिकठिकाणी गुन्हे नोंद होत होते,अखेर आज पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मात्र अटक करताना जगदीश गायकवाड ने पोलिसांच्या अंगावरच गाडी घालत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.दरम्यान जगदीश गायकवाड ला आंबेडकर परिवाराच्या बदनामी प्रकरणात पनवेल मध्ये अटक केल्यानंतर जामीन मिळाला आहे, त्याला pcr हा 22 तारखेला झालेल्या मारहाण आणि वादाचे प्रकरणात मिळाला आहे.कर्जत येथील गुन्ह्यात जगदीश गायकवाडला 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांचे मरण!- कॉ. धनाजी गुरव
बुद्धम शरणम गच्छामी चा नाद कान्हेरी बुद्ध लेणीत घुमला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on NOV 30,2022, 22:25 PM
WebTitle – Jagdish Gaikwad in police custody, attempt to drive over police