इस्त्रायलने ज्या प्रकारचे हल्ले पॅलेस्टाईनवर केले आहेत, ज्याप्रकारे पॅलेस्टाईन काबिज करून त्यांचे अस्तीत्व संपवून टाकले आहे, त्यांची माहीती इकडच्या उजव्यांना असती तरी ते मुसलमान बहुल म्हणून पॅलेस्टाईनचा द्वेषच करीत असते. कारण त्यांचा जन्मापासूनच शोषणाचे संस्कार झालेले आहेत.
मुस्लीम दहशतवादी आणि पॅलेस्टाईन मधील मुस्लीम जनता आणि आंदोलक यात ज्यांना फरक समजत नाही त्यांना समजावून काहीही फरक पडत नाही.आधुनिक काळातला मुस्लीम आणि मुध्ययगीन काळातला मुस्लीम आक्रमक यात फरक आहे, मुस्लीम आक्रमणे आणि त्यांनी काबीज केलेले प्रदेश हे त्यांच्या धार्मिक आकांक्षाचे आणि त्यांच्या युद्ध तंत्रज्ञानाचे प्रतिक आहे, एके काळी विज्ञानात जागतिक आघाडी घेणारे मुस्लीम जग धार्मिक गुंत्यात अडकून पडलं आणि मुस्लीम जग व भुगोल संकुचित व्हायला लागला.आणि विज्ञानाची आघाडी पश्चिमेकडे गेली.अरबस्थानात तेल मिळेपर्यंत मुस्लीम जग अंधारत होतं.अपवाद फक्त भारतातील मुघल काळाचा त्यालाही इंग्रजांनी संपविले.
आंदोलनाला धर्माचा आधार होता
मुस्लीम दहशतवादी हे इस्रायल आणि पेलीस्टाईनच्या संघर्षातून आधुनिक काळात प्रथम निर्माण झाले, पेलीस्टाईन मधील मुस्लीम आंदेलक अल्लाहच्या नावे त्यांचा देश काबीज केलेल्या इस्त्रायलला विरोध करीत होते, पण त्यांच्या आंदोलनाला धर्माचा आधार होता, संदर्भ होता, तो जिहाद होता, त्यात कडवट पणा होता, त्याला अरब राष्ट्रांची रसद होती.
इस्रायल तर पश्चिमी बड्या राष्ट्रांनी पेलीस्टाईन देशावर जबरदस्तीने वसवला.इस्रायलला जागतीक रसद, अमेरीकन, ब्रिटीश आणि धनाड्य लोकांचा आश्रय होता, त्यामुळे पेलीस्टाईनच्या आधी हिंसक आंदोलनाला चिरडून तेथील सर्वसामान्य लोकांना दोन टोकाच्या भुगोलाच्या पट्टीत बंदिस्त करण्यात आले आणि मधे इस्रायल ज्यू बँकर्सच्या जोरावर आकार घेवून लागला.आणि इथुन सूरू झाला त्यांच्या सामान्य पेलीस्टाईनी नागरिकांच्या यातनांचा काळ. यावर खुप लिहलं गेलं आहे.
इतक्या यातना की विचारूच नका, आणि जिहाद व हिंसक विरोधामुळे त्यांना जगातून सहानुभुती मिळत नव्हती. पुढे हीच जिहाद संकल्पना अमेरीकेने अफगाणीस्थानात रशियाच्या विरूद्ध पाकीस्तानाच्या मदतीने राबवली आणि मुस्लीम विरोध म्हणजेच जिहादी, जिहादी म्हणजे कट्टर शत्रू मग तो कुठलाही असो.त्याचा मुद्दा कोणताही असो…शत्रूच..अशा रितीने पिचलेल्या मुस्लीम पेलीस्टाईनच्या नागरीकांना कोणाचीच सहनुभुती मिळत नाही.
त्यांचे मुस्लीम असणे हाच त्यांचा गुन्हा आहे
काही इतिहास माहीत असणारे लोक, काही मानवी हक्कासाठी उभे राहणारे लोक पेलीस्टाईनच्या बाजूने जेव्हा बोलतात
तेव्हा अमेरीकन प्रपोगंडांचे सतत डोस घेवून जगणारं जग म्हणत.
अरे तुम्ही ह्या दहशतवाद्यांना का साथ देता? बोला काय बोलायचं?
पेलीस्टाईनचा प्रश्न ज्या लोकांना समजतच नाही त्या लोकांनी इस्त्रायला साथ दिली काय,
हिटलरला साथ दिली काय, कि अमेरीकेचे मांडलीक असलेल्या सौदीला साथ दिली काय.यांना प्रपोगांडीनी केलेली गोचीच समजत नाही.
त्यामुळे पेलीस्टाईनच्या मुद्यावर मी नेहमीच गप्प बसतो.जगात पॅलेस्टाईनला अजिबात भविष्य नाही.
जोपर्यंत विरोध करणारे पूर्णपणे संपून जात नाहीत, पेलीस्टाईनची आम जनता गुडघे टेकत नाही तो पर्यंत त्यांना कुठलंच भविष्य नाही.
त्यांचे मुस्लीम असणे हाच त्यांचा गुन्हा आहे. त्यांना सहनुभुती अजिबात मिळणार नाही.नाही म्हणजे नाहीच.
‘वॉर टेस्टेड’
पॅलेस्टाईन हे आधुनिक शस्त्रात्रे टेस्ट करण्याचे, अत्याधुनिक सर्विलंस टेस्ट करण्याचे, अनेक मिलीटरी आणि केमीकल युद्ध सामुग्री टेस्ट करण्याची, सिटीवॉरफेयर टेस्ट करण्याची, जागतीक प्रयोगशाळा आहे, इस्त्रायलच्या अश्रूधूराला, काटकोनातून गोळी मारणाऱ्या बंदुकींना, अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्रांना इथेच टेस्ट करून ‘वॉर टेस्टेड’ सामुग्री म्हणून जगात खुपच मागणी आहे.यावरही खुप लिहलं गेलं आहे. एका इस्रायली सैनिकाने यावर खळबळजनक माहीती प्रसारित केलेली आहे.
आपले उजवे फक्त द्वेषाचे बुडबुडे आहेत, ते स्वताला इस्राईल सारखे करण्याचे स्वप्न बघत आहेत,
पण शेण-मुताच्या पुढे त्यांना विचार करता येत नाही.पण स्वप्न बघायला आणि द्वेष करायला काही पैसे लागत नाही.
ज्याला आपण इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध म्हणतो ते युद्ध नाही एकतर्फी हल्ला आहे
ज्यू राज्यकर्ते आणि गुंतवणूकदार ज्यांची संख्या अमाप आहे, हे शोषण करण्याचे नवनवीन तंत्रज्ञान तयार करण्यात जगात आघाडीवर आहेत आणि ते तंत्र विकसीत करण्यासाठीच पेलीस्टाईनची गरज आहे, हे ते जाणून आहेत म्हणून आज पर्यंत हा प्रश्न भिजत ठेवला आहे. म्हणजे पेलीस्टाईन काबीज करून त्याच्यावर आपला इस्त्रायल नावाचा देश बनवून, सगळ्या अरब राष्ट्रांना हरवून, अर्थिक व तांत्रिक प्रगती करून, अन्यायकारक कायदे पेलीस्टाईनवर लादूनही… स्वताला पेलीस्टाईनच्या दहशतवादाचे बळी म्हणून दाखविणे म्हणजे मोठं जिकरीच काम आहे.आणि ते सतत करण्यातच त्यांच्या शोषक राजकारणाचा फायदा आहे.
आता ज्याला आपण इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्ध म्हणतो ते युद्ध नाही एकतर्फी हल्ला आहे.
पेलीस्टाईन मधुन काही रॉकेट्स इस्त्राईलच्या शहरी भागावर सोडले गेले
त्याला इस्त्राईलच्या अत्यंत आधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम “आयर्न डोम” ज्या मोबाईल ट्रेकिंग रडार सिस्टम आहे…
त्यांनी ट्राक करून हवेतच संपवून टाकले, याचे लाईव्ह प्रेेक्षपण इस्त्रायली नागरीकांना दाखविण्यात आले.
त्यानंतर इस्त्रायल ने डिफेंसलेस पेलीस्टाईन नागरीकांवर तूफान हल्ला चढविला.आणि अशा पद्धतीने इस्त्रायलने दहशतवादाचा सामान केला.
आणि एक आधुनिक शस्त्रात्र यंत्रणा चांगलीच टेस्ट झाली.चला आता त्याला भारतसहीत अनेक देशातून मागणी येणार..सपलं युद्ध..
भारत सुरवातीपासूनच पॅलेस्टाईनला साथ देत आला आहे, कारण तो सत्याच्या बाजूचा होता,
आता खुनशी लोकांचे राज्य आले आहे त्यांची भुमिका शोषकांच्या दृष्टीकोनतूनच आहे.
सिरिया युद्ध नेमकं काय? जाणून घ्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)
First Published on MAY 14, 2021 12: 42 PM
WebTitle – Israel Palestine conflict 2021-05-14